तहान लागल्यावर विहिरीचे नाटक ः दरेकर 

केंद्र सरकारने पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राला झुकते माप दिले असतानाही तहान लागल्यावर विहीर खणून उलट केंद्रावर खापर फोडण्याचा एककलमी कार्यक्रम राज्य सरकारकडून सुरू असल्याचीटीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
Fadnavis should come forward to join hands with the Center for the people: Patole
Fadnavis should come forward to join hands with the Center for the people: Patole

मुंबई : कोरोनाशी लढा देण्यासाठी केंद्र सरकारने पहिल्या दिवसापासून महाराष्ट्राला झुकते माप दिले असतानाही तहान लागल्यावर विहीर खणून उलट केंद्रावर खापर फोडण्याचा एककलमी कार्यक्रम राज्य सरकारकडून सुरू असल्याची जोरदार टीका विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. 

आपले अपयश सांगता येत नाही म्हणून केंद्राकडे बोट दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न राज्य सरकारकडून वारंवार केला जातो आहे. फक्त केंद्रावर टीका करण्यापेक्षा राज्य सरकारने करोना काळात आरोग्य सुविधा वाढविण्यासाठी नेमके काय केले, याची आकडेवारी सर्वांसमोर आणावी, असा टोलाही दरेकर यांनी लगावला आहे. 

राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाल्याच्या पार्श्‍वभूमीवर ‘आम्ही केंद्राच्या पाया पडायला तयार आहोत, पण केंद्राने राज्याला अधिक ऑक्सिजनचा पुरवठा करण्यासाठी मदत करावी’, अशी उपरोधिक विनंती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारला केली आहे. टोपे यांच्या या वक्तव्यावर दरेकर यांनी वरीलप्रमाणे मतप्रदर्शन केले. 

केंद्र सरकारविरोधात खडे फोडल्याशिवाय राज्यातल्या मंत्र्यांचा एकही दिवस जात नाही. केंद्रानं दीड हजार मेट्रिक टन ऑक्सिजन देण्याची तयारी लगेच दाखवली होती. पण हा ऑक्सिजन आणण्यासाठी राज्य सरकार विशेष विमाने किंवा ३२ टँकरही उपलब्ध करून देऊ शकले नाही. ही जबाबदारीदेखील सरकार पार पाडू शकले नाही, अशी टीका दरेकर यांनी केली. 

महाविकास आघाडी सरकारमध्ये समन्वयाचा पूर्ण अभाव आहे. राजेश टोपे ३६ हजार इंजेक्शनची आवश्यकता असल्याचे सांगतात तर नवाब मलिक, जितेंद्र आव्हाड पन्नास हजारांचा आकडा ठोकतात आणि संजय राऊत ८० हजार इंजेक्शनची गरज असल्याचे फुशारकीने सांगतात. आज राज्यात ऑक्सिजनचा तुटवडा आहे, रेमडेसिव्गिर इंजेक्शन मिळत नाही आणि आयसीयू बेड्‍स, व्हेंटिलेटर उपलब्ध होत नाहीत. या प्रश्‍नांची सोडवणूक करण्यासाठी सरकारने काय नियोजन केले, याचे उत्तर देण्याऐवजी राज्यातील मंत्री केंद्रावर जबाबदारी ढकलत आहेत, अशी टीका दरेकर यांनी केली. 

ऑक्सिजन तुटवडा एका दिवसात निर्माण झाला नाही. रुग्ण वाढत असताना तुटवडा निर्माण होऊ शकतो, हे वेळीच ओळखून जर सरकारने नियोजन केले असते, तर आज ही परिस्थिती निर्माण झाली नसती. पण प्रत्येक बाबतीत तहान लागली की विहीर खोदण्याचे नाटक करायचे आणि केंद्र सरकारवर खापर फोडायचे, असा पोरखेळ महाविकास आघाडी सरकारकडून सुरू आहे. तो थांबला पाहिजे, असेही दरेकर म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com