Agriculture news in Marathi Eyes watered again in 'Antim Ardas' ... | Agrowon

‘अंतिम अरदास’मध्ये पुन्हा पाणावले डोळे...

टीम अॅग्रोवन
बुधवार, 13 ऑक्टोबर 2021

तिकोनिया येथे शेतकरी हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्यांकरिता आयोजित ‘अंतिम अरदास’ या धार्मिक विधी कार्यक्रमास सुमारे १० हजार शेतकरी उपस्थित होते.

लखीमपूर खेरी, उत्तर प्रदेश : येथील तिकोनिया येथे शेतकरी हत्याकांडात मृत्युमुखी पडलेल्यांकरिता आयोजित ‘अंतिम अरदास’ या धार्मिक विधी कार्यक्रमास सुमारे १० हजार शेतकरी उपस्थित होते. या वेळी मृतांच्या आत्म्यास शांततेकरिता प्रार्थना होऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. याप्रसंगी कुटुंबीयांसह उपस्थितांचे डोळे पाणावले. 

लखीमपूर खेरी येथे केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात ३ ऑक्टोबरला शांततापूर्ण निदर्शने करणाऱ्या शेतकऱ्यांच्या अंगावर निदर्यपणे गाडी घातल्याच्या घटनेत चार शेतकऱ्यांसह एका पत्रकाराचा मृत्यू झाला होता. यात मृत्युमुखी पडलेल्याकरिता ‘अंतिम अरदास’चे मंगळवारी (ता.१२) आयोजन करण्यात आले होते. उत्तर प्रदेशासह विविध राज्यांतून शेतकरी, शेतकरी नेते विविध क्षेत्रांतील मान्यवर आणि नागरिक याप्रसंगी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर शहीद शेतकऱ्यांचे अस्थींचे कलश विविध राज्यांत दर्शनाकरिता रवाना करण्यात आले. 

प्रियंका, जयंतसिंह यांची उपस्थिती
काँग्रेसच्या महासचिव प्रियंका गांधी, राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंतसिंह या वेळी उपस्थित होते.

अंतिम अरदास म्हणजे...
शीख धर्मीयांत जेव्हा कोणाचा मृत्यू होतो, त्या व्यक्तीकरिता सातव्या दिवसापासून अखंडित (२४ तास) गुरुग्रंथसाहिब यांचे पठण केले जाते. दर दोन तासांनी एकजण हे पठण करतो, असे सलग तीन दिवस चालते, शेवटी १०व्या दिवशी हे धार्मिक पठण पूर्ण होते, त्या वेळी मृताच्या आत्म्यास शांतता मिळण्याकरिता देवाकडे प्रार्थना केली जाते. या दहाव्या दिवसाला ‘अंतिम अरदास’ असे म्हटले जाते.
 


इतर अॅग्रो विशेष
लखीमपूर खेरी घटनेतील  शेतकऱ्यांच्या...वर्धा : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी येथे भाजप...
राज्यभरात निघणार लखीमपूर खेरी  किसान...  नाशिक : उत्तर प्रदेशमधील लखीमपूर खेरी...
गोड्या पाण्यात निर्यातक्षम व्हेमानी...गोड्या पाण्यात कोळंबी व त्यातही ‘व्हेनामी’ जातीचे...
‘ऑयस्टर’ मशरूमला मिळवली बाजारपेठसांगली जिल्ह्यातील बावची येथील प्रदीप व राजेंद्र...
कृषी विकासाचे भगीरथ ठरलेल्या...पुणे : कष्टकरी शेतकऱ्यांच्या मनगटाला बारा...
राज्यात ‘ऑक्टोबर हीट’चा प्रभावपुणे : राज्याच्या तापमानात चढ-उतार सुरूच आहेत....
शेती, पर्यावरण संवर्धनातून वाघापूरची...पुणे जिल्ह्यात वाघापूर गावाने लोकसहभागातून आपले...
भाजपतर्फे एक नोव्हेंबरला काळ्या फिती...परभणी : मराठवाडा, विदर्भातील अतिवृष्टिग्रस्त...
नाशिक :कांदा व्यापाऱ्यांवर आयकर...नाशिक : जिल्ह्यात कांदा विक्रीसाठी आघाडीवर...
गुजरातमधून गुळाला मागणी वाढलीकोल्हापूर : यंदा गुजरातमधून गुळाला मागणी वाढत आहे...
अनिश्‍चित काळासाठी रस्ते अडविता येणार...नवी दिल्ली ः आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांना अधिकार...
निर्यात पडतळमुळे सोयाबीन दराला आधारपुणे : देशात सोयापेंडचे दर अधिक होते त्यामुळे...
राज्याच्या तापमानात चढ-उतारपुणे : राज्यात पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमानात...
हडपलेला शेतकरीवाटा जमा करण्यासाठी नोटिसापुणे ः राज्यात शेती अवजारे न वाटताच कोट्यवधी...
शेतकरी आंदोलक नव्या रणनीतीच्या तयारीतनवी दिल्ली : तीन कृषी कायद्यांविरोधातील १०...
अॅपलबेरचे निर्यातक्षम उत्पादन. पुणे जिल्ह्यातील खानापूर (ता. जुन्नर) येथील...
सुयोग्य व्यवस्थापनातून हरभरा पिकात तयार...बुलडाणा जिल्ह्यातील सवडद येथील विनोद देशमुख यांनी...
विपरीत परिस्थितीत तग धरणाऱ्या...नागपूर ः दुष्काळी भागात नाचणी पीक तग धरू शकते....
दिवाळीनंतरच कृषी महाविद्यालये गजबजणारपुणे ः राज्यात कोविडमुळे बंद पडलेले कृषी...
यूपी सरकारची भूमिका वेळकाढूपणाचीनवी दिल्ली ः उत्तरप्रदेशातील लखीमपूर खिरी येथील...