Agriculture news in marathi, The fall army woram on rice in Rajapur | Page 2 ||| Agrowon

राजापुरात भातावर लष्करी अळी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

रत्नागिरी : राजापूर तालुक्यात परिपक्व झालेल्या भातावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पुराच्या तडाख्यातून वाचलेल्या नदी काठावरील शेकडो एकर भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या संदर्भात कृषी विभागातर्फे पाहणी सुरू झाली आहे.

रत्नागिरी : राजापूर तालुक्यात परिपक्व झालेल्या भातावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आला आहे. पुराच्या तडाख्यातून वाचलेल्या नदी काठावरील शेकडो एकर भातशेतीचे नुकसान होण्याची शक्यता आहे. या संदर्भात कृषी विभागातर्फे पाहणी सुरू झाली आहे.

राजापूर तालुक्यातील शिवणे, शीळ, धामणपे आदी गावांमधील भातशेतीवर मोठ्याप्रमाणात लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. त्या अनुषंगाने कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांशी संवाद साधण्यात आला. प्रादुर्भावग्रस्त भाताची कापणी करण्यासाठी आठ-दहा दिवसांचा कालावधी आहे. त्या  ठिकाणी किटकनाशकांची फवारणी करणे शक्य आहे. मात्र, दोन दिवसांमध्ये कापणी करणे गरजेचे आहे. तेथे कोणत्याही किटकनाशकांची फवारणी न करता शेतकऱ्यांनी कापणी उरकून घ्यावी, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. 

भातावरील लष्करी अळीचे नियंत्रण करण्यासाठी आवश्यक असलेली किटकनाशके सद्यस्थितीमध्ये कृषी विभागात उपलब्ध नाहीत. मात्र जिल्हा परिषदेच्या सेस फंडातून शेतकऱ्यांना त्यांच्या खरेदीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. 

पुराच्या तडाख्यात बचावलेला भात परिपक्व होऊन कापणी योग्य झाला आहे. आता लष्करी अळीच्या प्रादुर्भावातून वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. नद्यांच्या काठावरील भागात त्याचे प्रमाण जास्त आहे. पावसामुळे भात कापता येत नाही. प्रादुर्भावग्रस्त भातावर फवारणी केल्यास काढलेल्या भातामध्ये किटकनाशकांची मात्रा राहण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे किटकनाशकांची फवारणी कशी करायची, अशा दुहेरी कात्रीमध्ये शेतकरी सापडला आहे. 

परिपक्व पिकांची रात्रीच्यावेळी नासाडी केल्यानंतर ही अळी जमिनीच्या भेगांमध्ये किंवा पिकांच्या मुळाजवळ लपून बसते. दमट, ढगाळ वातावरण या किडीला पोषक असते. नदीलगतच्या पिकांवर ही कीड अधिक प्रमाणात आढळून येते. याविषयी शेतकऱ्यां‍शी संवाद सुरू असल्याचे तालुका कृषी अधिकारी एस. एस. जगताप यांनी सांगितले.


इतर बातम्या
वणी उपविभागातील शेतकऱ्यांना विमा...यवतमाळ : पीक विमा काढल्यानंतरही ही गेल्या तीन...
वाढीव वीज बिले कमी न केल्यास आंदोलन...सोलापूर  ः लॉकडाऊनच्या काळात जिल्ह्यातील...
बुलडाणा जिल्ह्यात शेततळ्यांचे अनुदान...बुलडाणा ः या वर्षात शेततळे खोदलेल्या शेतकऱ्यांना...
सोलापूर जिल्ह्यात उसावर ‘हुमणी’चा...सोलापूर  : जिल्ह्यात खरिपातील मूग, उडदावर...
राधानगरीतून २८०० क्युसेक विसर्गकोल्हापूर : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर...
सांगली जिल्ह्यात तुरीच्या पेरणी...सांगली : जिल्ह्यात गतवर्षी परतीचा झालेला पाऊस आणि...
मका बनले नाशिक जिल्ह्यातील प्रमुख पीकयेवला : कांद्याचा अन् द्राक्षाचा जिल्हा अशी...
रत्नागिरीत मत्स्य शेतीकडे छोट्या...रत्नागिरी : मत्स्य व्यवसाय विभागाला लाखोंचे...
द्राक्ष पीककर्ज कर्जमाफीत बसेना आणि...नाशिक : द्राक्षासाठी घेतलेले पीककर्ज  ...
पंढरपुरात तीन हजार नागरिकांची रॅपिड ॲ...सोलापूर  :  पंढरपूर तालुक्यात कोरोनाचा...
कर्जमाफीसाठी दीड हजार कोटीमुंबई: महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
जैविक खतांचा वापर सक्तीचा होणार पुणे: युरिया विकत घेताना जैविक खते देखील विकत...
राज्यातील पंधरा जिल्हा बँकांना ...लातूर ः राज्यातील अनेक जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
राज्यात पावसाची रिपरिप सुरुच पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात रिमझिम असून...
निकृष्ट बियाणेप्रकरणी ४० न्यायालयीन खटलेवाशीम ः यंदाच्या हंगामात निकृष्ट बियाण्यामुळे...
चांदोली धरणग्रस्त विस्थापीतांनी केली २५...मांगले, जि. सांगली ः  चांदोली धरणग्रस्तामधील...
दूध प्रश्नी मुख्यमंत्र्यांनी हस्तक्षेप...नगर ः दुधाला प्रतिलिटर किमान 30 रुपये दर मिळावा...
जलसंधारण मोहिमेतून पाणी टंचाईवर मातआजही माण, खटाव हे  दुष्काळी तालुका म्हणून...
पावसाचा जोर कायम राहणार पुणे: गुजरातच्या दक्षिण भागात चक्राकार...
खानदेशात भिज पावासाने पिकांना लाभजळगाव  ः खानदेशात मागील दोन दिवस भिज पाऊस...