agriculture news in marathi, facilitation center at taluka agricultural Office for crop insurance application, mumbai, maharashtra | Agrowon

पीकविमा अर्ज करण्यासाठी तालुका कृषी कार्यालयात सुविधा केंद्र ः कृषिमंत्री
टीम अॅग्रोवन
बुधवार, 26 जून 2019

मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात घेता विमा कंपन्यांवर संपूर्ण देखरेख ठेवण्यात येणार आहे. विम्याचे तसेच नुकसानभरपाईचे अर्ज भरण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुविधा केंद्र सुरू करण्यात येतील, असे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी सोमवारी (ता. २४) विधानसभेत जाहीर केले.

मुंबई ः पीकविम्याबाबतच्या तक्रारी लक्षात घेता विमा कंपन्यांवर संपूर्ण देखरेख ठेवण्यात येणार आहे. विम्याचे तसेच नुकसानभरपाईचे अर्ज भरण्यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालयात सुविधा केंद्र सुरू करण्यात येतील, असे कृषिमंत्री अनिल बोंडे यांनी सोमवारी (ता. २४) विधानसभेत जाहीर केले.

नियम २९३ नुसार झालेल्या दुष्काळावरील चर्चेला उत्तर देताना कृषिमंत्री बोंडे बोलत होते. ते म्हणाले, की पीकविमा योजनेच्या अनुषंगाने येणाऱ्या तक्रारी पाहता कंपन्यांवर संपूर्ण देखरेख करण्यात येणार आहे. या कंपन्यांचे जिल्हास्तरावर स्वतंत्र कार्यालय असणे आवश्यक राहील. त्यांना जागा नसल्यास जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात जागा उपलब्ध करून देण्यात येईल. या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी प्रत्येक तालुका कृषी अधिकारी कार्यालयात थांबणे आवश्यक असेल. तसेच तालुका तसेच जिल्हास्तरीय तक्रार निवारण व्यवस्था काटेकोरपणे राबविण्यात येईत. सध्याच्या खरीप हंगामासाठी पीकविमा अर्ज भरण्याची प्रक्रिया पाहता तालुका स्तरावर सुविधा केंद्र सुरू करण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील संबंधित विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर यासाठी समन्वयाची जबाबदारी देण्यात आली आहे. तसेच कृषी सहसंचालक हे याबाबतचा दर पंधरा दिवसांनी आढावा घेऊन नियंत्रण करणार आहेत.

पीकविमा योजनेमध्ये नुकसानभरपाईचे प्रमाण (पे-आउट) वाढावे यासाठी जोखीम स्तर ७० टक्क्यांवरून वाढविण्याच्या उद्देशाने केंद्र शासनाकडे प्रयत्न करण्यात येईल. कर्जदार शेतकऱ्यांप्रमाणेच बिगरकर्जदार शेतकऱ्यांनीही पीकविमा काढला पाहिजे यासाठी राज्य शासनाकडून विशेष प्रयत्न करण्यात येतील. गतवर्षी ९१ लाख शेतकऱ्यांनी विमा काढला आणि ८७.४ टक्के परतावा देण्यात आला. विमा कंपनीने विलंबाने नुकसानभरपाई दिल्यास विलंबाच्या कालावधीसाठी १२ टक्के व्याज वसूल करण्याची तरतूद करण्यात आली आहे, असेही श्री. बोंडे यांनी सांगितले.

अमरावती विभागात १३ हजार हेक्टरवरील आणि नागपूरमधील ५ हजार हेक्टरवरील वाळलेल्या संत्रा बागांसाठी शेतकऱ्यांना मदत देणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनेत या शेतकऱ्यांना प्राधान्य देण्यात येऊन त्यांच्या फळबागा पुनरुज्जीवित करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही श्री. बोंडे या वेळी त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

या प्रस्तावावरील चर्चेत सदस्य बाळासाहेब थोरात, अजित पवार, सुभाष साबणे, राजेश टोपे, राजेंद्र पाटनी, राजाभाऊ वाजे, वीरेंद्र जगताप, शंभूराज देसाई, गणपतराव देशमुख, बाळासाहेब पाटील, राहुल कुल, श्रीमती मनीषा चौधरी आदी सदस्यांनी भाग घेतला.

इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्याला पावसाने झोडपलेरत्नागिरी ः मुसळधार पावसाने जिल्ह्याला चांगलेच...
गोसे खुर्दमधून होणार चार हजार हेक्‍टरवर...चंद्रपूर ः धानपट्ट्यात पावसाअभावी अस्वस्थता आहे....
नाशिक जिल्ह्यात धरणांच्या तपासणीसाठी...नाशिक : जिल्ह्यातील धरणांच्या सुरक्षितेतसाठी...
पेठ तालुक्यात जमिनीतून निघताहेत...नाशिक : पेठ तालुक्यातील निरगुडे गावात दोन...
जळगावात लाल कांद्याचे दर आणि आवक टिकूनजळगाव ः जिल्ह्यातील प्रमुख बाजार, उपबाजारांमध्ये...
नाशिकमध्ये हिरवी मिरची प्रतिक्विंटल...नाशिक ः नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये चालू...
पुणे, नगर जिल्ह्यात पावसाअभावी चारा...पुणे  : पावसाळ्यात जनावरांसाठी चाऱ्याची अडचण...
`स्वाभिमानी`चे नाशिक जिल्हा बॅंकेसमोर...नाशिक : जिल्हा बँक ही शेतकऱ्यांची बँक आहे. ती...
आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली...मुंबई   : युवा सेनाप्रमुख आदित्य ठाकरे...
नवती केळी दरात सुधारणाजळगाव  ः खानदेशात दर्जेदार नवती केळीच्या...
रत्नागिरीत भात लागवड अंतिम टप्प्यातरत्नागिरी   ः जिल्ह्यात उशिरा पण...
रत्नागिरी जिल्ह्यातील आठ हजार शेतकरी...रत्नागिरी : छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान...
नगर जिल्ह्यातील ४८२ गावांमध्ये...नगर  ः पावसाळ्याचा एक महिना उलटून गेला असला...
नाशिकमध्ये ७९१ कोटींच्या प्रारूप...नाशिक : पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या...
दक्षिण महाराष्ट्रात देशी बेंदूर...कोल्हापूर : वर्षभर काबाडकष्ट करणाऱ्या...
सांडपाणी प्रक्रियेची ‘रीड बेड पद्धती’रीड बेड पद्धतीची सांडपाणी शुद्धीकरणाची...
‘शेतकरी सन्मान’साठी रत्नागिरीतील दीड...रत्नागिरी   : पंतप्रधान शेतकरी सन्मान...
वृक्ष संवर्धनासाठी नागरिक, कर्मचारी...परभणी ः वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
नांदेड जिल्ह्यात साडेपाच लाख हेक्टरवर...नांदेड ः नांदेड जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
...तर रासायनिक खते, कीटकनाशकांचे ...पुणे  ः  केंद्र सरकारच्या वतीने झिरो...