बिलाची थकीत रक्कम न भरल्यास आता थेट वीजतोडणीची (कनेक्शन कट) कारवाई करण्याचा इशारा महावितरणने राज्
ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळी
या अळीचा प्रसाराचा वेग जास्त असल्यामुळे तिचा प्रादुर्भाव आढळून आल्यास तत्काळ उपाययोजना कराव्या. त्यानंतर तिचे व्यवस्थापन होते. - डॉ. संजीव बंटेवाड, प्रमुख कीटकशास्त्र विभाग.
परभणी : जिल्ह्यातील पेडगाव (ता. परभणी) येथील दोन शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी ज्वारीवर अमेरिकन लष्करी अळीचा (फॅाल अर्मी वर्म) स्पोडोप्टेरा फ्रुजी फर्डाचा प्रादुर्भाव झाला असल्याचे सोमवारी (ता. १८) आढळून आले.
पेडगाव येथील तरुण शेतकरी मंगेश देशमुख यांनी ‘महाबीज’च्या बीजोत्पादन कार्यक्रमातंर्गत २७ सप्टेंबर रोजी दोन एकर क्षेत्रावर रब्बी ज्वारीच्या मालदांडी या वाणाची पेरणी केली. पिकाने कांडे धरले आहेत. रविवारी (ता.१७) सायंकाळी देशमुख यांनी निरीक्षण केले. त्या वेळी ज्वारीच्या पोंगे कुरतडून त्यामध्ये अळीची विष्ठा आढळून आली. सोमवारी सकाळी परत शेतावर जाऊन त्यांनी ज्वारीच्या पिकाचे बारकाईने निरीक्षण केले. त्या वेळी पोंग्यामध्ये अमेरिकन लष्करी अळी असल्याचे आढळून आले. अनेक ठिकाणी या अळ्यांच्या विविध अवस्था आढळून आल्या. देशमुख यांच्या शेतापासून काही अंतरावर असलेल्या सुरवसे यांच्या ज्वारीवरदेखील अळीचा प्रादुर्भाव आढळून आला. देशमुख यांनी पावसाने उघडीप दिल्यानंतर गेल्या आठवड्यामध्ये कीटकनाशकाची फवारणी केली. परंतु त्यानंतर आता लष्करी अळीचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे.
गतवर्षीच्या नोव्हेंबर इटलापूर (ता. परभणी) येथील शेतकरी बाळासाहेब पुंड यांच्या शेतातील ज्वारीवर प्रथमच अमेरिकन लष्करी अळी आढळून आली होती. यंदाच्या खरिप हंगामात जिल्ह्यात विविध ठिकाणच्या मका पिकावर तसेच मांडाखळी (ता. परभणी) येथे कपाशीवर ही अळी आढळून आली होती. जिल्ह्यात रब्बी ज्वारीचे सर्वसाधारण क्षेत्र १ लाख ५९ हजार ७८ एवढे आहे.
आजवर ८ हजार हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली. सध्या अनेक भागात ज्वारी पेरणी सुरू आहे. ज्वारी पिकावर पहिल्या दीड महिन्याच्या कालावधीत ही अळी आढळून येते. ज्वारीची पाने कुरतडून ती पोंग्यामध्ये शिरते. ही अळी अतिशय खादाड आहे. तिच्या विष्ठेमुळे चारा पिकांच्या पानांची प्रत खराब होते. या अळीचा पंतग एका रात्रीमध्ये १०० किलोमीटर अंतर पार करून जाऊ शकतो. त्यामुळे या अळीचा प्रसार खूप वेगाने होतो. प्रमुख अन्नधान्य आणि चारा पीक असेलल्या ज्वारीच्या संरक्षणासाठी अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव वेळेवर ओळखणे आवश्यक आहे. त्यासाठी शेतकऱ्यांनी दररोज ज्वारीच्या पिकांची निरीक्षणे घ्यावी.
असे करा व्यवस्थापन....
अमेरिकन लष्करी अळीचा प्रादुर्भाव आढळून आल्यास आणि तो कमी असल्यास प्रादुर्भावग्रस्त पोंगे नष्ट करावे. ५ टक्के निंबोळी अर्काची फवारणी करावी. मेटारायझीम अॅनिसोफिली ५० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. नोमुरिया रिलायी ५० ग्रॅम १० लिटर पाण्यात मिसळून साध्या पंपाने फवारणी करावी. पावर स्प्रेसाठी औषधीचे तिप्पट प्रमाण वापरावे. एकात्मिक कीड व्यवस्थापनासाठी एकरी दोन किंवा तीन या प्रमाणात कामगंध सापळे लावावे.
- 1 of 1025
- ››