agriculture news in marathi Far from the objective of crop loan disbursement in Parbhani district | Page 2 ||| Agrowon

परभणी जिल्ह्यात पीक कर्जवाटपाचे उद्दिष्ट दूरच

टीम अॅग्रोवन
बुधवार, 3 मार्च 2021

परभणी ः जिल्ह्यात यावर्षी गुरुवार (ता.२५) पर्यंत विविध बॅंकांनी २९ हजार ९८९ शेतकऱ्यांना १६१ कोटी ६७ लाख रुपये (३५.७८ टक्के) रब्बी पीककर्जाचे वाटप केले आहे.

परभणी ः जिल्ह्यात यावर्षी गुरुवार (ता.२५) पर्यंत विविध बॅंकांनी २९ हजार ९८९ शेतकऱ्यांना १६१ कोटी ६७ लाख रुपये (३५.७८ टक्के) रब्बी पीककर्जाचे वाटप केले आहे. जिल्हा बॅंकेचे कर्जवाटपाचे प्रमाण सर्वाधिक, तर राष्ट्रीयकृत बॅंकांचे सर्वात कमी आहे. यंदा एकंदरीत वाटपाची टक्केवारी वाढली आहे. परंतु उद्दिष्टपूर्ती मात्र अजून दूर आहे.

यंदाच्या रब्बी हंगामात जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील बॅंकांना ४५१ कोटी ८७ लाख रुपये एवढे पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. त्यात राष्ट्रीयकृत बॅंकांना २५८ कोटी ३४ लाख रुपये, खासगी बॅंकांना ३४ कोटी ८३ लाख रुपये, महाराष्ट्र्र  ग्रामीण बॅंकेला ४७ कोटी ४८ लाख रुपये, जिल्हा बॅंकेला १११ कोटी २२ लाख रुपये उद्दिष्ट आहे.

जिल्ह्यातील ११ राष्ट्रीयकृत बॅंकांच्या शाखांना सर्वाधिक पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. परंतु, या बॅंकांनी कर्जवाटपात हात आखडता घेतला. त्यामुळे आजवर ४ हजार २२८ शेतकऱ्यांना ३२ कोटी ७३ लाख रुपये कर्जवाटप केले. भारतीय स्टेट बॅंकेने १ हजार ५५० शेतकऱ्यांना ११ कोटी ५० लाख रुपये, बॅंक ऑफ बडोदाने ८५ शेतकऱ्यांना २ कोटी ५० लाख रुपये, बॅंक ऑफ इंडियाने २४५ शेतकऱ्यांना ३ कोटी १९ लाख रुपये, बॅंक ऑफ महाराष्ट्राने ४१० शेतकऱ्यांना २ कोटी ५० लाख रुपये, कॅनरा बॅंकेने ८१९ शेतकऱ्यांना ५ कोटी २ लाख रुपये, युनियन बॅकेने ४२३ शेतकऱ्यांना ३ कोटी ४० लाख रुपये पीक कर्जवाटप केले.

सेंट्रल बॅंक ऑफ इंडियाने ३७ शेतकऱ्यांना ४५ लाख रुपये, पंजाब नॅशनल बॅंकेने ५० शेतकऱ्यांना ४० लाख रुपये, इंडियन ओव्हरसीज बॅंकेने १७५ शेतकऱ्यांना १ कोटी ७० लाख रुपये, युको बॅंकेने ३६० शेतकऱ्यांना २ कोटी ८१  लाख रुपये कर्जवाटप केले. इंडियन बॅंकेने कर्ज वाटप केले नाही.

एचडीएफसी बॅंकेने १ शेतकऱ्यास ७ लाख रुपये आणि आयसीआयसीआय बॅंकेने ५२३  शेतकऱ्यांना ८ कोटी १६ लाख रुपये, आयडीबीआयने ४८६ शेतकऱ्यांना १ कोटी २६ लाख रुपये, अॅक्सिस बॅंकेने १ शेतकऱ्यांस ११ लाख रुपये कर्जवाटप केले. 


इतर ताज्या घडामोडी
फळाचे ‘प्रमोशन’, मूल्यवर्धन होण्याची...चिकू बागायतदार संघाच्या वतीने राज्यातील चिकू...
अकोला जिल्हा परिषदेत खांदेपालटाची चर्चा अकोला : जिल्हा परिषदेत सत्तारूढ असलेल्या वंचित...
प्रक्रिया उद्योगाला चालना देणारनारळ लागवडीचे क्षेत्र वाढविताना शेतकऱ्यांच्या...
सामूहिक प्रयत्नातून काजू उत्पादकांची...जागतिक बाजारपेठेत वैशिष्ट्यपूर्ण चव असलेल्या...
क्षेत्र वाढ, प्रक्रियेसाठी सरकारी...देशात पेरू लागवडीचे सुमारे तीन लाख हेक्टर आणि...
दुर्लक्षित पिकांनाही येत्या काळात संधीद्राक्ष, डाळिंब, आंबा, केळी, संत्रा ही राज्याच्या...
आधुनिक फुलशेती संशोधन, निर्यात...गेल्या काही वर्षांत व्यावसायिक आणि उद्योगाचा...
खरीप हंगामाच्या तोंडावर ...यवतमाळ : गेल्या दशकात जिल्ह्यातील शेतकरी कधी...
अमरावतीत शासकीय दूध योजनेच्या संकलनात ...अमरावती : कोरोनामुळे हॉटेल आणि दुग्धजन्य पदार्थ...
‘आंबेओहोळ’ची घळभरणी अंतिम टप्यात उत्तूर, जि. कोल्हापूर : आरदाळ-उत्तूर (ता. आजरा)...
म्हैसाळ योजनेतून सांगोल्यासाठी पाणी...सांगोला, जि. सोलापूर : सांगोला वितरिका क्रमांक...
सहा कारखान्यांनी उरकले गाळप; ९७ लाख ३८... सातारा : जिल्ह्यातील साखर हंगाम अंतिम टप्प्यात...
खरिपासाठी नगरमध्ये साडेसहा लाख हेक्टर...पुणे नगर : नगर जिल्ह्यात यंदा खरिपासाठी यंदा ६...
परभणीतील शेतकऱ्यांना ८३ कोटींचा विमा...परभणी : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गंत सन...
ग्रामसभा करणार तेंदुपत्याची विक्री गडचिरोली : पेसा (पंचायत एक्स्टेंशन टू शेडूल...
ग्रामीण रुग्णांसाठी जिल्हा परिषद...सोलापूर ः जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा...
कृषी पणन मंडळाकडून आॅनालाइन आंबा...पुणे ः कोरोना संकटातही आंबा उत्पादक शेतकऱ्यांच्या...
अखेर मोसंबी उत्पादकांना विमा परतावा...जालना : जिल्ह्यातील सहा हजारांवर मोसंबी...
राहीबाई पोपेरे यांची वनस्पती संरक्षण...नाशिक : भारत सरकारच्या कृषी व शेतकरी कल्याण...
डाळिंब अंबिया बहरातील कीड- रोग...डाळिंब बागेत विविध कीड-रोगांचा प्रादुर्भाव मोठ्या...