agriculture news in marathi Extensive cooperation for the growth of Choir industry Board Chairman Kuppuramu | Page 3 ||| Agrowon

काथ्या उद्योगवृद्धीसाठी सर्वतोपरी सहकार्य : कॉयर बोर्डाचे अध्यक्ष डी. कुप्पूरामू

टीम अॅग्रोवन
सोमवार, 6 सप्टेंबर 2021

सिंधुदुर्गनगरी जिल्ह्यात काथ्या उद्योग वृद्धिंगत व्हावा, या दृष्टीने कॉयर बोर्डामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्‍वासन कॉयर बोर्डाचे अध्यक्ष डी. कुप्पूरामू यांनी येथे व्यक्त केले.
 

सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात काथ्या उद्योग वृद्धिंगत व्हावा, या दृष्टीने कॉयर बोर्डामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. याशिवाय जिल्ह्यात दर तीन महिन्यांनी आढावादेखील घेतला जाईल, असे आश्‍वासन कॉयर बोर्डाचे अध्यक्ष डी. कुप्पूरामू यांनी येथे व्यक्त केले.

केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी कॉयर बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन कोकणात काथ्या उद्योगवाढीसाठी प्रयत्न करावेत, अशी सूचना केली होती. त्यानुसार कॉयर बोर्डाचे अध्यक्ष श्री. कुप्पूरामू यांनी नुकतेच जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन केले होते. 

या बैठकीला जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी, एमएसईडीचे अध्यक्ष राजेश कांदळकर, कॉयर बोर्डाचे क्षेत्रीय व्यवस्थापक श्रीनिवासन, झोनल डायरेक्टर जे. के. शुक्ला, डीआयएसचे मॅनेजर पी. के. गावडे, एम. के. कॉयर फाउंडेशनचे अध्यक्ष एम. के. गावडे, महिला काथ्या संस्थेच्या संचालक प्रज्ञा परब यांच्यासह काथ्या उद्योजक उपस्थित होते. जिल्ह्यात काथ्या उद्योगांबाबत भेडसावणाऱ्या समस्या जिल्हा दूध संघाचे अध्यक्ष एम. के. गावडे यांनी मांडल्या.

अधिकाधिक नारळ सोडणावर प्रकिया होणे गरजेचे आहे. याशिवाय महाराष्ट्राच्या विभागीय कार्यालयासाठी कॉयर बोर्डाने झुकते माप देऊन अधिकचा फंड द्यावा, अशी विनंती देखील श्री. गावडे यांनी केली. श्री. कुप्पूरामू यांनी काथ्या उद्योजकांनी केलेल्या मागण्यांपैकी बऱ्याच मागण्या बैठकीतच मान्य केल्या. दर तीन महिन्यांनी जिल्ह्यात येऊन काथ्या उद्योगांचा आढावा घेण्यात येईल, असे आश्‍वासनदेखील त्यांनी दिले.या वेळी जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी भविष्यात सर्वतोपरी सहकार्य प्रशासनाकडून मिळेल, अशी ग्वाही दिली.


इतर ताज्या घडामोडी
अकोला, वाशीम जि.प.,पंचायत समिती...अकोला ः जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील रिक्त...
आठवडी बाजार सुरू करा : मुनगंटीवारचंद्रपूर ः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव...
शिवसेनेचे शिष्टमंडळ लखीमपूरला जाणार;...नवी दिल्ली : लखीमपूर खेरी येथील हिंसा आणि...
सांगलीत १० ते १५ टक्क्यांनी सोयाबीनचे...सांगली ः जिल्ह्यात जुलै महिन्यात आलेल्या...
शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी...लखनौ ः लखीमपूरमधील हिंसाचारानंतर राज्य...
लखीमपूर खेरीतील हिंसाचार...नवी दिल्ली ः शेतकऱ्यांचा बळी घेणाऱ्या लखीमपूर...
पुणे जिल्ह्यातील पशुधन बाजार बंदपुणे ः केंद्र सरकारकडून वेळेत लसींचा पुरवठा न...
देशांतर्गत कडधान्य उत्पादनवाढ गरजेचीपुणे : गेल्या तीन दशकांत कडधान्य लागवड आणि...
मागणी वाढल्याने उन्हाळ  कांदा...नाशिक : जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांत...
आजच्या ग्रामसभांना ग्रामसेवकांचा विरोध नगर : राज्याच्या ग्रामविकास विभागाने आज (ता. २)...
राज्य सरकारने तातडीने भरपाईचा निर्णय...नागपूर : राज्यावर मोठी नैसर्गिक आपत्ती येते....
वीजदर सवलतीबाबत उपमुख्यमंत्री सकारात्मक कोल्हापूर : राज्यातील उच्च दाब आणि लघू दाब सहकारी...
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
पीक नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे...नाशिक : अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या...
बँकांनी कर्ज प्रकरणे वेळेत मंजूर करावीत...वाशीम : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना बँकांनी खरीप आणि...
शेतकरी आंदोलकांवर सर्वोच्च न्यायालय...नवी दिल्ली : राजधानी दिल्लीच्या सीमांवर ठाण...
‘माळेगाव कारखाना देणार  शेतकऱ्यांना ‘...माळेगाव, जि. पुणे : माळेगाव साखर कारखाना आगामी...
मुंबै बँकेची चौकशी केवळ सुडाने आणि...मुंबई ः मुंबै बँकेच्या विरोधात चौकशी करण्याचा...
नाशिक जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची...नाशिक : जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्यानंतर पुन्हा...
तापी, वाघूर, गिरणा नदीला पुन्हा पूरजळगाव  : जिल्ह्यात महत्त्वाच्या मानल्या...