नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात घसरण

आठ दिवसांपूर्वी वाढ झालेल्या कांद्याच्या दरात नगर जिल्ह्यात पुन्हा घसरण झाली आहे. साधारण आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत गेलेला कांद्याचा दर सोमवारी (ता. २६) सरासरी पाच हजारावर आला आहे. दरात घसरण झाल्याने आवकही कमी झाली आहे. कांद्याचे दर पाडल्याने कांदा उत्पादकांत संताप व्यक्त करत आहेत.
Falling onion prices in Nagar district
Falling onion prices in Nagar district

नगर : आठ दिवसांपूर्वी वाढ झालेल्या कांद्याच्या दरात नगर जिल्ह्यात पुन्हा घसरण झाली आहे. साधारण आठ ते दहा हजार रुपयांपर्यंत गेलेला कांद्याचा दर सोमवारी (ता. २६) सरासरी पाच हजारावर आला आहे. दरात घसरण झाल्याने आवकही कमी झाली आहे. कांद्याचे दर पाडल्याने कांदा उत्पादकांत संताप व्यक्त करत आहेत.

नगर जिल्ह्यातील नगर, नेवासा, राहुरी, पारनेरसह अन्य बाजार समित्यांत गेल्या आठवड्यात कांद्याच्या दरात चांगली वाढ झाली होती. बऱ्याच दिवसानंतर कांद्याला दर मिळू लागल्याने कांदा उत्पादकांत समाधान व्यक्त केले जात होते. मागील आठवड्यात नेवासेच्या घोडेगाव उपबाजारात बारा हजारापर्यंत तर नगर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात दहा हजारापर्यंत दर गेला होता.

दोन दिवसांत मात्र पुन्हा कांदा दरात घसरण झाली आहे. मोजक्याच कांद्याला चार ते सहा हजार दोनशेचा दर मिळाला. येथेही सरासरी साडेचार हजाराचा दर होता. दर कमी झाल्याचे कळताच आवकेतही घट झाली. नगरला साधारण पन्नास ते साठ हजार गोण्यांची आवक होत असती. सोमवारी तीस हजार गोण्याची आवक झाली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com