एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली नाही तर भाजपविरोधी भूमिका घेणार; भुसावळात लेवा पाटीदार समाजाचा इशारा

एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली नाही तर भाजपविरोधी भूमिका घेणार
एकनाथ खडसेंना उमेदवारी दिली नाही तर भाजपविरोधी भूमिका घेणार

भुसावळ, जि. जळगाव  : मुंबई, कल्याण, पुणे, नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्रातातील एकूण विधानसभा मतदारसंघात लेवा पाटीदार समाजाची मते ही निर्णायक आहेत, समाजाचे नेते आमदार एकनाथ खडसे यांना भाजपने उमेदवारांच्या दुसऱ्या यादीत सन्मानजनक स्थान न दिल्यास, प्रसंगी पक्षविरोधी भूमिकादेखील घेण्याचा इशारा भोरगाव लेवा पंचायतचे कुटुंबनायक रमेश विठू पाटील यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला आहे. या वेळी श्री. पाटील म्हणाले, की लेवा पाटीदार समाज हा संपूर्ण महाराष्ट्रात विखुरलेला आहे. समाजात आदराचे स्थान असलेले आमदार खडसे यांना भाजपकडून गेली तीन वर्ष अपमानजनक वागणूक दिली जात आहे.  सर्व समाज आजही आमदार खडसेंसोबत अर्थात भाजप सोबतच आहोत. भाजपने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. यात श्री. खडसे यांचे नाव नाही, ही बाब समाजासाठी अपमानजनक आहे, याचा आम्ही निषेध करतो. पक्षाच्या या निर्णयाने समाजात नाराजी पसरली आहे. आमदार खडसे यांच्यामुळे भाजपला जिल्ह्यात नव्हे तर राज्यात चांगले दिवस आले. तरीही पक्षाने त्यांच्याशी दगाफटका केला आहे, हे आम्ही कदापि सहन करू शकत नाही. यासाठी येत्या दोन दिवसांत मोठी व निर्णायक भूमिका लेवा पाटीदार समाज घेईल, असा इशारा देखील दिला.  या पत्रकार परिषदेत भुसावळ-पाडळसे भोरगाव पंचायतीचे प्रमुख सुहास चौधरी, सदस्य ॲड. प्रकाश पाटील, डॉ. नरेंद्र कोल्हे, डॉ. बाळू पाटील, आरती चौधरी, मंगला पाटील आदी उपस्थित होते. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com