पंढरपुरातील कारखान्यांचे अर्थकारण बिघडले : पवार

सोलापूर : ‘‘पंढरपूर तालुक्‍यातील साखर कारखानदारी सध्या संकटात आहे. त्यातही ‘विठ्ठल''ची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. ती सुधारण्यासाठी सर्व जुन्या नेत्यांना सोबत घेऊन यापुढच्या काळात प्रयत्न करावे लागतील’’ : शरद पवार
 Factories in Pandharpur deteriorate: Pawar
Factories in Pandharpur deteriorate: Pawar

सोलापूर  : ‘‘पंढरपूर तालुक्‍यातील साखर कारखानदारी सध्या संकटात आहे. त्यातही ‘विठ्ठल''ची आर्थिक स्थिती चिंताजनक आहे. ती सुधारण्यासाठी सर्व जुन्या नेत्यांना सोबत घेऊन यापुढच्या काळात प्रयत्न करावे लागतील’’, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी शुक्रवारी (ता.१८) व्यक्त केले. 

पवार यांनी (कै.) आमदार भारत भालके यांच्या कुटुंबीयांची सरकोली येथे भेट घेतली. त्यानंतर झालेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी मंगळवेढा तालुक्‍यातील पाणी प्रश्न आणि साखर कारखान्याच्या प्रश्नासंबंधी केलेल्या कामाच्या अनेक आठवणी पवार यांनी सांगितल्या. 

पवार म्हणाले, ‘‘आमदार भालके यांनी गेल्या अनेक वर्षांच्या काळात शेतकरी सभासद आणि सर्वसामान्य लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक केली. पंढरपूरच्या विकासाचा त्यांनी ध्यास घेतला. याच ध्यासाने त्यांची प्रकृती नाजूक झाली होती. थोड्या दिवसांनी मी परत येणार आहे. पंढरपूरच्या साखर कारखान्याचे अर्थकारण बिघडले आहे. त्याच्यावर सगळ्यांना सोबत घेऊन विचारविनिमय करावा लागणार आहे. शेतकऱ्यांच्या उसाचे गाळप पूर्ण करण्याच्या दृष्टीने यापुढे प्रयत्न करावे लागतील.’’ 

‘‘भालके कुटुंबावर यापुढे माझे कायम लक्ष आहे. कोणीही काळजी करू नये. आपला प्रपंच आणि संसार नीट चालावा अशी अपेक्षा असते. अर्थकारण बिघडून केलेल्या राजकारणात माझ्यासारख्याला फार रस नाही,’’ असे पवार यांनी सांगितले.

या वेळी पालकमंत्री दत्तात्रेय भरणे, माजी आमदार दीपक साळुंखे, कल्याणराव काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळिराम साठे, आमदार संजय शिंदे, राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील आदी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com