agriculture news in Marathi, Fall army worm attack on ginger in Nashik District, Maharashtra | Page 3 ||| Agrowon

नाशिक जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीचा आले पिकावर प्रादुर्भाव

टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

सध्याच्या वातावरणात सर्वत्र पाने खाणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव जाणवत आहे. यातच मक्यावरील अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. भाजीपाला पिकांतील पाने खणाऱ्या अळ्या तसेच अमेरिकन लष्करी अळी यांचे निरीक्षण करावे. अळीचे योग्य निदान करून घ्यावे. तज्ज्ञांच्या सल्ल्याने प्रतिबंधात्मक उपाय करावा. मका पिकात शिफारस केलेल्या कीटकनाशकांचा वापर करावा
- प्रा. तुषार उगले, सहायक प्राध्यापक, कीटकशास्त्र विभाग, के के वाघ कृषी महाविद्यालय नाशिक

नाशिक: सध्या संपूर्ण देशात मका पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. त्यामुळे मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असताना निफाड तालुक्यातील रौळस पिंपरी येथील आले पिकाच्या क्षेत्रावर या लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

रौळस पिंपरी येथील सागर आहेर यांनी जून महिन्यात एक एकर क्षेत्रावर आले पिकाची लागवड केली. या क्षेत्राशेजारी मका लागवड आहे. त्यामुळे लष्करी अळीने स्थलांतर करत आले पिकावर मोर्चा वळवला आहे. सप्टेंबर महिन्यात अधिक पाऊस असल्याने आले उत्पादक असलेले आहेर यांना पिकांमध्ये जाता येत नसल्याने दुर्लक्ष झाले. पाऊस ओसरल्यानंतर आहेर हे शेतात गेले असताना आल्यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर झाला. अळीने मोठ्या प्रमाणावर हल्ला चढवीत पाने खाल्ल्याचे दिसून आले. आले या पिकावर पहिल्यांदाच या अळीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. नुकसान करण्याची पद्धत मका पिकासारखीच असून सध्या पानांवर हि आली उपजीविका करताना दिसून येत आहे. 

उत्तर प्रदेशातही या अळीचा शिरकाव ऊस या पिकावर दिसून आला आहे. अमेरिकन लष्करी अळीचे पतंग एका रात्रीत स्थलांतर करत आहेत. त्यांनतर अळीने अंडी घातल्याने अळीचा प्रसार मोठ्या प्रमाणात झाला. त्यामुळे आता मका पिकानंतर इतर पिकांवर प्रादुर्भाव झाला. 

प्रतिक्रिया
शेतकऱ्यांनी अमेरिकन लष्करी अळीबाबत सावध राहावे. वेळोवेळी शेतात निरीक्षण ठेवणे गरजेचे आहे. या अळीत कीटकनाशक प्रति प्रतिकारक्षमता लवकर निर्माण होऊ शकते म्हणून शेतकऱ्यांनी तज्ज्ञांच्या सल्ल्याने व शिफारशीनुसार रासायनिक कीटकनाशकांसोबत जैविक कीटकनाशकांचासुद्धा वापर करावा. यात बिव्हेरिया बॅसियाना, मेटाऱ्हायझियम या मित्रबुरशी, प्रकाश सापळे, कामगंध सापळे यांचा वापर गरजेचा आहे. त्यामुळे हा प्रादुर्भाव नियंत्रणात येऊ शकेल. 
- राहुल वडघुले, कीटकशास्त्र अभ्यासक


इतर अॅग्रो विशेष
वाद-प्रतिवादांचा खेळ अन् हतबल शेतकरीनिकृष्ट बियाण्यांमुळे सोयाबीन न उगवल्याच्या...
शेतकऱ्यांनो, एक वर्ष सुटी घ्यायची का?जगभरात जनुकीय सुधारित (जेनिटिकली मॉडिफाइड/जीएम)...
...अन्यथा कृषी सहसंचालकांना अटक करून...औरंगाबाद ः सोयाबीनच्या बोगस बियाणे प्रकरणात...
`गोसेखुर्द'चे भू-संपादन संपेनानागपूर : गोसेखुर्द प्रकल्पाच्या कामाचा...
काटेपूर्णा, पेनटाकळी, खडकपूर्णा ...अकोला ः वऱ्हाडातील तीनही जिल्ह्यांत आत्तापर्यंत...
नगर जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठ्यात...नगर  ः जिल्ह्यात यंदा सुरुवातीपासूनच चांगला...
दुग्धोत्पादकांना लिटरमागे १० ते १२...नगर ः अनेक शेतकऱ्यांसह बेरोजगारीवर मात करण्यासाठी...
धरणांच्या पाणलोटात पावसाचा जोरपुणे : कोकण किनारपट्टीलगतच्या अरबी समुद्रात...
अमेरिकन लष्करी अळीचे मका पिकावर आक्रमणपुणे ः खरिपाची पेरणी होऊन महिना उलटत नाही तोच...
रासायनिक अवशेष काढण्यासाठी 'अर्का...नाशिक ः फळे आणि भाजीपाला पिकांवर रासायनिक...
देशात ९२ लाख हेक्टरवर कापूसमुंबई: देशात कापूस लागवडीने वेग घेतला आहे....
राज्यातील धरणांमध्ये २८ टक्के पाणीसाठापुणे : जून महिन्यात पावसाने सरासरी गाठली, तसेच...
पॉलीहाऊसमध्ये फुलला दर्जेदार पानमळाकोल्हापूर जिल्ह्यातील निमशिरगाव (ता.शिरोळ) येथील...
`बॅलन्स`अभावी शेतकऱ्याला दिलेला चेक...अकोला ः अवेळी पावसामुळे झालेल्या नुकसानाची भरपाई...
‘आपले सरकार’ पारदर्शकच हवेचालू खरीप हंगामासाठी पीकविमा भरण्याची अंतिम मुदत...
शेती म्हणजे रोजगार हमी योजना आहे का?खूप दिवसांनंतर एका कार्यकर्ता मित्राचा फोन आला....
मराठवाड्यात कपाशीची ८० टक्के पेरणीऔरंगाबाद :  सर्वसाधारण क्षेत्राच्या तुलनेत...
सोयाबीन बियाणेप्रकरणी ३० हजार तक्रारी ः...यवतमाळ : सोयाबीन बियाणे उगवणाबाबत मोठ्या प्रमाणात...
मुंबईसह उत्तर कोकणात जास्त, तर दक्षिणेत...पुणे : राज्याच्या विविध भागांत हलक्या ते...
क्रांती कारखान्याचा ऊस बेण्यासाठी ‘माझी...सांगली : शेतकऱ्यांना दर्जेदार ऊस बेणे मिळाले तरच...