जळगाव  : आधार प्रमाणीकरण करण्यासाठी प्रत्येक गावात उद्यापासून सुविधा

आधार प्रमाणीकरण करण्यासाठी प्रत्येक गावात उद्यापासून सुविधा
आधार प्रमाणीकरण करण्यासाठी प्रत्येक गावात उद्यापासून सुविधा

जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने २०१९ अंतर्गत आज हिंगोणे (ता. यावल, जि. जळगाव) व कराडी (ता. पारोळा, जि. जळगाव) येथे शेतकरी आधार प्रमाणीकरणाच्या दुसऱ्या दिवशी एकूण १८६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले. शेतकऱ्यांच्या प्रमाणीकरणासाठी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ७५० थम्ब मशीन खरेदी करण्यात येणार आहे. शुक्रवारपासून (ता.२८) आधार प्रमाणीकरणासंबंधीची सुविधा प्रत्येक गावात उपलब्ध केली जाणार असल्याचे सांगण्यात आले.  कर्जमुक्ती योजनेत १ लाख ७३ हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. कर्जमुक्ती योजनेंतर्गत हिंगोणे (ता. यावल) येथे १३८ पात्र लाभार्थी असून, १२० शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्यात आली आहे. त्यातील १०१ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. कराडी (ता. पारोळा) येथे ८२ पात्र लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. पैकी ७८ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्यातील ७५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले.  या योजनेंतर्गत जिल्हा बॅंकेच्या १ लाख ५१ हजार २०१ पात्र शेतकऱ्यांचे खाते आहेत. त्यांपैकी पोर्टलवर अपलोड केलेल्या कर्ज खात्यांची संख्या १ लाख ४९ हजार ७०७ आहे. अपलोड केलेल्या कर्जखात्यांपैकी यशस्वीरीत्या पोर्टलवर दाखल झालेल्या कर्ज खात्यांची संख्या १ लाख ४९ हजार ७०७ आहे.  मार्चअखेर रक्कम खात्यात  जिल्ह्यातील कर्जमुक्तीस पात्र शेतकऱ्यांची यादी शुक्रवारी जाहीर होणार आहे. त्या शेतकऱ्यांचे त्या त्या गावात प्रमाणीकरण होणार आहे. त्यासाठी तलाठी, सर्व रेशन दुकानदार, ग्रामपंचायत, आपले सेवा सरकार आदी महत्त्वाच्या ठिकाणी प्रमाणीकरणाची सोय आहे. पाच हजारांवर ठिकाणी ही सुविधा असेल. ७५० नवीन थम्ब मशीन जिल्हा प्रशासनाने खरेदी केली आहेत. यामुळे अवघ्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण होईल. मार्चअखेर शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम पडण्याची शक्‍यता आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com