Agriculture news in marathi Extreme damage to orchards due to cyclone in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात चक्रीवादळामुळे फळबागांचे अतोनात नुकसान

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 5 जून 2020

नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर उग्र रूप धारण केले. त्यानंतर बुधवार(ता.३) सोसाट्याचा वारा सुटला. जोरदार वाऱ्यासह पावसाचे प्रमाण वाढल्याने नांदगाव, निफाड, चांदवड, सटाणा तालुक्यात तुरळक ठिकाणी फळबागांसह उसाची पिके आडवी झाली.

नाशिक : निसर्ग चक्रीवादळाने जिल्ह्यात दुपारनंतर उग्र रूप धारण केले. त्यानंतर बुधवार(ता.३) सोसाट्याचा वारा सुटला. जोरदार वाऱ्यासह पावसाचे प्रमाण वाढल्याने नांदगाव, निफाड, चांदवड, सटाणा तालुक्यात तुरळक ठिकाणी फळबागांसह उसाची पिके आडवी झाली. सायंकाळी वारा अधिक असल्याने शेतकरी धास्तावले होते. 

इगतपुरी-त्र्यंबकेश्‍वरकडून जाणारे वादळ दक्षिणेकडे झुकल्याने ते इगतपुरीतून पूर्वेकडे सिन्नर-येवला या पूर्व भागातील तालुक्यांमध्ये झेपावले. दुपारनंतर जोरदार वारे वाहू लागल्याने सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील अनेक गावांमध्ये दाणादाण उडाली. जिल्ह्यात सर्वाधिक पाऊस सिन्नर तालुक्यात झाला. तर, सर्वांत कमी पाऊस नांदगाव तालुक्यात झाला. पूर्वेकडील तालुक्‍याच्या दिशेने घुसले. सिन्नर औद्योगिक वसाहतींना वादळाचा फटका बसला. यामुळे गुरुवारी (ता.४) नाशिक शहरासह सिन्नर औद्योगिक वसाहतीत पाणीपुरवठा होणार नसल्याचे यंत्रणेकडून सांगण्यात आले. 

नांदगाव तालुक्याच्या पूर्व भागात बोराळे येथे बी.डी राजपूत यांची काढणीसाठी आलेली केळी बाग जमीनदोस्त झाली. राहुरी येथे विजेच्या धक्‍क्‍याने महिला ठार झाली. निफाड तालुक्यात मोठ्या प्रमाणावर ऊस लागवडी आहेत. कसबे सुकेणे, थेरगाव परिसरात उसाचे पीक आडवे झाले. पिंपळगाव बसवंत परिसरात तीन मेंढ्या मृत्युमुखी पडल्या. द्राक्ष बागांमध्ये खरड छाटणीनंतर ज्या बागांना नवीन पालवी फुटून काडी तयार होत आहे, त्या नवीन काड्या बाधित झाल्या. 

बागलाण तालुक्यात चांगला पाऊस झाला. तालुक्यातील भाक्षी येथील शेतकरी गोरख रौदळ यांची डाळिंब बाग वाऱ्यामुळे उन्मळून पडली. चांदवड तालुक्यातील दह्याने येथे जीवन बाळासाहेब भवर यांची द्राक्षबाग वाऱ्याच्या तडाख्यात लोखंडी अँगल वाकल्याने आडवी झाली. त्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून घेतली जात आहेत. येवला तालुक्यातील बुधवार(ता.३) रोजी पोल्ट्री शेडचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात आले. 
 


इतर ताज्या घडामोडी
‘जिल्हा परिषद, ग्रामपंचायत अधिकारी, ...मुंबई : कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
थेट विक्री बंदीची नोटीस मागे घ्या,...पुणे ः शेतकऱ्यांना पुणे शहरात थेट शेतमाल विक्रीला...
हमाल कोरोनाग्रस्त, जळगावात खतांचे रेक...जळगाव ः मालधक्क्यावर रेल्वे रेक रिकामे करणाऱ्या...
भात रोपवाटिकेत खोडकिडीचा प्रादुर्भावऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये खरिपातील भात पीक...
परभणीत भेंडी १२०० ते २००० रुपये...परभणी : ‘‘येथील पाथरी रस्त्यावरील फळे, भाजीपाला...
केळीवरील करपा रोगाचे नियंत्रणसध्या केळी पिकाच्या पील बागेत करपा रोगाचा...
वऱ्हाडातील शेतकऱ्यांचा सोयाबीनकडे अधिक...अकोला ः खरिपातील पेरण्या अंतिम टप्प्यात पोचल्या...
औरंगाबादमध्ये निम्म्याच शेतकऱ्यांची मका...औरंगाबाद  : जिल्ह्यात आधारभूत किमतीने भरड...
नांदेड, परभणी, हिंगोलीतील १२४ मंडळांत...नांदेड  ः नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील...
औरंगाबाद जिल्ह्यात आठवड्यात १५१ खत कृषी...औरंगाबाद : ‘‘कृषी विभाग व जिल्हा परिषद...
दुभत्या जनावरांच्या किमतीतही चाळीस...नगर ः दुधाचे दर कमी-जास्ती झाले की दुभत्या...
रत्नागिरीत नऊ हजार हेक्टरवर फळबाग...रत्नागिरी  ः कोरोनाच्या सावटातही जिल्ह्यात...
हमाल, मापाडी तोलणारांचे प्रश्‍न सोडवा ः...पुणे ः राज्यातील अनेक भागांत हमाल तोलाईदारांना...
खते, बी- बियाणे विक्रेत्यांची दुकाने...कोल्हापूर : निकृष्ट बियाणे प्रकरणी बियाणे...
‘सारथी’ बंद होणार नाही, आठ कोटींचा निधी...मुंबई : राज्य सरकारने मराठी तरुणांच्या व्यावसायिक...
फळपीक विमा योजना शेतकऱ्यांसाठी की कंपन्...नगर : नवीन निकषांप्रमाणे फळपीक विमा योजनेचा लाभ...
वऱ्हाडातील अडीच हजारांवर कृषी...अकोला ः कृषी विक्रेत्यांच्या विविध मागण्यांसाठी...
हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत ७१.२० टक्के...हिंगोली : जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात बुधवार...
पीकपद्धतीमधील बदल अधिक लाभदायक ः...अकोला ः रासायनिक खतांचा अवाजवी वापर, मशागतीच्या...
सोलापूर जिल्ह्याच्या वाट्याला ५६७ कोटी...सोलापूर : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...