शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास गाठ आमच्याशी : आदित्य ठाकरे

शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास गाठ आमच्याशी : आदित्य ठाकरे
शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास गाठ आमच्याशी : आदित्य ठाकरे

नाशिक  : ‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांवर आलेले हे संकट मोठे आहे. पंचनामे वेगाने होऊन सर्वांना मदत मिळाली पाहिजे. काही बरे-वाईट करण्याचा विचार करू नका, मला हाक मारा. शिवसेना शेतकऱ्यांसोबत आहे. ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे. नुकसानभरपाई कर्जमाफीसाठी कटिबद्ध असून, केंद्राने भरीव मदत करायला हवी. विमा कंपनी व अन्य कोणी शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न केल्यास त्याची गाठ आमच्याशी आहे’, असा इशारा युवा सेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी दिला. आमदार आदित्य ठाकरे हे नुकसान झालेल्या भागांची पाहणी करण्यासाठी एकदिवसीय दौऱ्यावर सोमवारी (ता. ४) आले होते. मालेगाव तालुक्यातील दाभाडी येथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर  चांदवड तालुक्यातील वडनेर भैरव येथे आदित्य ठाकरे यांनी शेतकऱ्यांना आश्वासन देत नुकसान झालेल्या बागेची पाहणी केली. दौऱ्यात शिवसेना विधिमंडळ नेते एकनाथ शिंदे, शिवसेना संपर्कप्रमुख भाऊ चौधरी, आ. नरेंद्र दराडे, सुहास कांदे, माजी आ. अनिल कदम, शांताराम ठाकरे सहभागी झाले होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com