Agriculture news in marathi Facility for every village from tomorrow to validate Aadhar | Agrowon

जळगाव  : आधार प्रमाणीकरण करण्यासाठी प्रत्येक गावात उद्यापासून सुविधा

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने २०१९ अंतर्गत आज हिंगोणे (ता. यावल, जि. जळगाव) व कराडी (ता. पारोळा, जि. जळगाव) येथे शेतकरी आधार प्रमाणीकरणाच्या दुसऱ्या दिवशी एकूण १८६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या प्रमाणीकरणासाठी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ७५० थम्ब मशीन खरेदी करण्यात येणार आहे. शुक्रवारपासून (ता.२८) आधार प्रमाणीकरणासंबंधीची सुविधा प्रत्येक गावात उपलब्ध केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

जळगाव  : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने २०१९ अंतर्गत आज हिंगोणे (ता. यावल, जि. जळगाव) व कराडी (ता. पारोळा, जि. जळगाव) येथे शेतकरी आधार प्रमाणीकरणाच्या दुसऱ्या दिवशी एकूण १८६ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण करण्यात आले.

शेतकऱ्यांच्या प्रमाणीकरणासाठी विशेष बाब म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे ७५० थम्ब मशीन खरेदी करण्यात येणार आहे. शुक्रवारपासून (ता.२८) आधार प्रमाणीकरणासंबंधीची सुविधा प्रत्येक गावात उपलब्ध केली जाणार असल्याचे सांगण्यात आले. 

कर्जमुक्ती योजनेत १ लाख ७३ हजार शेतकऱ्यांची माहिती अपलोड करण्यात आली आहे. कर्जमुक्ती योजनेंतर्गत हिंगोणे (ता. यावल) येथे १३८ पात्र लाभार्थी असून, १२० शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अद्ययावत करण्यात आली आहे. त्यातील १०१ शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण झाले आहे. कराडी (ता. पारोळा) येथे ८२ पात्र लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत करण्यात आली आहे. पैकी ७८ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे. त्यातील ७५ शेतकऱ्यांचे आधार प्रमाणीकरण झाले. 

या योजनेंतर्गत जिल्हा बॅंकेच्या १ लाख ५१ हजार २०१ पात्र शेतकऱ्यांचे खाते आहेत. त्यांपैकी पोर्टलवर अपलोड केलेल्या कर्ज खात्यांची संख्या १ लाख ४९ हजार ७०७ आहे. अपलोड केलेल्या कर्जखात्यांपैकी यशस्वीरीत्या पोर्टलवर दाखल झालेल्या कर्ज खात्यांची संख्या १ लाख ४९ हजार ७०७ आहे.

 मार्चअखेर रक्कम खात्यात 
जिल्ह्यातील कर्जमुक्तीस पात्र शेतकऱ्यांची यादी शुक्रवारी जाहीर होणार आहे. त्या शेतकऱ्यांचे त्या त्या गावात प्रमाणीकरण होणार आहे. त्यासाठी तलाठी, सर्व रेशन दुकानदार, ग्रामपंचायत, आपले सेवा सरकार आदी महत्त्वाच्या ठिकाणी प्रमाणीकरणाची सोय आहे. पाच हजारांवर ठिकाणी ही सुविधा असेल. ७५० नवीन थम्ब मशीन जिल्हा प्रशासनाने खरेदी केली आहेत. यामुळे अवघ्या पंधरा दिवसात जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांचे प्रमाणीकरण होईल. मार्चअखेर शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम पडण्याची शक्‍यता आहे.


इतर बातम्या
नगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...
घनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...
अकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...
पंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...
वाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती  ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...
हिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...
नगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...
परभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
जळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव  ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...
कऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला  कऱ्हाड, जि.सातारा  :  कऱ्हाड शहरातील...
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...
सोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...
सोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...
खुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...
निफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...