Agriculture news in marathi Falling onion prices again, farmers helpless | Agrowon

नगरमध्ये कांद्याच्या दरात पुन्हा घसरण, शेतकरी हतबल

टीम अॅग्रोवन
सोमवार, 22 मार्च 2021

नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत ५८ हजार गोण्याची आवक झाली. प्रती क्विंटल कांद्याला ३०० ते १४०० रुपयाचे आणि सरासरी ९०० रुपयांचा दर मिळाला. 

नगर : नगर जिल्ह्यात कांदा दरात पुन्हा घसरण झाली आहे. शनिवारी (ता. २०) नगर येथील दादा पाटील शेळके कृषी उत्पन्न बाजार समितीत ५८ हजार गोण्याची आवक झाली. प्रती क्विंटल कांद्याला ३०० ते १४०० रुपयाचे आणि सरासरी ९०० रुपयांचा दर मिळाला. मागील आठवड्यात साधारण दोन हजारांपर्यत दर होता. कांद्याच्या दरात वरचेवर घसरण होत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी हतबल झाले आहे. किरकोळ बाजारात मात्र हाच कांदा तीस ते चाळीस रुपये किलो दराने विकला जात आहे. 

नगर जिल्ह्यात रब्बीत कांद्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. यंदा रब्बीत आतापर्यत सुमारे १ लाख ५५ हजार हेक्टरपर्यंत लागवड झाली आहे. रब्बीत लवकर लागवड झालेला कांदा बाजारात येऊ लागला आहे. आवक वाढलेली दिसताच कांद्याचे दर पाडले जात असल्याचे दिसून येत आहे. मागील आठवड्यात साधारण दोन हजाराच्या पुढे प्रती क्विंटल दर होता. तो दर आता १४०० रुपयांपर्यंत आला असून, सरासरी ९०० रुपयांपर्यतच दर मिळत आहे. घोडेगाव (नेवासा) राहाता, संगमनेर, राहुरी, पारनेर बाजार समितीतही अशाच पद्धतीने दर आहे. गेल्या वर्षभरात जास्तीचा पाऊस व अन्य संकटामुळे कांदा उत्पादक सातत्याने आडचणीत येत आहे. 

यंदा पुरेसे बियाणे उपलब्ध झाले नसल्याने दरवर्षीच्या तुलनेत यंदा दुप्पट दराने बियाणे खरेदी करावे लागले. आता कांदा घरात येऊ लागला की दर पाडले जात असल्याने शेतकरी हतबल झाले आहे. त्यातच पुन्हा दोन दिवसांपासून अवकाळी पावसाचे संकटही कांदा उत्पादकांच्या जीवाला घोर लावत आहे. शनिवारी (ता. २०) नगर बाजार समितीत एक नंबरच्या कांद्याला ११०० ते १४००, दोन नंबरच्या कांद्याला ८०० ते ११००, तीन नंबरच्या कांद्याला ५०० ते ८०० व चार नंबरच्या कांद्याला ३०० ते ५०० रुपयांचा दर मिळाला.


इतर ताज्या घडामोडी
ट्रायकोडर्मा वापरण्याच्या पद्धतीट्रायकोडर्मा ही उपयुक्त बुरशी असून, ती रोपांच्या...
जनावरांचे पावसाळ्यातील व्यवस्थापनपावसाळ्यात होणाऱ्या वातावरणातील अचानक बदलामुळे...
खानदेशात अत्यल्प पेरणीजळगाव ः खानदेशात या महिन्यात अपवाद वगळता हवा तसा...
नांदेडमध्ये सोयाबीनचे क्षेत्र वाढण्याची...नांदेड : जिल्ह्यात यंदा चार लाख हेक्टरवर...
परभणीत १२.६४ टक्के पेरणीपरभणी ः जिल्ह्यात यंदाच्या (२०२१) खरीप हंगामात...
देशात वीज पडून दरवर्षी दोन हजार...पुणे : हरिताच्छादन कमी झाल्याने होणारी तापमान वाढ...
कांदा उत्पादक शेतकऱ्याचा प्रामणिकपणानाशिक : जगात प्रामाणिकपणा लोप पावत चालला असल्याची...
अन्नद्रव्यांवरून खतांचे व्यवस्थापन...गेवराई, जि. बीड : जमिनीतील उपलब्ध...
आंबेओहळ प्रकल्पात  ३० टक्के पाणीसाठाकोल्हापूर : आजरा तालुक्यात असलेल्या आंबेओहळ...
वनौषधी पानपिंपरीचे दर वाढल्याने...अकोला ः जिल्ह्यात सातपुड्याच्या पायथ्याशी अकोट,...
नुकसान टाळण्यासाठी  मिश्र पिकांवर भरराळेगाव, जि. यवतमाळ : गेल्या वर्षी कपाशीवर आलेली...
यवतमाळमध्ये अनधिकृत खतांचा साठा जप्तयवतमाळ : परवान्यात नसतानाही खतांचा अनधिकृतपणे...
सांगली जिल्ह्यात खरिपाची २५ टक्के...सांगली : जिल्ह्यात खरीप हंगामाचे सरासरी क्षेत्र २...
सूक्ष्म खाद्य उन्नयन योजनेसाठी अर्ज...वाशीम : जिल्ह्यात २०२०-२१ ते २०२४-२५ या...
पुण्याचा पर्यटन विकास आराखडा तयार करा पुणे : जिल्ह्याच्या पर्यटन विकासासाठी सविस्तर...
प्रताप सरनाईकांचे ठाकरेंना पत्र; ...मुंबई : शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांनी...
काळानुरूप बदल स्वीकारा : नितीन गडकरीवर्धा : बाजार समित्यांनी केवळ शेतमाल खरेदी विक्री...
संत्रा आयात शुल्कप्रकरणी बांगलादेशशी...अमरावती : नागपुरी संत्र्याचा सर्वात मोठा आयातदार...
मॅग्नेट ः फलोत्पादन पिकांसाठी एकात्मिक...राज्यातील कृषी हवामान विभागनिहाय फळे, भाजीपाला व...
शेतीवरील आर्थिक ताण कमी करण्यासाठी...हरितक्रांतीनंतर काही दशकांमध्ये विपरीत परिणाम...