Agriculture news in marathi Of factories in the district A look at the sugarcane in Khandesh | Page 2 ||| Agrowon

परजिल्ह्यातील कारखान्यांची खानदेशातील उसावर नजर

टीम अॅग्रोवन
शनिवार, 19 सप्टेंबर 2020

जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा बऱ्यापैकी आहे. त्यातच कारखान्यांची संख्या खानदेशात वाढत आहे. यात आपल्याला उसाची टंचाई भासू नये, यासाठी खानदेशातील कारखान्यांतर्फे उत्पादकांसोबत बैठका घेतल्या जात आहेत.

जळगाव ः खानदेशात उसाचे क्षेत्र यंदा बऱ्यापैकी आहे. त्यातच कारखान्यांची संख्या खानदेशात वाढत आहे. यात आपल्याला उसाची टंचाई भासू नये, यासाठी खानदेशातील कारखान्यांतर्फे उत्पादकांसोबत बैठका घेतल्या जात आहेत. गाळपाची तयारी यापूर्वीच करण्यात आली आहे. आता थेट उत्पादकांच्या गाठीभेटी घेतल्या जात आहेत.

याशइवाय नाशिक व औरंगाबाद जिल्ह्यातील काही कारखान्यांची नजरही खानदेशातील कारखान्यांवर आहे.
खानदेशात खासगी कारखान्यांची संख्या वाढली आहे. यामुळे ऊस लागवडही वाढत आहे. खानदेशात सुमो २५ हजार हेक्टरवर ऊस आहे. यात सर्वाधिक १२ हजार हेक्टरवर नंदुरबार जिल्ह्यात ऊस आहे. नंदुरबार एक खासगी व दोन सहकारी साखर कारखाने सुरू होतील. शिवाय गुजरातमध्येही तळोदा, शहादामधील काही ऊस उत्पादक आपल्या उसाची विक्री करतात.

शिरपूर (जि.धुळे) तालुक्यातही सावेर येथे खासगी कारखाना सुरू होत आहे. या कारखान्याकडून शिरपूर, चोपडा भागात खरेदी केली जाईल. तसेच चाळीसगाव (जि.जळगाव) मधील भोरस येथेही खासगी कारखाना यंदा जोमात सुरू होणार आहे. चाळीसगाव तालुक्यात  सुमारे साडेचार हजार हेक्टरवर ऊस आहे.

या भागात नगर व नाशिकमधील खासगी कारखानेदेखील उसाची खरेदी करतात. यामुळे उसाची पळवापळवी यंदा होईल.गणपूर (ता.चोपडा) येथे नुकतीच एका खासगी कारखान्याच्या व्यवस्थापनाने शेतकऱ्यांसोबत बैठक घेतली व आपली भूमिका मांडली. 


इतर ताज्या घडामोडी
केंद्र्याच्या कृषी कायद्यांविरोधातील २७...कोल्हापूर : शेतकरीविरोधी कायदे मागे घ्यावेत,...
देवसंस्थांच्या जमिनीवर वहिवाटदारांचा...जेजुरी, जि. पुणे : देवसंस्थानच्या मालकीच्या...
पुरस्कारांच्या प्रस्तावावरून कृषी...अकोला : विविध पुरस्कारांसाठी शेतकऱ्यांनी दाखल...
कोयना धरणात १०१ टीएमसीवर पाणीसाठाकोयनानगर, जि. सातारा : शंभर दिवस ओलांडलेल्या...
उजनी धरणात उपयुक्त साठा ६४ टक्केच;...सोलापूर : उजनी धऱणाच्या पाणलोट क्षेत्रात अद्यापही...
अकोला जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करा...अकोला ः जिल्ह्यात अतिपावसाने धुमाकूळ घातला असून...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
वाशीम झेडपी निवडणुकीचा चेंडू पुन्हा...वाशीम : सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रिक्त...
‘एफआरपी’च्या तुकड्यांनी शेतकरी...कऱ्हाड, जि. सातारा : एकरकमी ‘एफआरपी’चे तीन तुकडे...
हिंगोलीत मुहूर्ताच्या सोयाबीनला ११ हजार...हिंगोली : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत...
पीक नुकसान नोंदीसाठी विमा कंपन्यांच्या...परभणी : ७२ तासांच्या आत पीक नुकसानीची नोंद...
राज्यसभेच्या एका जागेसाठी ४ ऑक्टोबरला...नवी दिल्ली : महाराष्ट्रातून राज्यसभेवर रिक्त...
गणेशोत्सवासाठी सिंधुदुर्ग सज्ज; तीन...सिंधुदुर्गनगरी : घरोघरी गणेशोत्सव साजरा करण्याची...
ई-पीक पाहणीसाठी सोलापुरचे जिल्हाधिकारी...सोलापूर ः माढा तालुक्यात सुरू असलेल्या ई-पीक...
परभणी जिल्ह्यात १२७ गावे बाधितपरभणी ः जिल्ह्यात सोमवार (ता. ६) ते मंगळवार (ता....
हतनूर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरूभुसावळ, जि. जळगाव : तालुक्यातील हतनूर धरणात...
संगणकीय सातबारावर कुळांची नावे नोंद करागडहिंग्लज, जि. कोल्हापूर : हस्तलिखित सातबारा...
पावसाचा २७ हजार हेक्टरला फटकानाशिक : नांदगाव तालुक्यातील झालेल्या...
सहा हजार क्विंटल धान्याचे होणार कंपोस्ट...भंडारा : वैनगंगा नदीला आलेल्या पुरामुळे गेल्या...
शेतकरी पुरस्कारासाठी दाखल केलेले...अकोला : शेतीत विविध प्रयोग करणाऱ्या, उत्पादन...