agriculture news in Marathi extra sugar export possible to Indonesia Maharashtra | Agrowon

इंडोनेशियात कच्च्या साखरेची जादा निर्यात शक्य

राजकुमार चौगुले
शनिवार, 22 फेब्रुवारी 2020

भारताला साखर निर्यातीची चांगली संधी यानिमित्ताने आली आहे. आम्ही भारत सरकारच्या साहाय्याने यासाठी धडपडत होतो. आता त्यात यश आले. देशातील कारखान्यांनी या इंडोनेशियाला साखर पाठविण्यासाठी सकारात्मकता दाखविण्याची गरज आहे. नव्याने कंत्राट करून साखर निर्यात होऊ शकते. 
- प्रकाश नाईकनवरे, व्यवस्थापकीय संचालक, राष्ट्रीय साखर महासंघ

कोल्हापूर : भारताच्या दृष्टीने साखर निर्यातीसाठी महत्त्वाच्या असणाऱ्या इंडोनेशियाने अखेर भारतातून आयात होणाऱ्या कच्या साखरेच्या इकुम्साची मर्यादा (साखरेच्या शुद्धतेचे मानांकन) १२०० वरून ६०० इतकी घटविल्याने आता या देशात साखर वेगाने निर्यात करणे शक्‍य होणार आहे. इंडोनेशिया सरकारच्या वतीने हा बदल नुकताच निश्‍चित करण्यात आला. साखरेच्या बदल्यास भारताने मलेशियाकडून पाम तेल खरेदी करावे, या उद्देशाने हा बदल करण्यात आला आहे. 

गेल्या काही दिवसांत भारतातून साखर निर्यात वाढत आहे. मलेशिया व इंडोनेशिया हे निर्यातीसाठी महत्त्वाचे देश आहेत. भारतात ४०० ते ८०० इकुम्सा साखर तयार होते. १२०० इकुम्सा साखर तयार करणे भारताला सहज शक्‍य होत नाही. पण इंडोनेशियाने हे मापदंड न स्वीकारता १२०० इकुम्सा साखरच स्वीकारायची हे धोरण ठरविले होते. पर्यायाने या देशात भारताची साखर निर्यात होण्यास मर्यादा येत होत्या. भारत हा इंडोनेशियाकडून पामतेल आयात करतो. पामतेलासाठी भारताने आयात शुल्क कमी करावे, त्या बदल्यास भारताकडून साखर घेतली जाईल, असे ठरले होते. 

भारताने आयात शुल्क कमी केले खरे, पण इंडोनेशियाकडून मात्र साखरेची मागणी झाली नव्हती. भारताने साखरेवरील निर्यात शुल्क कमी करूनही साखरेला मागणी इंडोनेशियाकडून होत नसल्याने भारतातून नाराजी व्यक्त होत होती. भारताने पामतेल जास्तीत जास्त खरेदी करावे यासाठी इंडोनेशिया सरकारने अखेर इकुम्साची मर्यादा घटवून भारतातून साखर आयातीस परवानगी दिली आहे. अटीत सुधारणा केल्याने आता भारताला निर्यातीची मोठी संधी चालून आली आहे. 

गेल्या वर्षी केंद्र सरकार व राष्ट्रीय साखर महासंघाच्या संयुक्त पदाधिकाऱ्यांनी इंडोनेशियाला भेट देऊन तेथील अधिकाऱ्यांची भेट घेतली होती. भारतीय कच्च्या साखरेची निर्यात इंडोनेशियात कशी फायदेशीर आहे. आणि या बदल्यात पामतेल भारतासाठी कसे उपयुक्त ठरू शकते याबाबत सविस्तर चर्चा केली होती.

दोन्ही देशांना पूरक फायदेशीर बाबी असल्याने आयात निर्यात धोरणात दोन्ही देशांनी थोडी शिथिलता आणल्यास दोघांनाही फायदेशीर ठरेल, असे मत या वेळी मांडण्यात आले होते. यानंतर एक वर्षाने इंडोनेशियाने साखर निर्यातीसाठीचे काही नियम शिथिल करून भारताला साखर निर्यातीची संधी उपलब्ध करून दिली आहे. 


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दिवसभरात १५० नवीन रुग्ण, १२...पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या...
शेतीमाल थेट विक्रीचा समन्वय भक्कम केला...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी...
राज्यात शुक्रवारपासून वादळी पावसाचा...पुणे  : राज्यात उन्हाचा ताप वाढत असल्याने...
कृषी रसायन कंपन्यांचा कच्चा माल अडकलापुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लागू...
व्यावसायिक चातुर्यातून ४० टन कलिंगडाची...कोरोना संकटामुळे शेतमाल विक्री व्यवस्था अडचणीत...
गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...
‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...
राज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...
मराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...
रब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...
भाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...
अर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...
पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे  : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...