कोल्हापूर : भात विक्रीच्या नोंदणीसाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ

कोल्हापूर : जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयातर्फे भात विक्री नोंदणी करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, त्यांनी त्वरित संस्थेच्या चार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Extension till October 15 for registration of sale of paddy
Extension till October 15 for registration of sale of paddy

कोल्हापूर : जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालयातर्फे भात विक्री नोंदणी करण्यासाठी १५ ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप नोंदणी केली नाही, त्यांनी त्वरित संस्थेच्या चार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

या शिवाय  जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, श्रीशाहू मार्केट यार्ड, कांदा बटाटा लाईन, कोल्हापूर तसेच कृषी उत्पन्न बाजार समिती गडहिंग्लज व कोल्हापूर येथील बाजार समिती कार्यालयाशीही शेतकरी संपर्क साधू शकतात, असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी चंद्रकांत खाडे यांनी सांगितले. 

खाडे म्हणाले, ‘‘राज्य शासनाच्या आधारभूत किंमत धान खरेदी योजनेसाठी दि.महाराष्ट्र राज्य मार्केटिंग फेडरेशन लि. ही संस्था राज्य शासनाची मुख्य अभिकर्ता संस्था म्हणून खरेदीची कामे पाहते. हंगाम २०२१-२२ करिता शासनाने धानासाठी १ हजार ९४० प्रतिक्विंटल दर जाहीर केला आहे. ज्या शेतकऱ्यांना हमीभावाने धान शासकीय खरेदी केंद्रावर विक्री करायचा आहे, त्या शेतकऱ्यांसाठी विक्रीसाठी खरेदी केंद्रावर आगाऊ ऑनलाइन नोंदणी सुरु केली आहे. त्यानुसार मार्केटिंग फेडरेशनच्या जिल्हा कार्यालयामार्फत जिल्ह्यांत चार ठिकाणी नोंदणी केंद्रे सुरू केली आहेत. यामध्ये चंदगड तालुका खरेदी विक्री संघ लि, तुर्केवाडी, चंदगड तालुका सहकारी कृषिमाल फलोत्पादन संघ लि, अडकूर, आजरा किसान सहकारी भात खरेदी विक्री संघ मर्या. आजरा, राधानगरी तालुका शेतकरी सहकारी खरेदी विक्री संघ मर्या-सरवडे येथे नोंदणी केंद्रे सुरु केली आहेत.’’

‘‘धान खरेदी ही शासनाच्या ऑनलाइन पोर्टलद्वारे करण्यात येणार आहे. नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी चालू खरीप हंगाम २०२१-२२ मधील धान पीक लागवडीची नोंद असलेल्या डिजिटल स्वाक्षरीचा मूळ सातबारा उतारा, आताचा मूळ सातबारा प्रत, आधार कार्ड व बॅंक पासबुक झेरॉक्सची आवश्यकता आहे,’’ असेही खाडे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com