Agriculture news in Marathi The Fadnavis government's Rs 310 crore guarantee will be canceled | Page 3 ||| Agrowon

फडणवीस सरकारची ३१० कोटींची हमी रद्द होणार

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 6 डिसेंबर 2019

मुंबई ः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन केल्यानंतर कामाचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकापाठोपाठ एक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री विनय कोरे व सोलापूरचे नेते कल्याण काळे यांच्या साखर कारखान्यांना बँक हमी व खेळत्या भांडवलापोटी ३१० कोटी रुपयांची मदत देण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय रद्द होण्याची शक्यता आहे. 

मुंबई ः शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीने एकत्र येऊन सरकार स्थापन केल्यानंतर कामाचा धडाका लावला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकापाठोपाठ एक निर्णय घेण्यास सुरुवात केली आहे. तत्कालीन मंत्री पंकजा मुंडे, माजी खासदार धनंजय महाडिक, माजी मंत्री विनय कोरे व सोलापूरचे नेते कल्याण काळे यांच्या साखर कारखान्यांना बँक हमी व खेळत्या भांडवलापोटी ३१० कोटी रुपयांची मदत देण्याचा फडणवीस सरकारचा निर्णय रद्द होण्याची शक्यता आहे. 

महाविकास आघाडीचे सरकार भाजप नेत्यांच्या या साखर कारखान्यांना दिलेली बँक हमी रद्द करणार असल्याचे सूत्रांकडून समजते. विशेष म्हणजे, उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदाची सूत्र हाती घेतल्यानंतर जे योग्य निर्णय आहेत, ते कायम राहतील. जे निर्णय राज्याच्या हिताचे नाहीत, त्यांचा आम्ही विचार करू, असे स्पष्ट संकेत दिले होते. 

निवडणुकीआधी फडणवीस सरकारने अनेक निर्णय घेतले होते. त्यात पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याला ५० कोटी, धनंजय महाडिक यांचा भीमा साखर कारखान्यास ८५ कोटी, विनय कोरे यांचा तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्यास १०० कोटी व काँग्रेसमधून भाजपत गेलेले कल्याणराव काळे यांचा सहकार शिरोमणी वसंतराव काळे कारखान्याला ७५ कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय सरकारने घेतला होता. सरकारच्या हमीमुळे कारखान्यांना कर्ज मिळणे सोपे झाले होते. फडणवीस सरकारने या चौघा नेत्यांच्या साखर कारखान्यांना बँक हमी का दिली हे तपासले जाणार आहे. 

दरम्यान, भाजप नेत्यांच्या अधिपत्याखालील इतर १५ सहकारी साखर कारखान्यांना मदतीचे खास पॅकेज देण्याचा निर्णय फडणवीस सरकारने घेतला होता. या योजनेचे लाभार्थी ठरलेल्या १५ पैकी १४ सहकारी साखर कारखान्यांकडे विविध वित्तीय संस्थांची ७५८.८८ कोटी रुपयांची कर्जे असून त्याचे पुनर्गठन करण्यास परवानगी देण्यात आली. १३ सहकारी साखर कारखान्यांकडे शासनाचे २०६ कोटींचे कर्ज थकले असून त्याच्या परतफेडीस १० वर्षांची मुदतवाढ देण्यात आली. आठ सहकारी साखर कारखान्यांकडील ९.८६ कोटी रुपयांच्या शासन थकहमीच्या परतफेडीस १० वर्षांपर्यंत मुदतवाढ देण्यात आली. सात कारखान्यांकडील सॉफ्ट लोनची ५३.४० कोटींच्या थकबाकीचे पाच वर्षांसाठी पुनर्गठन करण्यात आले. या कर्ज पुनर्गठनापोटी राज्य सरकारवर १३.३६ कोटींचा आर्थिक भुर्दंड पडणार आहे.

