शेतात घेतलेल्या तुतीच्या पिकावरच रेशीम अळ्यांचे संगोपन करून कोषांचे उत्पादन घेतले जाते.
ताज्या घडामोडी
हिंगोली जिल्ह्यात ज्वारीवर लष्करी अळीचा हल्लाबोल
हिंगोली : जिल्ह्यातील रब्बी ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा (फॉल आर्मी वर्म) प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. तोंडापूर (ता. कळमनुरी) येथील विशेषज्ञांनी मंगळवारी (ता. १४) तुर्क पिंपरी (ता. औंढा नागनाथ) येथील प्रादुर्भावग्रस्त ज्वारीची पाहणी करून शेतकऱ्यांना लष्करी अळीच्या व्यवस्थापनाबाबत सल्ला दिला.

जिल्ह्यात यंदा सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे ज्वारीच्या क्षेत्रात वाढ झाली आहे. आजवर १२ हजार ४४३ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली आहे. वाढीच्या अवस्थेतील ज्वारी पिकांवर लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे. ही अळी ज्वारीच्या पोंग्यामध्ये जाऊन नुकसान करत असल्यामुळे पिकाचे नुकसान होत आहे.
मंगळवारी (ता. १४) तोंडापूर येथील कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके, कीटकशास्त्रज्ञ, अजयकुमार सुगावे, पीक शास्त्रज्ञ राजेश भालेराव यांनी तुर्क पिंपरी येथील शेतकरी मारोतराव होंपे यांच्या, त्यांच्या शेजारच्या शेतातील ज्वारी पिकांमध्ये पाहणी केली. त्या वेळी ज्वारीच्या पोंग्यामध्ये अमेरिकन लष्करी अळ्या आढळून आल्या. या वेळी पंडित पोले, गजानन पोले, रमेश पोले, शंकरराव पोले, बालाजी पोले, शेषराव पोले, संतोष हनवते आदी उपस्थित होते.
एकात्मिक कीड व्यवस्थापन करा
या अळीची ओळख, जीवनक्रम, नुकसानीचा प्रकार, याबाबत माहिती दिली. अमेरिकन लष्करी अळी ही प्रामुख्याने मका आणि ज्वारी या पिकांवर आढळून येते. त्यामुळे आर्थिक नुकसान पातळी ओलांडण्यापूर्वी एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अंतर्भाव करून सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकरीत्या या अळीचे व्यवस्थापन करावे, असा सल्ला विशेषज्ञांनी शेतकऱ्यांना दिला.
- 1 of 1021
- ››