agriculture news in marathi Extension of transfers only for the benefit of education and research : Rahuri university administration | Agrowon

शिक्षण, संशोधन हितासाठीच बदल्यांना मुदतवाढ : राहुरी कृषी विद्यापीठ प्रशासनाचा दावा

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 2 ऑक्टोबर 2020

शासनाचे आर्थिक हित व कृषी शिक्षण,संशोधनाचे नियोजन विचारात घेत बदल्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे, असा दावा महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ प्रशासनाने केला आहे.

पुणे : शासनाचे आर्थिक हित व कृषी शिक्षण,संशोधनाचे नियोजन विचारात घेत बदल्यांना एक वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे, असा दावा महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ प्रशासनाने केला आहे.

विद्यापीठातील बदल्यांबाबत प्रशासनाने आपली भूमिका मांडली आहे. राज्यात कोविड १९ ची स्थिती व आगामी खरिपाचे नियोजन सुरू असताना कृषी शिक्षण, संशोधन व विस्तार कार्यावर परिणाम न होण्यासाठी काही निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

“महाराष्ट्र शासकीय कर्मचारी बदली विनियमन व शासकीय कर्तव्ये विलंब प्रतिबंध कायदा २००५ आम्ही विद्यापीठाच्या इतिहासात प्रथमच प्रभावीपणे अमलात आणत आहोत. बदल्यांना एक वर्षाची मुदतवाढ दिली असली तरी मे २०२१ मध्ये नियमित बदल्यांमध्ये त्या पुन्हा करण्यात येतील,” असे विद्यापीठाच्या खुलासापत्रात म्हटले आहे.

शासकीय कर्मचारी बदली कायदा हा विद्यापीठातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांना लागू होतो. प्रशासकीय कारणास्तव १५ टक्के बदल्या दहा ऑगस्टपर्यंत करण्याच्या सूचना शासनाने दिलेल्या होत्या. नागरी सेवा मंडळाने त्यासाठी सभा घेत एकमताने मान्यता दिली होती, असे विद्यापीठाचे म्हणणे आहे.

कोविडमुळे पदविका, पदवी, पदव्युत्तर व आचार्य अभ्यासक्रमांचे व्दितीय, तृतीय, चतुर्थ वर्षाचे शैक्षणिक काम ऑनलाइन सुरू झाले आहे. केंद्र व राज्याच्या विविध योजनांमधील प्रकल्पांचे संशोधन, क्षेत्रीय चाचण्या, प्रयोगशाळा, बिजोत्पादन तसेच क्षेत्रीय डाटा संकलनाचे काम देखील सुरू झाले आहे.

कायद्यातील कलम पाच एक (ख) व (ग) अनुसार विद्यापीठाच्या कामकाजावर परिणाम होवू नये यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांना बदल्यांना मुदतवाढ दिली गेली, असेही विद्यापीठाचे म्हणणे आहे. 


इतर बातम्या
सुर्डीतील तरुणांनी तेरा पाझर तलावांना...वैराग, जि. सोलापूर ः ‘वॉटर कप’ स्पर्धेत राज्यात...
धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यताभंडारा : खरीप हंगामातील धान केंद्र सुरू...
आम्ही तुमच्यासोबत: मुख्यमंत्रीसोलापूर ः सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन...
कृषी विद्यापीठ कर्मचारी करणार वेतन...नागपूर: सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची...
कापूस विक्रीसाठी नोंदणी थांबविलीजळगाव ः शासकीय केंद्रात कापूस विक्रीसाठी बाजार...
राज्याने जबाबदारी झटकू नये: देवेंद्र...बारामती, जि. पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
कोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगातकोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने...
आटपाडी तालुक्यात चार वेळा अतिवृष्टीआटपाडी, जि. सांगली : बॅंका, विकास सेवा सोसायट्या...
पाच हजार शेतकऱ्यांची ‘रिसोर्स बॅंक’कऱ्हाड, जि. सातारा ः शेतकऱ्यांवर सातत्याने...
डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा...मुंबई: डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा जोरदार...
राज्यात तुरळक ठिकाणी पावसाचा दणका पुणे ः राज्यात गेल्या दोन दिवसांपासून कोकणातही...
‘जीआय’प्राप्त शेतकरी ‘वापरकर्ते’ करणारपुणे: राज्यातील पिकांना भौगोलिक निर्देशांक मिळाले...
तीन दिवसांत मदतीबाबत निर्णय: मुख्यमंत्रीसोलापूर ः हवामान विभागाने आणखी दोन-तीन दिवस...
संत्रापट्ट्यासाठी अनुदानाचे निकष बदलाअमरावती : संत्राबाग कीड-रोग रोगमुक्त ठेवण्यासाठी...
राज्यात पावसासाठी पोषक स्थिती पुणे ः बंगालचा उपसागर व दक्षिण आंध्रप्रदेश...
शेतकऱ्यांना मदतीसाठी कर्जाशिवाय गत्यंतर...तुळजापूर, जि. उस्मानाबाद: स्थानिक लोकांशी...
अकोल्यात ज्वारीच्या कणसातून निघाले कोंबअकोला ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात असमतोल...
जळगावात खपली गहू पेरणी वाढणारजळगाव ः आरोग्यदायी, शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून...
अकोट येथे उडीद पिकाची प्रतिकात्मक होळीअकोला ः पावसाने पिकांची दाणादाण उडविली आहे....
खानदेशात सोयाबीनचे अनेक शेतकऱ्यांना...जळगाव ः खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा बऱ्यापैकी...