पॅकेज जाहीर केलेले साखर कारखाने
सरकारच्या या निवडणूक पॅकेजच्या लाभार्थ्यांमध्ये सांगलीचे खासदार संजयकाका पाटील यांचा रा. बा. पाटील सहकारी साखर कारखाना, पुणे जिल्ह्यातील राहुल कुल यांचा भीमा-पाटस सहकारी साखर कारखाना, अहमदनगरमधील डॉ. बा. बा. तनपुरे सहकारी साखर कारखाना, नाशिकमधील के. के. वाघ सहकारी साखर कारखाना, माजी मंत्री दौलतराव आहेर यांचा वसंतदादा सहकारी साखर कारखाना, भाजपचे माजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या अधिपत्याखालील जालन्याचा रामेश्वर सहकारी साखर कारखाना, औरंगाबादमधील संत एकनाथ कारखाना, सेना आमदार संदीपान भुमरे यांचा पैठणचा शरद साखर कारखाना, सिल्लोडचा सिद्धेश्वर साखर कारखाना, तत्कालीन ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या अधिपत्याखालील बीडमधील अंबेजोगाई आणि वैद्यनाथ साखर कारखाने आदींचा समावेश आहे. निवडणुकीच्या तोंडावर आपल्याच पक्षातील नाराज नेत्यांना खूश करण्यासाठी फडणवीस सरकारने हा निर्णय घेतला होता, त्यामुळे हा निर्णयही ठाकरे सरकारच्या रडारवर आहे.


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करू ः भुसेनाशिक : जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे द्राक्ष...
मुरुंब्यात कुक्कुटपालकांवर संकट परभणी ः सतत दुष्काळी स्थितीला सामोरे जात असलेल्या...
सातारा जिल्ह्यात आठ हजार हेक्‍टरवर...सातारा ः कांद्याचा दरातील तेजीमुळे लागवडीकडे...
पुणे जिल्ह्यात ऊस, डाळिंबाच्या पीककर्ज...पुणे ः पिकांचा उत्पादन खर्च वाढत असल्याने...
परभणीत कापसाचे चुकारे चार हजारांवर...परभणी ः ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
गावठाणाचे ड्रोन सर्वेक्षण सुरूमूर्तिजापूर, जि. अकोला : पंतप्रधान नरेंद्र मोदी...
नद्यांच्या काठावर १ कोटी बांबूरोपांची...औरंगाबाद : ‘‘नद्यांचे संवर्धन करण्यासाठी 'नदी...
मराठा विश्‍वभूषण पुरस्कार मंत्री राजेश...सिंदखेडराजा जि. बुलडाणा : राजमाता जिजाऊ...
नागपूर : अतिवृष्टीने नुकसानग्रस्त...नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे सात तालुक्यांना...
कोल्हापुरात कोंबड्यांचे स्वॅब घेण्यास...कोल्हापूर : जिल्ह्यात बर्ड फ्लूचा प्रसार होऊ नये...
दुर्घटनाग्रस्त बालकांच्या कुटुंबीयांना...भंडारा  :  येथील जिल्हा सामान्य...
सिद्धरामेश्‍वर यात्रेतील अक्षता सोहळा...सोलापूर : कोरोना संकटाच्या पार्श्‍वभूमीवर...
सोलापूर झेडपी घेणार ग्रामीण भागातील...सोलापूर : ग्रामीण भागातील अनेक गावांत जिल्हा...
मणी तडकण्याच्या समस्येसाठी राहा सतर्कनुकत्याच झालेल्या पावसामुळे द्राक्ष बागेमध्ये...
देऊळगावराजात कापसाला मिळाला कमाल ६८०० दरदेऊळगावराजा, जि. बुलडाणा : कापूस बाजारात तेजी...
हिवाळ्यात आरोग्य, पोषणासाठी बाजरीअलीकडे अगदी ग्रामीण भागातही गहू खाण्याचे प्रमाण...
नाशिकमध्ये भेंडीला सर्वसाधारण २९१० रुपयेनाशिक : ‘‘येथील बाजार समितीमध्ये भेंडीची आवक ५२...
‘सातारा जिल्ह्यात अद्याप बर्ड फ्लू’चा...सातारा : ‘‘जिल्ह्यात बर्ड फ्लूच्या प्रादुर्भावाचा...
पुणे जिल्ह्यात ४०५ हेक्टरवर नुकसानीचा...पुणे ः गेल्या आठवड्यात सलग तीन दिवस झालेल्या...
तऱ्हाडी, वरूळ परिसरात कुक्कुटपालक...तऱ्हाडी, जि. धुळे ः शेतीला जोडधंदा म्हणून तऱ्हाडी...