Agriculture news in marathi, 'Extra water of Ujani from the Seena Release in Shirapur Fasting Plan ' | Agrowon

‘उजनीचे अतिरिक्त पाणी सीनेतून शिरापूर उपसा योजनेत सोडा’ 
टीम अॅग्रोवन
रविवार, 11 ऑगस्ट 2019

सोलापूर : ‘‘गेल्या वर्षीच्या दुष्काळामुळे आणि यंदा पडलेल्या अपुऱ्या पावसामुळे उत्तर सोलापूर तालुक्यात पाण्याचा गंभीर प्रश्न आहे. दुसरीकडे उजनीच्या लाभक्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे उजनी धरण १०० टक्के भरले आहे. त्यामुळे तालुक्यातील वडाळा, नान्नज, बिबी दारफळ, रानमसले, गावडी दारफळ आदी गावांतील पाण्याचा प्रश्न मिटविण्यासाठी हे अतिरिक्त वाहून जाणारे पाणी सीना नदीतून शिरापूर उपसा सिंचन योजनेच्या कालव्यात सोडा,’’ अशी मागणी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक जितेंद्र साठे यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे केली. 

उजनीचे पाणी बोगद्यामधून सीना नदीत सोडल्यामुळे ते पाणी आमच्या शिरापूर उपसा सिंचन योजनेतंर्गत दुष्काळी तालुक्यातील गावडी (दारफळ) वडाळा, रानमसले, नान्नज येथील तलाव भरून घेण्यासाठी सोडावे, जेणेकरून वडाळा मंडलातील गावांना त्याचा फायदा होईल.

दुष्काळाची दाहकता कमी करण्यास मदत होईल. त्यामुळे शासनाचा पाणीपुरवठ्यासाठी होणारा टँकरवरील कोट्यवधीचा खर्च वाचेल. त्यावरील वीजबिल ही शासनाने टंचाईमधून भरावे, जेणेकरून पाण्यासाठी होणारा पुढील खर्च वाचण्यास मदत होईल. तरी आपण शिरापूर उपसा सिंचन योजनेस अतिरिक्त असलेले उजनीचे पाणी सोडण्याबाबत संबंधितांना आदेश द्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.

इतर बातम्या
खानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव  ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...
औरंगाबाद, जालना जिल्ह्यांत पावसाचा कमी-...औरंगाबाद  : मराठवाड्यातील ४२१ पैकी तब्बल २७५...
कोल्हापूर, सिंधुदुर्गात पावसाची रिपरिपकोल्हापूर, सिंधुदुर्ग : सप्टेंबरच्या पहिल्या...
शेतीमाल तारण कर्ज योजनेसाठी एक कोटीपरभणी : ‘‘परभणी कृषी उत्पन्न बाजार समितीतर्फे...
पाचोरा, जामनेरातही १०० टक्के पाऊसजळगाव ः खानदेशात जळगाव, धुळ्यात या...
‘टेंभू‘चे पाणी आटपाडीत, शेतकऱ्यांना...आटपाडी जि. सांगली :  टेंभू पंपगृहातील पंपात...
‘शेतकरी सन्मान योजने‘च्या अनुदानासाठी...कळमनुरी : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेंतर्गत...
तीन कारखान्यावरील कारवाई अंतिम टप्प्यातसोलापूर : ‘‘सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
विषबाधितांवरील उपचाराबाबत वैद्यकीय...अकोला  ः कृषी विभाग, जिल्हा परिषद व सिंजेंटा...
संत्र्याला जागतिक बाजारपेठेत पोचवण्याचे...अमरावती : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
पुणे जिल्ह्याच्या दुष्काळी भागात...पुणे ः गणपतीच्या विसर्जनानंतर पुन्हा पावसाने जोर...
बागलाण तालुक्यात शेतातून चंदनाची चोरीनाशिक  : बागलाण तालुक्यातील नवे निरपूर येथील...
तोलाई परिपत्रक होणार रद्द पुणे ः बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या...
भात, सोयाबीन पिके बहरलीचास, जि. पुणे ः खेड तालुक्‍याच्या पश्‍चिम...
‘शेतकरी सन्मान’साठी २० हजार कोटी दिले...नाशिक : शेतकऱ्यांना सन्मान मिळवून देत त्यांना मदत...
‘मी शेतकरी’ आंदोलनाला गांधी जयंतीपासून...नगर : शेतकऱ्यांच्या शेतीमालाला दीडपट हमीभाव तसेच...
शेतीपूरक व्यवसायांना राज्य शासनाची...सांगली ः अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास...
थकीत बिलासाठी मुंबईत दुग्धविकास आयुक्त...परभणी ः शासकीय दूध योजनेअंतर्गत परभणी येथील दुग्ध...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
आर्थिक मंदीमुळे देशातील शेती क्षेत्राला...नांदेड ः सध्या प्रचंड मंदी आहे. गुंतवणूक केली जात...