Agriculture news in Marathi Fadnavis government's tender management racket exposed: Sachin Sawant | Agrowon

फडणवीस सरकारच्या टेंडर मॅनेजमेंट रॅकेटचा पर्दाफाश : सचिन सावंत

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

मुंबई ः काँग्रेस पक्षाने २६ ऑगस्ट २०१९ व २९ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कागदपत्रांसह फडणवीस सरकारपुरस्कृत टेंडर मॅनेजमेंट रॅकेट उघड करून पंतप्रधान आवास योजनेच्या सिडकोच्या १४ हजार कोटी रुपये टेंडरचा आणि आरे कॉलनी येथील मेट्रो भवनच्या टेंडरचा घोटाळा उघडकीस आणला होता. काँग्रेस पक्षाने या अगोदर शिवस्मारक टेंडर प्रक्रियेमध्ये फडणवीस सरकारने केलेला घोटाळा उघड केला होता. त्यावर कॅगने केलेल्या चौकशीत शिक्कामोर्तब झाले होते.

मुंबई ः काँग्रेस पक्षाने २६ ऑगस्ट २०१९ व २९ ऑगस्ट २०१९ रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये कागदपत्रांसह फडणवीस सरकारपुरस्कृत टेंडर मॅनेजमेंट रॅकेट उघड करून पंतप्रधान आवास योजनेच्या सिडकोच्या १४ हजार कोटी रुपये टेंडरचा आणि आरे कॉलनी येथील मेट्रो भवनच्या टेंडरचा घोटाळा उघडकीस आणला होता. काँग्रेस पक्षाने या अगोदर शिवस्मारक टेंडर प्रक्रियेमध्ये फडणवीस सरकारने केलेला घोटाळा उघड केला होता. त्यावर कॅगने केलेल्या चौकशीत शिक्कामोर्तब झाले होते. त्याचप्रमाणे काँग्रेसने मेट्रो भवनच्या टेंडर प्रक्रियेत घोटाळ्याची कॅगकडे केलेली तक्रार कॅगने योग्य ठरवली असून, याद्वारे टेंडर मॅनेजमेंट रॅकेटचा पर्दाफाश झालेला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत यांनी म्हटले आहे.

यासंदर्भात गांधी भवन येथे झालेल्या पत्रकार परिषदेत सावंत म्हणाले की, फडणवीस सरकारच्या कालावधीमध्ये नियमांना बगल देऊन नियमांची मोडतोड करून मनमर्जीने नवीन नियम तयार करून मोठमोठ्या प्रकल्पांच्या निविदा तयार केल्या जात होत्या.

नवी मुंबई येथील प्रधानमंत्री आवास योजनेच्या १४ हजार कोटींच्या निविदेतील भ्रष्टाचार व मेट्रो भवनच्या कंत्राटाचा या कंत्राटाच्या वाटपाशी अर्थपूर्ण संबंध होता, हे आम्ही उघड केले होते.

सिडको येथे पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत नवी मुंबई परिसरात ८९ हजार ७७१ घरे बांधण्याचे प्रस्तावित होते. १४ हजार कोटी रुपयांच्या चार भागामध्ये वाटलेल्या या प्रकल्पात आता ज्यांना कंत्राटे मिळाली आहेत त्या चार लोकांना ही कंत्राटे मिळावीत म्हणून निविदेच्या अटी व शर्ती तयार केल्या गेल्या. काँग्रेस पक्षातर्फे या निविदा प्रक्रियेबाबत माहिती घ्यायला सुरुवात झाल्यावर निकोप स्पर्धा दाखवण्यासाठी नागार्जूना कन्स्ट्रक्शन कंपनी (एनसीसी) या पाचव्या कंत्राटदाराला निविदा भरण्यास सांगितले गेले. परंतु त्याची निविदा बाद करून त्याने केलेल्या मदतीची परतफेड म्हणून मेट्रो भवनचे कंत्राट याच नागार्जून कंपनीला देण्याचा घाट घातला गेला आहे व त्यासाठीची निविदा प्रक्रिया ही मॅनेज असून त्याच कंपनीला मेट्रो भवनचे कंत्राट मिळाले असा आरोप काँग्रेस पक्षातर्फे २६ ऑगस्ट २०१९ रोजी करण्यात आला होता. 

या संदर्भात पंतप्रधान कार्यालय तथा प्रिन्सिपल अकाऊटंट जनरल यांच्याकडे ६ सप्टेंबर २०१९ रोजी अधिकृत तक्रारही दाखल करण्यात आली होती. मेट्रो भवन कंत्राटांमध्ये मूळ निविदा ही याआधी एका अन्य कंत्राटदाराला हे काम मिळावे म्हणून तयार करण्यात आली होती परंतु प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये नागार्जूना कंपनीने केलेल्या मदतीची परतफेड करण्याकरीता या कंपनीला हे कंत्राट मिळावे याकरीता मूळ निविदेमध्ये शुद्धीपत्रक काढून १३ बदल करण्यात आले. त्याचबरोबर पुढील काळात शुद्धीपत्रक क्रमांक ६, ८ आणि १० काढून पुन्हा बदल करण्यात आले. 

काँग्रेसने यावर आक्षेप नोंदवून केलेल्या तक्रारीची कॅगने दखल घेतली असून यासंदर्भात केलेल्या चौकशीमध्ये कॅगला तथ्य आढळलेले आहे. एमएमआरडीए तर्फे आलेले स्पष्टीकरण पूर्णपणे नाकारले आहे. सदर प्रकल्प काँग्रेसने सांगितल्याप्रमाणे हे कंत्राट नागार्जूना कंपनीलाच मिळाले आहे. शिवस्मारक घोटाळ्याप्रमाणेच एमएमआरडीएने नागार्जूना कंपनीशी वाटाघाटी केल्या व त्यांनी भरलेल्या ११६२.७४ कोटी रुपये रकमेच्या निविदेत प्रथमतः ७३ कोटी रुपये कमी केले व नंतर प्रकल्पाचा आराखडा बदलून बरेच मजले कमी करुन तपशील बदलण्यात आले व अजून ११७ कोटी कमी झाले असे दाखवण्यात आले, हे केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे उल्लंघन आहे. प्रथम नागार्जुना कंपनीला टेंडर मिळावे म्हणून प्रस्तावित आराखडा बदलून मजले वाढवण्यात आले व नंतर कंत्राट मिळाल्यानंतर वाटाघाटीमध्ये मजले कमी केले गेले.


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...