काथ्या उद्योगवृद्धीसाठी सर्वतोपरी सहकार्य : कॉयर बोर्डाचे अध्यक्ष डी. कुप्पूरामू

सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात काथ्या उद्योग वृद्धिंगत व्हावा, या दृष्टीने कॉयर बोर्डामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्‍वासन कॉयर बोर्डाचे अध्यक्ष डी. कुप्पूरामू यांनी येथे व्यक्त केले.
काथ्या उद्योगवृद्धीसाठी सर्वतोपरी सहकार्य : कॉयर बोर्डाचे अध्यक्ष डी. कुप्पूरामू
काथ्या उद्योगवृद्धीसाठी सर्वतोपरी सहकार्य : कॉयर बोर्डाचे अध्यक्ष डी. कुप्पूरामू

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात काथ्या उद्योग वृद्धिंगत व्हावा, या दृष्टीने कॉयर बोर्डामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. याशिवाय जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी आढावादेखील घेतला जाईल, असे आश्‍वासन कॉयर बोर्डाचे अध्यक्ष डी. कुप्पूरामू यांनी येथे व्यक्त केले. केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कॉयर बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोकणात काथ्या उद्योगवाढीसाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना केली होती. त्यानुसार कॉयर बोर्डाचे अध्यक्ष श्री. कुप्पूरामू यांनी नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते.  या बैठकीला जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, एमएसईडीचे अध्यक्ष राजेश कांदळकर, कॉयर बोर्डाचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्रीनिवासन, झोनल डायरेक्टर जे. के. शुक्ला, डीआयएसचे मॅनेजर पी. के. गावडे, एम. के. कॉयर फाउंडेशनचे अध्यक्ष एम. के. गावडे, महिला काथ्या संस्थेच्या संचालक प्रज्ञा परब यांच्यासह काथ्या उद्योजक उपस्थित होते. जिल्ह्यात काथ्या उद्योगांबाबत भेडसावणाऱ्या समस्या जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे यांनी मांडल्या. अधिकाधिक नारळ सोडणावर प्रकिया होणे गरजेचे आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या विभागीय कार्यालयासाठी कॉयर बोर्डाने झुकते माप देऊन अधिकचा फंड द्यावा, अशी विनंती देखील श्री. गावडे यांनी केली. श्री. कुप्पूरामू यांनी काथ्या उद्योजकांनी केलेल्या मागण्यांपैकी बऱ्याच मागण्या बैठकीतच मान्य केल्या. दर तीन महिन्यांनी जिल्ह्यात येऊन काथ्या उद्योगांचा आढावा घेण्यात येईल, असे आश्‍वासनदेखील त्यांनी दिले.या वेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी भविष्यात सर्वतोपरी सहकार्य प्रशासनाकडून मिळेल, अशी ग्वाही दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com