Agriculture news in marathi fall army worm on maize, sorghum in Khandesh | Agrowon

खानदेशात रब्बी ज्वारी, मक्यावर लष्करी अळी

टीम अॅग्रोवन
शनिवार, 18 जानेवारी 2020

ज्वारी, मक्‍यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप वाढला आहे. किडनाशके वापरावी लागत आहेत. फवारणी करूनही ही अळी पिकातून नष्ट होत नसल्याची स्थिती आहे. यामुळे आमचा खर्च वाढला आहे. 
- संतोष पाटील, शेतकरी, रावेर (जि. जळगाव)

जळगाव : खानदेशात खरिपात शेतकऱ्यांना फटका बसलेला असतानाच आता रब्बी हंगामात ज्वारी, मका या पिकांवर अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप झाला आहे. शेतकरी ही अळी रोखण्यासाठी किडनाशकांसह कामगंध सापळ्यांचा उपयोग करीत आहेत. उत्पादन खर्चही वाढला असून होणाऱ्या नुकसानीमुळे शेतकरी चिंतेत आहेत. 

धुळे जिल्ह्यातील शिरपूर, शिंदखेडा, धुळे, जळगावमधील जळगाव, चोपडा, पाचोरा, भडगाव, एरंडोल, पारोळा या भागांत अमेरिकन लष्करी अळी ज्वारीवर दिसून आली आहे. तर, मका पिकावर ही अळी जळगाव, रावेर, जामनेर, यावल, चोपडा, पाचोरा, धुळ्यातील शिरपूर, नंदुरबारमधील शहादा, तळोदा भागात दिसून आली आहे. मक्‍याची लागवड यंदा वाढली आहे. कारण, त्याचे दर टिकून राहिले. मक्‍याला जागेवरच मागील हंगामात दोन हजार रुपये प्रतिक्विंटलचा दर मिळाला होता. 

खरिपात मक्‍याचे अतिपाऊस व लष्करी अळीमुळे नुकसान झाले. यामुळे शेतकऱ्यांनी मका लागवडीवर भर दिला. जळगाव जिल्ह्यात सुमारे ४० हजार हेक्‍टर, धुळ्यात सात हजार तर नंदुरबारात पाच हजार हेक्‍टरवर मक्‍याची लागवड झाली आहे. शेतकऱ्यांनी कोरडवाहू व पूर्वहंगामी कापसाखालील क्षेत्र रिकामे करून मका व ज्वारीचीदेखील पेरणी किंवा लागवड अनेक भागांत केली. 

ज्वारीची पेरणी खानदेशात सुमारे ३५ हजार हेक्‍टरवर झाली आहे. ही पिके बऱ्यापैकी आहेत. कोरडवाहू ज्वारी अनेक भागांत निसवली आहे. तर, काही भागांत निसवणीच्या अवस्थेत आहेत. काळ्या कसदार जमिनीत हे पीक जोमात होते. यातच मागील आठवड्यात ज्वारीसह मक्‍यावर अमेरिकन लष्करी अळीचा प्रकोप झाला आहे. २४ तासांत पिकाची अवस्था ही अळी सापळ्यासारखी करीत आहे. पोगा पोखरून पीक नष्ट होत आहे. 

प्रादुर्भाव रोखण्यासाठी धावपळ

शेतकरी ही अळी रोखण्यासाठी विविध कंपन्यांची कीडनाशके व कामगंध सापळे वापरत आहेत. फवारणीसाठी एकरी २००० रुपये किमान खर्च येत आहे. तर, एकरी सात ते आठ कामगंध सापळे शेतकरी लावत आहेत. एक सापळा ५० ते ६० रुपयाला मिळत आहे. हा खर्च वाढल्याने शेतकऱ्यांचे बजेट बिघडले आहे. तसेच पीक व्यवस्थित हाती येईल की नाही? अशी शंकाही आहे. कृषी विभागाने तातडीने उपाययोजना हाती घ्याव्यात, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.


इतर ताज्या घडामोडी
गोरेगाव आणि देगावांतील शेतकऱ्यांच्या...अकोला  ः जिल्ह्यातील गोरेगाव व देगाव या दोन...
जळगाव जिल्ह्यात अर्ली केळी लागवड सुरूजळगाव  ः जिल्ह्यात यावल, रावेर, मुक्ताईनगर,...
...अखेर रुईखेड येथे हवामान केंद्र स्थापनअकोला  ः महावेध व हवामान आधारित फळपीक विमा...
चांदवड येथे शेतकरी संघटनेची कांदा परिषद...नाशिक  : केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री...
गोंदिया : नुकसानग्रस्तांचे डोळे लागले...सडक अर्जुनी, गोंदिया  ः खरीप हंगामात अवकाळी...
जळगाव : किसान सन्मानच्या लाभाची...जळगाव ः शासनाकडून राबविण्यात येणाऱ्या...
परभणी जिल्ह्यात नादुरुस्त बंधाऱ्यांमुळे...परभणी : जिल्हा परिषदेच्या लघू पाटबंधारे...
कर्जमुक्ती योजनेंतर्गत ७४६ शेतकऱ्यांचे...नाशिक : महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
किसान सभेचे बिऱ्हाड आंदोलन मागेनाशिक  : दिंडोरी तालुक्यामध्ये गेल्या अनेक...
लातूर, उस्मानाबाद जिल्ह्यात हेक्‍टरी १०...उस्मानाबाद : दोन्ही जिल्ह्यातील कापूस व तुरीची...
पाणी सोडण्याविरुद्ध रेणा प्रकल्पस्थळी...रेणापूर, जि. लातूर : भंडारवाडी (ता. रेणापूर)...
वणवा नुकसानग्रस्तांना सिंधुदुर्ग ‘झेडपी...सिंधुदुर्ग : ‘‘वणव्यामुळे नुकसान झालेल्या...
सांगलीत ‘रोहयो’तून डाळिंब लागवडीला ‘...आटपाडी, जि. सांगली : पावणे दोन वर्षांत येथील...
पुणे जिल्ह्यात हरभऱ्याला रोग-किडीचा फटकापुणे ः रब्बी हंगामात वाफसा न झाल्याने अनेक...
नगर जिल्ह्यातील अतिवृष्टीग्रस्तांना मदत...नगर ः अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीची...
पीकविम्याची रक्कम लवकरच ः कृषिमंत्री...मुंबई ः राज्यातील शेतकऱ्यांना १५ ते २० दिवसांच्या...
सातारा जिल्ह्यात अडीच महिन्यांत केवळ ४४...सातारा ः दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू...
मराठवाड्यातील दूध संकलनात घटऔरंगाबाद : मराठवाड्यातील दूध संकलनात गतवर्षी...
पहाटेच्या शपथविधीची विधानसभेत आठवणमुंबई ः देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी...
मराठवाडी धरणग्रस्तांनी बंद पाडले धरणाचे...ढेबेवाडी, जि. सातारा : ‘आधी पुनर्वसन मगच धरण’ या...