सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस
सातारा जिल्ह्यात सर्वदूर पाऊस

सातारा : जिल्ह्यात शुक्रवारी (ता.१८) सर्वदूर पावसाने कमी-अधिक हजेरी लावली. या पावसाने काढणीला आलेली पिके उगवणार असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. शनिवारी (ता.१९) सकाळी आठपर्यंत सरासरी ६.९९ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. 

जिल्ह्यात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत कमी अधिक स्वरूपात पावसाने हजेरी लावली आहे. दुष्काळी माण, फलटण, खटाव या तालुक्यांत पावसाचा जोर अधिक आहे. सध्या खरिपातील पहिल्या टप्प्यात पेरणी झालेली पिके काढणीला आहेत. पिके झडू लागल्याने काही शेतकऱ्यांकडून त्यांच्या काढणीस प्रारंभ झाला. मात्र वादळी पावसामुळे शेतकऱ्यांची झोप उडाली आहे. अतिवृष्टी, परतीच्या पावसातून वाचलेली पिकांना आता वादळी पावसाचा फटका बसू लागला आहे. 

शुक्रवारी सर्वच तालुक्यांत पावसाने हजेरी लावली. सोयाबीन काढणी पूर्णपणे ठप्प झाली आहे; तसेच काढून ठेवलेले पीक भिजल्याने नुकसान सुरू झाले आहे. भिजलेले सोयाबीन क्विंटलमागे ५०० ते ६०० रुपये कमी दर जात असल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागणार आहे. खरीप ज्वारी भिजल्याने ज्वारी काळी पडणार आहे. पाटण, जावळी तालुक्यातील भातपिकांचे मोठे नुकसान होणार आहे.

पश्चिमेकडील सातारा, कऱ्हाड, महाबळेश्वर, पाटण तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक आहे. शनिवारी सकाळपासून दुपारपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. अधूनमधून पावसाच्या दमदार सरी कोसळत होत्या. या पावसामुळे शेतीतील सर्व प्रकारची ठप्प झाली आहे. यामुळे नेत्यांना प्रचार करणे सोपे झाले असून शेतकऱ्यांच्या घरी जाऊन भेटीगाठी घेतल्या जात आहेत.  

रब्बीसाठी ठरणार फायेदशीर

दुष्काळी माण, खटाव, फलटण, कोरेगाव या तालुक्यांत रब्बी हा प्रमुख हंगाम असतो. याच तालुक्यात पावसाचे प्रमाण अधिक असल्याने रब्बी हंगामासाठी फायदेशीर ठरणार आहे. पावसाने उघडीप दिल्या दिल्या रब्बी ज्वारीसाठी मशागत, पेरणीची कामे सुरू होतील. या वेळी दुष्काळी तालुक्यात पाऊस वाढल्याने कांद्याच्या क्षेत्रातही वाढ होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com