कारखान्यांनी ऊसतोड मजुरांचा विमा उतरवावा

कारखान्यांनी ऊसतोड मजुरांचा विमा उतरवावा
कारखान्यांनी ऊसतोड मजुरांचा विमा उतरवावा

सांगली : साखर कारखान्यांच्या गळीत हंगामासाठी राज्याच्या विविध भागांतून ऊस तोडीसाठी मजूर जिल्ह्यात आले आहेत. त्यांच्या अपघाताचे प्रमाण वाढत आहे. त्यांची सुरक्षा महत्त्वाची आहे. त्यामुळे साखर कारखान्यांनी त्यांचा विमा उतरवावा, अशी सूचना उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी शुक्रवारी (ता.२८) केली. 

जिल्हाधिकारी कार्यालयात ऊसतोड मजुरांच्या प्रश्नांबाबत बैठक झाली. नाटेकर अध्यक्षस्थानी होते. या वेळी महाराष्ट्र जनविकास माथाडी ट्रान्सपोर्ट जनरल कामगार युनियनचे संस्थापक श्रीहरी लेंगरे, कामगार कल्याण आयुक्त कार्यालयाचे अधिकारी उपस्थित होते. जिल्ह्यातील सोळा कारखान्यांचे गाळप सुरू आहे. ऊस वाहतूक करणाऱ्या वाहनांचे अपघात, ऊस भरताना होणारे अपघात, सर्पदंश असे प्रकार घडतात. यामुळे कारखान्यांनी मजुरांच्या सुरक्षेची दक्षता घेतली पाहिजे. त्यासाठी साखर कारखान्यांनी ऊसतोड मजुरांचा विमा उतरावा, अशा सूचना या वेळी देण्यात आल्या.

अपघातग्रस्त कामगारांना मदत देण्यासाठी कारखान्यांनी प्रयत्न करावे. त्यांच्या विम्याबाबत विमा कंपन्यांशी चर्चा करावी. त्याकडे कुणीही दुर्लक्ष करू नये, अन्यथा कारखान्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा नाटेकर यांनी दिला. काही साखर कारखान्यांनी विमा कंपन्यांशी करार केले. परंतु, त्याबाबतचा पाठपुरावा होत नसल्याचे आढळून आले. ऊसतोड कामगारांसाठी कल्याणकारी योजना आहेत, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी कारखान्यांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले. ऊसतोड मजुरांची जनावरे आली आहेत. त्यांना लाळखुरकतची लस देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.

साखर शाळा सक्षमपणे चालवा

ऊस तोडमजुरांच्या मुलांसाठी साखर शाळा सुरू आहेत. तेथे त्यांना नाष्टा आणि जेवण देण्यात येते. त्यांच्या आरोग्याची काळजी घेतली जाते. सध्या सुरू असलेल्या साखर शाळा सक्षमपणे चालवाव्यात, अशा सूचना उपजिल्हाधिकारी नाटेकर यांनी दिल्या.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com