मक्यावर १४ राज्यांमध्ये लष्करी अळीचा प्रादुर्भाव

अमेरिकन लष्करी अळी
अमेरिकन लष्करी अळी

नवी दिल्ली: देशात २१ राज्यांमध्ये मक्याचे पीक घेतले जाते. २०१९-२० च्या खरीप हंगामात १४ राज्यांमध्ये मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) प्रादुर्भाव झाला आहे. मात्र सध्या परिस्थिती चिंताजनक नाही, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्यांनी दिली. लष्करी अळी मागील हंगामात प्रथम कर्नाटकातील चिक्काबल्लापूर जिल्ह्यात आढळली होती आणि यंदा तेथील आठ जिल्ह्यांमध्ये पसरली आहे.   लष्करी अळी ही कोणत्याही परिस्थितीत तग धरणारी असल्याने देशातील मका पिकावरून संपूर्ण उच्चाटन करणे अवघड आहे. सध्या देशातील मका लागवड २१ राज्यांपैकी १४ राज्यांमध्ये लष्करी अळीने आक्रमण केले आहे. मात्र अद्याप आर्थिक नुकसानाची पातळी ओलांडली नाही. या १४ राज्यांतील शेतकऱ्यांना अळीविषयक इशारा देण्यात आला आहे. दक्षिण आफ्रिकेमध्ये पिकांवर विध्वंस केल्यानंतर मागील वर्षी ही कर्नाटकात दाखल झाली आणि देशभरात पसरतच राहिली. भारतीय कृषी संशोधन परिषदने लष्करी अळीवर नियंत्रणासाठी उपाययोजनांचे टिपण तयार करून सर्व राज्य सरकारांना दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या अंदाजानुसार देशात यंदा मका उत्पादन ४.५ टक्क्यांनी वाढून १९८.९ लाख टन होण्याची शक्यता आहे. व्यापारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार देशात यंदा मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने सरकारने जाहीर केलेल्या उत्पादनाच्या अंदाजापेक्षा कमी उत्पादन होणार आहे.  आठ राज्यांत अधिक नुकसान  देशात १४ राज्यांमधील मका पिकावर लष्करी अळाचा प्रादुर्भाव असला तरी बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक, तमिळनाडू आणि गुजरात या आढ राज्यांमध्ये अधिक प्रादुर्भाव झाला आहे. कर्नाटक आणि मध्य प्रदेश हे मका उत्पादनात अग्रेसर राज्ये आहेत. देशातील मका उत्पादनाचे भांडारच लष्करी अळीच्या तावडीत सापडल्याने यंदा मका उत्पादनाला मोठा फटका बसणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.   गेल्या वर्षीही मोठे नुकसान २०१८-१९ च्या हंगामात कर्नाटकात ८१ हजार हेक्टर, तेलंगणात १७४०, आंध्र प्रदेशात १४३१ आणि तमिळनाडूत ३१५ हेक्टरवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाला होता. ‘‘देशात मागील वर्षी १६८.९ लाख क्विंटल मका उत्पादन झाले होते. त्याअधीच्या वर्षात २७० लाख क्विंटल उत्पादन होते. त्यामुळे मागील वर्षी मक्याचा मोठा तुटवडा जाणवला होता,’’ अशी माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. दोन वर्षांत ५० देशांत धुमाकूळ लष्करी अळी पहिल्यांदा उत्तर आणि दक्षिण अमेरिकेत आढळली. २०१६ मध्ये या अळीने नायजेरिया या देशात प्रवेश केला. त्यानंतरच्या दोनच वर्षांत या  अळीने दोन खंडांतील तब्बल ५० देशांतील पिकांवर प्रवेश केला. त्यामुळे जागतिक पातळीवर मका पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे. गेल्या दोन वर्षांत या अळीने आफ्रेकेतील मका पीक संपूर्ण फस्त केले होते. त्यामुळे या खंडातील अन्नसुरक्षाच धोक्यात आली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com