Agriculture news in marathi Extreme rainfall in Marathwada on the roots of kharif crops | Agrowon

मराठवाड्यात अतिपाऊस खरीप पिकांच्या मुळावर

टीम अॅग्रोवन
रविवार, 20 सप्टेंबर 2020

औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून अनेक भागात कमी अधिक प्रमाणात सुरू असलेला पाऊस पिकांच्या मुळावर उठला आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात गत काही दिवसांपासून अनेक भागात कमी अधिक प्रमाणात सुरू असलेला पाऊस पिकांच्या मुळावर उठला आहे. आधी मुगाची नासाडी आणि आता काढणीला आलेल्या सोयाबीन, उडदाला त्याने दणका दिला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. 

पावसाच्या संततधारीने काढणीला आलेल्या मुगाचे अनेक भागात नुकसान झाले. आता उडीद, सोयाबीन भुईसपाट झाले आहे. औरंगाबाद, जालना, बीड, उस्मानाबाद, लातूर, परभणी हिंगोली, नांदेड या पाचही जिल्ह्यांत नदीकाठच्या, ओढ्याकाठच्या पिकांना पुराचा फटका बसला आहे.

परभणी जिल्ह्यात इंद्रायणी नदीला आलेल्या पुरामुळे सुक्रे पिंपळगाव, दैठना, इंदेवाडी, भारस्वाडा, हिंगोली जिल्ह्यात कयाधू नदीला पूर आला आहे. त्यामुळे सेनगाव, कळमनुरी आदी तालुक्यात पिकांमध्ये पाणी घुसून मोठे नुकसान झाले. 

उस्मानाबाद तालुक्यात कसबे तडवळेसह गोपाळवाडी, खामगाव, दुधगाव कोंबडवाडी, जवळे , रुई, तुगाव, खेड व कळंब तालुक्यातील वाघोली, सातेफळ सौंदणा, गौर, दहीफळ, सापनई या शिवारात जोरदार पाऊस पडला. लहान मोठ्या नदी नाल्या तुडुंब झाल्या. तेरणा नदी देखिल दुतर्फा भरुन वाहिली. पावसाच्या तडाख्यात उसाचे फड अक्षरशः जमीनदोस्त झाले. सोयाबीन पाण्यात बुडाले आहे. 

उसाचे पावसाच्या तडाख्याने होत्याचे नव्हते झाले. मोठी हानी झाली. एका रात्रीत वर्षभरातील कष्ट मातीमोल झाले. निसर्गाने भाकरीच हिरावून घेतली. 
- भागवत डोंगरे, शेतकरी सापनई, ता. कळंब 
..... 
शेवगळ परिसरात जोरदार पाऊस आसाच सुरू राहिला, तर सोयाबीन व कापूस ही पिके हाती लागणार नाहीत. मूग पीक हातचा गेला. आता सोयाबीन व कापूस पिकाला फटका बसला. 
- संदिप लोंढे- पाटील, शेवगळ, ता. घनसावंगी, जि. जालना 
.... 
पंधरवड्यापासून सतत पाऊस सुरू आहे. २ एकरातील सोयाबीन काढणीला आले. पाऊस लागून बसला. त्यामुळे मोठे नुकसान झाले. 
- ज्ञानोबा तिडके, पांगरी. ता, परळी, जि. बीड. 
 


इतर ताज्या घडामोडी
इगतपुरी, सिन्नर तालुक्यात पावसामुळे...नाशिक : दसरा व दिवाळी सणाची बाजारपेठ समोर ठेऊन...
सांगली जिल्ह्यात अतिवृष्टीचा १७ हजार...सांगली : जिल्ह्यात गेल्या पंधरा दिवसांपूर्वी...
खानदेशात दुष्काळी भागात मुबलक जलसाठा जळगाव ः खानदेशातील आवर्षप्रवण भागातील  ...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेसहा हजार...सिंधुदुर्ग : जिल्ह्यात परतीच्या पावसाने नुकसान...
सांगली जिल्ह्यात द्राक्षबागा...सांगली : गेल्या वर्षी झालेल्या अतिवष्टीमुळे...
शेतकऱ्यांना नुकसान भरपाईची प्रतीक्षाअकोला ः शासनाने शुक्रवारी (ता.२३) जाहीर...
पुण्यात दसऱ्यानिमित्त फुलबाजार फुलला पुणे ः कोरोना संकटामुळे मार्चपासून सलग पाच...
सोयाबीनमध्ये तेजीचाच कलअकोला ः या हंगामातील सोयाबीन काढणी जोरात सुरू...
‘पाटबंधारे’च्या मनमानीमुळे शेतकऱ्यांचे...नाशिक : गेल्या २५ वर्षांपासून बागलाण तालुक्यातील...
सातारा जिल्ह्यास पावसाने पुन्हा झोडपलेसातारा ः जिल्ह्यातील माण, खटाव, कऱ्हाड,...
कापूस, मका हमीभावाकडे दुर्लक्षः...जळगाव ः कापूस, मका हे राज्यात महत्त्वाचे पीक...
वनाधिपती विनायकदादा पाटील यांचे निधन नाशिक: स्थानिक पातळीवरून थेट राज्याच्या राजकारणात...
औरंगाबादमध्ये कांदा सरासरी ३५०० रुपये औरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार...
राज्यातून मॉन्सून परतीच्या वाटेवर; पाऊस...महाराष्ट्रातून मॉन्सून बाहेर पडण्याच्या वाटेवर...
सांधेदुखी, सूजेवर आरोग्यदायी गोखरूगोखरू ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. या वनस्पतीला...
शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी प्रयत्न करु...सोलापूर : ‘‘अतिवृष्टी आणि पुरामुळे शेतपिकांचे...
खानदेशात पावसाने दाणादाण सुरूचजळगाव ः खानदेशात गेले दोन दिवस अनेक भागात मध्यम...
जिगाव प्रकल्पग्रस्तांना मिळणार योग्य...बुलडाणा ः जिगाव प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला...
सोलापुरात नुकसानग्रस्तांसाठी `रयत’चे...सोलापूर : सोलापूरसह संपूर्ण राज्यात अतिवृष्टीमुळे...
साताऱ्यात रब्बीची १२ टक्के क्षेत्रावर...सातारा : जिल्ह्यात परतीच्या पावसाने झोडपल्याने...