Agriculture news in marathi Falling at the shopping center without counting the grains | Agrowon

कुर्जा खरेदी केंद्रावर धान मोजणीविना पडून 

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 22 एप्रिल 2021

पवनी तालुक्यातील कुर्जा येथे अनेक शेतकऱ्यांचे धान मोजणीअभावी पडून आहे. परिणामी, या शेतकऱ्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्‍यांना निवेदन देत संबंधित प्रकरणी कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्‍यांनी केली आहे. 

भंडारा : पवनी तालुक्यातील कुर्जा येथे अनेक शेतकऱ्यांचे धान मोजणीअभावी पडून आहे. परिणामी, या शेतकऱ्यांना मानसिक व शारीरिक त्रास सहन करावा लागत आहे. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्‍यांना निवेदन देत संबंधित प्रकरणी कारवाई करून न्याय द्यावा, अशी मागणी शेतकऱ्‍यांनी केली आहे. 

निवेदनानुसार, २०२० अंतर्गत शासनाने हमीभावाने धान खरेदी सुरू केली होती. या केंद्रावर शेतकऱ्यांनी धान विक्रीसाठी आणले. ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यांत आधारभूत धान खरेदी केंद्र येथे देण्यात आले होते. पण पाच महिन्यांचा कालावधी लोटूनही शेतकऱ्यांचे धान मोजण्यात आले नाही. त्यामुळेच या आधारभूत धान खरेदी केंद्रावर गैरव्यवहार होत असल्याचा आरोपही शेतकरी करत आहेत. 

जिल्हा पणन अधिकारी यांनी आधारभूत धान खरेदी केंद्रामधून कुर्जा व वासेळा या गावांना जोडून खरेदी थांबविली, तसेच अधिकाऱ्यांनी धान खरेदी केंद्र तीन मार्चपासून मेंढा पुनर्वसन येथे सुरू केले. सदर केंद्र सुरळीत चालले नाही. सद्यःस्थितीत पूर्णपणे धान खरेदी बंद आहे. एकंदरीत परिस्थिती लक्षात घेता जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणी जातीने लक्ष घालून शेतकऱ्यांचे धान मोजून द्यावे व संबंधितांची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी शेतकऱ्‍यांनी केली आहे. 

निवेदनावर रामू रामटेके, राहुल सोनटक्के, एकनाथ मुंडे, गुंडेराव कावळे, राजकुमार बारेकर, विजय गजभिये, सिद्धार्थ रामटेके, रतिराम दंडारे, केशव चित्रित, कवळू रघुदे, मुरलीधर रघुदे, मधुकर रघुदे, सुखदेव पुंडे, पिंटू पुंडे, दामोदर कावळे, दौलत खडसंगी, परसराम डुकरे, राजकुमार येटरे यांच्या स्वाक्षऱ्‍या आहेत. 


इतर ताज्या घडामोडी
सोयाबीन पेंडची आयात शुल्काविना करावीनागपूर : भारतात सोयाबीन पेंडचे दर गगनाला...
दूधदरात पुन्हा दोन रुपयांची कपातनगर ः कोरोना संसर्ग वरचेवर वाढत असल्याने लॉकडाउन...
देशातील पहिले कृषी निर्यात मार्गदर्शन...पुणे ः राज्यातील शेतकरी व उदयोन्मुख...
उत्तर भारतातील कापूस लागवड पूर्णत्वाकडेजळगाव ः देशात उत्तर भारतातील कापूस लागवडीने वेग...
कृषी खात्यातील बदल्या लांबणीवरपुणे ः ऐन कोरोना कालावधीत बदल्यांचा घाट रचलेल्या...
खाद्यतेल दरात गतवर्षीपेक्षा ८० टक्के वाढनागपूर : शेंगदाण्याची निर्यात तसेच पाम तेलावरील...
पूर्व विदर्भात ४५ लाख क्विंटल धान खराब...गोंदिया : भात उत्पादक पूर्व विदर्भातील पाच...
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...