बियाणे भरपाई दिलेल्या शेतकऱ्यांची नावे फडणवीस यांनी जाहीर करावीत ः जावंधिया

नागपूर ः आपल्या सत्ताकाळात निकृष्ट बीटी बियाण्यांपोटी शेतकऱ्यांना कंपन्यांकडून १४ ते १८ लाख रुपयांची भरपाई देण्यात आल्याचा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला होता.
Fadnavis should announce the names of 'those' farmers: Jawandhiya
Fadnavis should announce the names of 'those' farmers: Jawandhiya

नागपूर ः आपल्या सत्ताकाळात निकृष्ट बीटी बियाण्यांपोटी शेतकऱ्यांना कंपन्यांकडून १४ ते १८ लाख रुपयांची भरपाई देण्यात आल्याचा दावा माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला होता. हा दावा खरा असेल, तर भरपाई मिळालेल्या शेतकऱ्यांची आणि ती देणाऱ्या कंपन्यांची नावे जाहीर करावीत, असे थेट आव्हान शेतीप्रश्‍नाचे ज्येष्ठ अभ्यासक विजय जावंधिया यांनी केले.

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेत राज्यातील निकृष्ट बियाण्यांबाबत राज्य सरकारवर टीका केली होती. त्या पत्रकार परिषदेत श्री. फडणवीस म्हणाले होते की, निकृष्ट बियाण्यांचा पुरवठा झाल्याने सोयाबीनच्या उगवणविषयक तक्रारी वाढल्या. आज त्यांची संख्या तीस हजारांवर पोचली आहे; परंतु शासन याबाबतीत गंभीर नसून भरपाईच्या मुद्यावर शेतकऱ्यांना वाऱ्यांवर सोडण्यात आले आहे. पहिल्याच पेरणीकरिता पैशाची जुळवाजुळव करताना शेतकरी मेटाकुटीस आले होते. त्यानंतर आता दुबार पेरणीकरिता पैशाची सोय करण्याची त्यांची विवंचना अधिकच वाढली आहे. परिणामी, सरकारने भरपाई मिळवून देण्यासाठी पाठीशी राहण्याची गरज असताना तसे होत नसल्याची खंत फडणवीस यांनी व्यक्त केली होती; तसेच निकृष्ट बियाणे प्रकरणात आपल्या सरकारने २०१८ मध्ये बियाणे कंपन्यांकडून शेतकऱ्यांना १४ ते १८ लाख रुपयांची भरपाई मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला होता, असा दावाही त्यांनी केला होता.

याच मुद्यावर विजय जावंधिया यांनी मात्र फडणवीस यांना कोंडीत पकडत पत्राद्वारे विचारणा केली. ज्या शेतकऱ्यांना निकृष्ट बीटी बियाण्यांसाठी भरपाई देण्यात आली, त्यांची व भरपाई देणाऱ्या कंपन्यांच्या नावांबाबत जावंधिया यांनी माहिती मागितली. फडणवीस विरोधी पक्षात असताना त्यांनी कापसाला ६००० रुपये क्विंटलचा भाव मागितला होता; परंतु २०२०-२१ मध्ये मोदी सरकारच्या काळात कापसाचा भाव अवघा ५६०० ते ५८०० रुपये इतकाच आहे, याकडेही त्यांनी फडणवीस यांचे लक्ष वेधले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com