कीडनियंत्रणासाठी विस्तार कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ः सोनुने

कीडनियंत्रणासाठी विस्तार कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ः सोनुने
कीडनियंत्रणासाठी विस्तार कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची ः सोनुने

जालना : येत्या खरीप हंगामात पिकावर गुलाबी बोंड अळी, हुमणी अळी व मक्‍यावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव होण्याची शक्‍यता आहे. या किडींच्या व्यवस्थापन पद्धती गावागावांत शेतकऱ्यांना समजावून सांगण्यासाठी विस्तार कार्यकर्त्यांची भूमिका महत्त्वाची राहणार असल्याचे मत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ एस. व्ही. सोनुने यांनी व्यक्‍त केले. 

खरपुडी येथील कृषी विज्ञान केंद्रांतर्गत गुलाबी बोंड अळी, हुमणी मक्‍यावरील अमेरिकन लष्करी अळी व्यवस्थापन आणि कीटकनाशकाचा सुरक्षित वापर याविषयी विस्तार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी दोनदिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. 

या प्रशिक्षणात श्री. सोनुने बोलत होते. खरपुडीचे प्राचार्य डॉ. ओडी. कोहीरे, निवृत्त कृषी अधिकारी नंदकिशोर पुंड, कीटकशास्त्रज्ञ अजय मिटकरी यांची या वेळी उपस्थिती होती. 

सोनुने म्हणाले, ‘‘राष्ट्रीय कीड व्यवस्थापन केंद्र नवी दिल्ली यांच्या सहकार्याने कृषी विज्ञान केंद्राने वखारी गावात गुलाबी बोंड अळीचे पतंग मोठ्या प्रमाणात पकडून कापूस पिकात एकात्मिक पीक व्यवस्थापन प्रकल्प २०१८-१९ मध्ये राबविला. या प्रकल्पाचे चांगले निष्कर्ष मिळाले आहेत. त्याचा प्रचार विस्तार कार्यकर्त्यांनी करण्याची गरज आहे.’’ 

अजय मिटकरी म्हणाले, ‘‘गुलाबी बोंड अळीच्या व्यवस्थापनासाठी मॉन्सूनचा पुरेसा पाऊस झाल्यास एकाच वेळी लागवड करावी. रेफ्युजीया बियांची लागवड, कामगंध सापळ्यांचा वापर, डोमकळी नष्ट करणे, ५ टक्‍के निंबोळी अर्काची फवारणी, नुकसानीच्या पातळीनुसार शिफारशीत कीटकनाशकाचा वापर करावा. हुमणीच्या परिणामकारक नियंत्रणासाठी सामूहिकरीत्या एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करावा. ’’  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com