औरंगाबाद जिल्ह्यात अमेरिकन लष्करी अळीचे मक्यावर आक्रमण

लष्करी अळी
लष्करी अळी

औरंगाबाद: मका पिकासाठी सर्वाधिक धोकादायक अशा अमेरिकन लष्कर अळीने औरंगाबाद जिल्ह्यात पिकावर आक्रमण केले आहे. वैजापूर तालुक्‍यातील दोन गावांत हा प्रादुर्भाव कृषी विभागाच्या निदर्शनास आला असून, त्यासाठी उपाययोजना सुचवत अधिकच्या मार्गदर्शनासाठी गुरुवारी (ता. २७) कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना अधिकच्या मार्गदर्शनासाठी पाचारण करण्यात आले होते.  अमेरिकन लष्कर अळी ही बहुभक्षी असल्याने तिने होणाऱ्या विविध पिकांच्या नुकसानीची पातळीही अधिक आहे. मका पीक लष्करी अळीचे आवडते खाद्य आहे; परंतु ते नसले तर तृणधान्यवर्गीय व इतर जवळपास ८० ते ९० प्रकारची पिके व गवतांवर ही अळी उपजीविका करते असे तज्ज्ञ सांगतात. औरंगाबाद, जालना व लगतच्या विदर्भातील बुलडाणा जिल्ह्यात जवळपास तीन लाख हेक्‍टरवर मका पीक आहे. अळीचे आवडते खाद्य असलेल्या या पिकावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव झाल्याचे यापूर्वीही आढळून आले होते. तुरळक स्वरूपाचा हा प्रादुर्भाव जास्त पसरू नये यासाठी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ, कृषी विभाग व सायन्स आशिया बायोटेक्‍नॉलॉजी सेंटर नवी दिल्ली यांच्या वतीने बुधवारी (ता. २६) औरंगाबाद येथे मक्‍यावरील लष्करी अळी नियंत्रण जागृती अभियानाला सुरवात करण्यात आली.  अभियानाची सुरवात होत नाही तोच औरंगाबाद जिल्ह्यातीलच वैजापूर तालुक्‍यातील लोणी बु. व सवंदगाव या दोन गावांतील मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव प्रथमदर्शनी आढळून आला. बीजप्रक्रिया न केलेले बियाणे वापरलेल्या शेतात हा प्रादुर्भाव आढळून आल्याची माहिती वैजापूरचे तालुका कृषी अधिकारी अनिल कुलकर्णी यांनी दिली. माहितीनुसार शेतकऱ्यांना करावयाच्या उपाययोजना नेमक्‍या कोणत्या व त्या कशा कराव्यात याविषयी माहिती देण्यात आली. व संतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या तज्ज्ञांना पिकांची स्थिती व अळीचे छायाचित्र पाठविण्यात आले. जवळपास १५ ते २० हेक्‍टरवरील या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी काय उपाय करता येईल, यासाठी विद्यापीठाच्या तज्ज्ञांना गुरुवारीच (ता. २७) पाचारण करण्यात आल्याचेही श्री. कुलकर्णी म्हणाले. लागले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com