सिंधुदुर्गात अतिवृष्टी, वादळामुळे सव्वा कोटींचे नुकसान 

निसर्ग चक्रीवादळ आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात घरे, गोठे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. आत्तापर्यंत जिल्ह्यात १ कोटी २२ लाख ७२ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे.
Extreme rainfall in Sindhudurg, loss of Rs 1 crore
Extreme rainfall in Sindhudurg, loss of Rs 1 crore

सिंधुदुर्ग ः निसर्ग चक्रीवादळ आणि त्यानंतर नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीने जिल्ह्यात घरे, गोठे आणि सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. आत्तापर्यंत जिल्ह्यात १ कोटी २२ लाख ७२ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. परंतु प्रत्यक्षात घरे आणि गोठ्यांच्या नुकसानीपोटी ११ लाख ८९ हजार रूपयांचे वितरण नुकसानग्रस्तांना करण्यात आले आहे. निधीअभावी उर्वरित नुकसानग्रस्तांना निधी वितरण करण्यात आलेला नाही. 

जिल्ह्यात यावर्षी जूनच्या पहिल्याच आठवड्यात मुसळधार पाऊस झाला. त्यानंतर चक्रीवादळाचा किनारपट्टीला तडाखा बसला. चक्रीवादळामुळे जिल्ह्यात अतिवृष्टी झाली. याशिवाय जोरदार वाऱ्यांमुळे जिल्ह्यात मोठे नुकसान झाले. दरम्यान ३ जुलैपासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. जिल्ह्यांच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे पुरसदृश्‍य स्थिती निर्माण झाली. पुराचे पाणी घरे, गोठ्यांमध्ये घुसून मोठे नुकसान झाले. 

कुडाळ, मालवण, वेंगुर्ला, सांवतवाडी तालुक्याला तर पावसाने अक्षरक्षः झोडपून काढल्यामुळे या भागाला पुराचा मोठा तडाखा बसला. या भागातील नुकसानीचा आकडा मोठा आहे. पूर ओसरल्यानंतर महसूल विभागाकडून नुकसानीचे पंचनाम्याना सुरुवात करण्यात आली होती. आत्तापर्यंत झालेल्या नुकसानीचे मालमत्ता नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाले आहे. 

जिल्ह्यात आत्तापर्यंत १५५ घरांचे नुकसान झाले असून त्यातील आठ घरांची पूर्णतः पडझड झाली आहे. तर उर्वरित घरांचे अशंतः नुकसान झाले आहे. तसेच २६ गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. घरे आणि गोठे मिळून जिल्ह्यात सुमारे ११ लाख ८९ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. १५५ पैकी ९८ घरे नुकसानीस पात्र ठरली असून घरे आणि गोठ्यांची नुकसानभरपाई नुकसानग्रस्तांना देण्यात आली आहे. १७ सार्वजनिक मालमत्ताचे सुमारे ७० लाख ८७ हजार रुपयांचे नुकसान झाले. याशिवाय २७ खासगी मालमत्ता बाधीत झाल्या असून त्याचे ३९ लाख ९५ हजार रूपयांचे नुकसान झाले आहे. 

अतिवृष्टीमुळे भातशेती, फळबागांचे नुकसान झाले आहे. परंतु या नुकसानीचे पंचनामे अद्याप कृषी विभागाकडून अजूनही सुरू आहेत. त्यामुळे शेतीच्या नुकसानीमुळे आकडा वाढण्याची शक्यता आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com