लष्करी अळीचा मक्यावर ताव

आमच्याकडे अमेरिकन लष्करी अळी रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी प्रयत्न केले; परंतु कणसांमध्ये दाणे पक्व होत असतानाच ही अळी पुन्हा आली आहे. ती आता कणसे पोखरत आहे. - मनोज पाटील, शेतकरी,अंतुर्ली (ता. मुक्ताईनगर, जि. जळगाव)
लष्करी अळी
लष्करी अळी

जळगाव ः खानदेशात मका लागवडीसाठी प्रसिद्ध असलेल्या रावेर, मुक्ताईनगर, चोपडा, जळगाव, शहादा (जि. नंदुरबार) व शिरपूर (जि. धुळे) भागात मक्‍यावर अमेरिकन लष्करी अळीचा (स्पोडोप्टेरा फ्रुगीपर्डा) प्रादुर्भाव कायम आहे. पोंग्यात शिरकाव करून पिकाला पोखरणाऱ्या अळीने सध्या कणसांना लक्ष्य केले असून, कणसांचा अक्षरशः भुसा ही अळी करीत आहे.  जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्‍यातील तापी काठावरील अंतुर्ली, नायगाव, कर्की, दुई, बेलसवाडी भागात कणसांमध्ये ही अळी आढळल्याचे दावे शेतकरी व तज्ज्ञ करीत आहेत. लागवडीनंतर २० ते २२ दिवसांनी डिसेंबर, जानेवारीत अनेक ठिकाणी या अळीचा प्रकोप पिकावर झाला होता. शेतकऱ्यांनी प्रतिबंधात्मक उपायासंबंधी फवारण्या घेतल्या. त्यानंतर पिकाची बऱ्यापैकी वाढ झाली. कणसे भरली. दाणे पक्व होत असतानाच पुन्हा अळीचा शिरकाव झाला. या अळीने आता कणसे पोखरायला सुरवात केली आहे. यामुळे उत्पादनात जवळपास २५ ते ३० टक्के घट येईल, तसेच धान्याचा दर्जाही घसरेल.  जळगाव जिल्हात रब्बी हंगामात तब्बल ६० ते ६५ हजार हेक्‍टवर लागवड होते. परंतु ऑक्‍टोबरमध्येच लष्करी अळी मका पिकावर दिसून आल्याने अनेक शेतकऱ्यांनी लागवड टाळली. जळगाव जिल्ह्यात फक्त १५ हजार हेक्‍टरवर मक्‍याची लागवड झाली आहे. ही अळी आटोक्‍यात आणण्यासाठी काही शेतकऱ्यांनी कामगंध सापळे वापरले. त्याची किंमत ५० ते ६० रुपये प्रतिसापळा अशी होती. एकरी १० सापळे लावले. यावर खर्च करूनही ही अळी नियंत्रणात आलेली नसल्याचे दावे शेतकरी करीत आहेत. शहादा, शिरपूर तालुक्‍यांतही मक्‍याला लष्करी अळीचा फटका बसला असून, नुकसानीच्या भीतीने शेतकऱ्यांनी मक्‍याऐवजी बाजरीला पसंती दिल्याचे शेतकरी म्हणतात. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com