नगर ः कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात चिकन, अंड्याला मागणी वाढली आहे.
ताज्या घडामोडी
परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट दूरच
परभणी ः जिल्ह्यात यावर्षी गुरुवार (ता.२५) पर्यंत विविध बॅंकांनी २९ हजार ९८९ शेतकऱ्यांना १६१ कोटी ६७ लाख रुपये (३५.७८ टक्के) रब्बी पीककर्जाचे वाटप केले आहे.
परभणी ः जिल्ह्यात यावर्षी गुरुवार (ता.२५) पर्यंत विविध बॅंकांनी २९ हजार ९८९ शेतकऱ्यांना १६१ कोटी ६७ लाख रुपये (३५.७८ टक्के) रब्बी पीककर्जाचे वाटप केले आहे. जिल्हा बॅंकेचे कर्जवाटपाचे प्रमाण सर्वाधिक, तर राष्ट्रीयकृत बॅंकांचे सर्वात कमी आहे. यंदा एकंदरीत वाटपाची टक्केवारी वाढली आहे. परंतु उद्दिष्टपूर्ती मात्र अजून दूर आहे.
यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील बॅंकांना ४५१ कोटी ८७ लाख रुपये एवढे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात राष्ट्रीयकृत बॅंकांना २५८ कोटी ३४ लाख रुपये, खासगी बॅंकांना ३४ कोटी ८३ लाख रुपये, महाराष्ट्र्र ग्रामीण बॅंकेला ४७ कोटी ४८ लाख रुपये, जिल्हा बॅंकेला १११ कोटी २२ लाख रुपये उद्दिष्ट आहे.
जिल्ह्यातील ११ राष्ट्रीयकृत बॅंकांच्या शाखांना सर्वाधिक पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. परंतु, या बॅंकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतला. त्यामुळे आजवर ४ हजार २२८ शेतकऱ्यांना ३२ कोटी ७३ लाख रुपये कर्जवाटप केले. भारतीय स्टेट बॅंकेने १ हजार ५५० शेतकऱ्यांना ११ कोटी ५० लाख रुपये, बॅंक ऑफ बडोदाने ८५ शेतकऱ्यांना २ कोटी ५० लाख रुपये, बॅंक ऑफ इंडियाने २४५ शेतकऱ्यांना ३ कोटी १९ लाख रुपये, बॅंक ऑफ महाराष्ट्राने ४१० शेतकऱ्यांना २ कोटी ५० लाख रुपये, कॅनरा बॅंकेने ८१९ शेतकऱ्यांना ५ कोटी २ लाख रुपये, युनियन बॅकेने ४२३ शेतकऱ्यांना ३ कोटी ४० लाख रुपये पीक कर्जवाटप केले.
सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने ३७ शेतकऱ्यांना ४५ लाख रुपये, पंजाब नॅशनल बॅंकेने ५० शेतकऱ्यांना ४० लाख रुपये, इंडियन ओव्हरसीज बॅंकेने १७५ शेतकऱ्यांना १ कोटी ७० लाख रुपये, युको बॅंकेने ३६० शेतकऱ्यांना २ कोटी ८१ लाख रुपये कर्जवाटप केले. इंडियन बॅंकेने कर्ज वाटप केले नाही.
एचडीएफसी बॅंकेने १ शेतकऱ्यास ७ लाख रुपये आणि आयसीआयसीआय बॅंकेने ५२३ शेतकऱ्यांना ८ कोटी १६ लाख रुपये, आयडीबीआयने ४८६ शेतकऱ्यांना १ कोटी २६ लाख रुपये, अॅक्सिस बॅंकेने १ शेतकऱ्यांस ११ लाख रुपये कर्जवाटप केले.