agriculture news in marathi Before Farm Bills also farmers were selling their product where they want : Sharad Pawar | Agrowon

कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू शकत होता : पवार

टीम अॅग्रोवन
बुधवार, 30 सप्टेंबर 2020

केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकाआधीही शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कुठेही विकता येत होता : शरद पवार

सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी विधेयकाआधीही शेतकऱ्यांना त्यांचा शेतमाल कुठेही विकता येत होता, याकडे लक्ष वेधताना नव्या कृषी विधेयकाला सर्वस्तरातून विरोध होत आहे, हा विरोध लक्षात घ्या, आज विविध पक्ष, संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. पण यापुढे शेतकरीच त्याच्या विरोधासाठी नेतृत्व करतील, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरद पवार यांनी मंगळवारी (ता.२९) पंढरपुरात कृषी विधेयकाबाबत आपले मत व्यक्त केले.

पंढरपूरचे माजी आमदार सुधाकर परिचारक यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्या कुटुंबीयांच्या सांत्वनासाठी श्री. पवार पंढरपुरात आले होते. तत्पूर्वी भोसे (ता.पंढरपूर) येथील पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष राजूबापू पाटील यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील तिघांचे कोरोनाने गेल्या महिन्यात निधन झाले होते. त्यांच्या कुटुंबीयांचीही पवार यांनी भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी ते बोलत होते.

कृषी विधेयकासह संजय राऊत- फडणवीस भेट, सुशांतसिंग प्रकरण, मराठा आरक्षण या सध्याच्या घडामोडींवर त्यांनी मते व्यक्त केली. श्री. पवार म्हणाले, संजय राऊत हे संपादक आहेत. त्यांनी प्रथम माझी मुलाखत घेतली. त्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह भाजपच्या नेत्यांच्या मुलाखती घेणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे काळजी नसावी, सरकार पाचवर्षे टिकेल.

सुशांतसिंग प्रकरणी केंद्र सरकारने विविध तपास संस्था कामाला लावल्या. पण आज काय, सर्वांनाच दिसते आहे. आज हा तपास भलतीकडेच सुरु आहे. मराठा आरक्षणावर छत्रपती उदयनराजे, संभाजीराजे या दोघांना भाजपने खासदार केले आहे. ते त्यांचीच बाजू मांडणार. त्यामुळे त्यांनी हा प्रश्न भाजपकडूनच सोडवून घ्यावा, असा टोलाही लगावला.

विरोधी पक्षांना एकत्र करणार
कृषी विधेयकाच्या विरोधात विविध राज्यांनी वेगवेगळी भूमिका घेतली आहे. उत्पादन खर्चाचा विचार करुन शेतीमालाला किंमत देण्याचे धोरण सरकारने ठेवायला हवे. या विधेयकांमध्ये दुरुस्ती करण्याची गरज आहे. विधेयकासंदर्भात सगळ्या विरोधी पक्षांना एकत्रित करुन काय निर्णय घेता येईल, याचाही विचार सुरु असल्याचे श्री. पवार म्हणाले. 


इतर ताज्या घडामोडी
धान खरेदी प्रभावित होण्याची शक्यताभंडारा : खरीप हंगामातील धान केंद्र सुरू...
आम्ही तुमच्यासोबत: मुख्यमंत्रीसोलापूर ः सध्या पाऊस थांबला आहे, पण पुढच्या दोन...
कृषी विद्यापीठ कर्मचारी करणार वेतन...नागपूर: सातव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची...
राज्याने जबाबदारी झटकू नये: देवेंद्र...बारामती, जि. पुणेः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी...
कोल्हापुरात नुकसानीचे पंचनामे वेगातकोल्हापूर : जिल्ह्यात आठवडाभर झालेल्या पावसाने...
आटपाडी तालुक्यात चार वेळा अतिवृष्टीआटपाडी, जि. सांगली : बॅंका, विकास सेवा सोसायट्या...
डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा...मुंबई: डहाणू तालुक्यात अनुदानित युरियाचा जोरदार...
संत्रापट्ट्यासाठी अनुदानाचे निकष बदलाअमरावती : संत्राबाग कीड-रोग रोगमुक्त ठेवण्यासाठी...
अकोल्यात ज्वारीच्या कणसातून निघाले कोंबअकोला ः जिल्ह्यात यंदाच्या हंगामात असमतोल...
जळगावात खपली गहू पेरणी वाढणारजळगाव ः आरोग्यदायी, शेतकऱ्यांना चांगले दर मिळवून...
अकोट येथे उडीद पिकाची प्रतिकात्मक होळीअकोला ः पावसाने पिकांची दाणादाण उडविली आहे....
खानदेशात सोयाबीनचे अनेक शेतकऱ्यांना...जळगाव ः खानदेशात सोयाबीनची पेरणी यंदा बऱ्यापैकी...
शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे...नाशिक : ‘‘अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे...
पुणे जिल्ह्यात पावसाने वाढवली चिंतापुणे ः परतीच्या पावसाने पुन्हा जोर धरला आहे. या...
राज्य शासन खंबीरपणे शेतकऱ्यांच्या...बीड : ‘‘परतीच्या जोरदार पावसांने खरीप पिकांचे...
कर्ज काढू, पण मदत करू ः वडेट्टीवारनांदेड : ‘‘अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या...
विविध प्रकल्प उभे राहण्यासाठी शेतकरी गट...औरंगाबाद : ‘‘जिल्ह्यामध्ये पोकरा, स्मार्ट, एक...
अधिक उत्पादन देणारे एरंडी, हरभरा पिकवा...नांदेड : ‘‘शेतकऱ्यांनी अधिक उत्पादन देणारे एरंडी...
शेतकऱ्यांना जास्तीत जास्त भरपाईसाठी...सोलापूर ः ‘‘राज्य शासनाकडून जिल्ह्यातील...
नगरमध्ये कांदा आठ हजार रुपये क्विंटलनगर ः नगर जिल्ह्यात कांद्याच्या दरात तेजी कायम...