agriculture news in Marathi farm equipment make available Maharashtra | Page 3 ||| Agrowon

रत्नागिरी : शेती साहित्य, अवजारे उपलब्ध करून द्या

टीम अॅग्रोवन
रविवार, 24 मे 2020

कोरोनाबाधित क्षेत्र वगळून जिल्ह्यातील अन्य सर्व भागातील शेतकऱ्यांना आवश्यक शेतीची साहित्य आणि अवजारे उपलब्ध करून द्या.

रत्नागिरी ः कोरोनाबाधित क्षेत्र वगळून जिल्ह्यातील अन्य सर्व भागातील शेतकऱ्यांना आवश्यक शेतीची साहित्य आणि अवजारे उपलब्ध करून द्या, अशा सूचना जिल्हा परिषद उपाध्यक्ष महेश नाटेकर यांनी कृषी समितीच्या बैठकीत अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. 

कृषी समितीची बैठक नुकतीच जिल्हा परिषदेत झाली. या वेळी मागील वर्षात झालेल्या खर्चांचा आढावा घेण्यात आला. मार्च २०२० अखेरपर्यंत ९८ टक्के निधी खर्ची पडल्याचे कृषी अधिकाऱ्यांनी या वेळी सांगितले. कोरोनामुळे केलेल्या टाळेबंदीच्या वातावरणातही कृषी अधिकाऱ्यांनी तळागाळातील लोकांच्या संपर्कात राहून जिल्हा परिषदेतर्फे आवश्यक अनुदानावरील साहित्य पोच केले; मात्र रेड झोनमधील शेतकऱ्यांना त्याचा लाभ घेता आलेला नव्हता.

कृषी विभागाला २०१९-२० या आर्थिक वर्षासाठी ५५ लाखाचा निधी मंजूर होता. त्यातून ताडपत्री, आंब्याचे ट्रे, फवारणी पंप यासह शेतीविषयक साहित्य अनुदानावर शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार होते. त्यासाठीच्या याद्या मंजूर करून ठेवण्यात आल्या होत्या. वस्तू खरेदी केल्या गेल्या. मात्र आयत्यावेळी कोरोनाने पाय पसरल्यामुळे वाटप करण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यावरही कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांनी मात करत काम केले. या बद्दल नाटेकर यांनी प्रशासनाचे कौतुक केले. 

या बैठकीमध्ये येऊ घातलेल्या खरीप हंगामाचे नियोजन करण्यात आले. पुढील वर्षात शेतकऱ्यांना आवश्यक शेतीची अवजारे तत्काळ उपलब्ध करून द्या, अशा सूचना नाटेकर यांनी केल्या आहेत. ज्या शेतकऱ्यांचे अर्ज आले आहेत, त्याची छाननी करा आणि साहित्य मंजूर करा तसेच अन्य शेतकऱ्यांचे अर्ज मागवून ते पुढील प्रक्रियेसाठी पाठवून द्या. ज्या भागात कोरोनाचा प्रादुर्भाव नसेल तिथे वस्तूंचे वाटप सुरू करा. यंदा आर्थिक वर्षासाठी ५० लाख रुपये उपलब्ध आहेत. 

गतवर्षीच्या तुलनेत पाच लाखाचा कमी निधी मिळाला आहे. तसे नियोजन करावे लागणार आहे. जिल्ह्यासाठी २० हजार टन खताची मागणी करण्यात आली आहे. त्यातील दोन हजार टन खत उपलब्ध आहे. तसेच सुमारे तीन हजार टन बियाणेही विक्रीसाठी उपलब्ध आहे. आवश्यक खतसाठा येत्या दोन दिवसात मिळेल, असा विश्‍वास या बैठकीत कृषी विकास अधिकारी अजय शेंडे यांनी व्यक्त केला. 


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम;...रत्नागिरी  ः जिल्ह्यात पावसाचा जोर कायम आहे...
चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर सांगली  : जिल्ह्यात बुधवार (ता. ८)...
परभणी, हिंगोली, नांदेड जिल्ह्यातच २९...परभणी : सोयाबीनच्या निकृष्ट बियाण्यांमुळे...
दापोली, मंडणगडमधील ५८५० हेक्टर क्षेत्र...रत्नागिरी  ः निसर्ग चक्रीवादळामुळे दापोली...
पावसाळी स्थितीतील द्राक्षबागेचे नियोजनगेल्या आठवड्यापासून सर्वच भागात पावसाची नोंद झाली...
रताळे लागवडीसाठी सुधारित जातीरताळे हे आहार, जनावरांचा चारा आणि औद्योगिक...
नाशिकमध्ये ढोबळी मिरची ५००० ते ६८७५...नाशिक  : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
टप्प्याटप्प्याने करतो डाळिंब बहराचे...शेतकरी नियोजन पीक ः डाळिंब शेतकरी ः ज्ञानेश्वर...
कृषी हवामान सल्‍ला (मराठवाडा विभाग)भारतीय हवामान विभागाच्‍या अंदाजानुसार,...
शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह असलेले उद्योग का...नाशिक : शासन नवीन उद्योगांची घोषणा करत आहे. मात्र...
देवळा तालुक्यात युरिया टंचाईनाशिक : देवळा तालुक्यात हंगामाच्या सुरुवातीला...
अंदरसूल उपबाजारात उन्हाळ कांदा आवकेत वाढनाशिक : वैजापूर (जि. औरंगाबाद) येथील बाजार...
खानदेशात पेरणी ९० टक्‍क्‍यांवरजळगाव ः खानदेशात पेरणी जवळपास पूर्ण होत आली आहे....
अकोला : गतहंगामातील पीक विम्यापासून...अकोला ः गेल्या हंगामात शेतकऱ्यांनी काढलेल्या...
सोयाबीन बियाणेप्रकरणी शासनाने मदत...अकोला ः जिल्ह्यात प्रत्येक तालुक्यात पेरणीनंतर...
औरंगाबाद जिल्ह्यात मागणीच्या तुलनेत आला...चिते पिंपळगाव, जि. औरंगाबाद : येथील कृषी सेवा...
सांगली जिल्ह्यात पीक कर्जवाटपात...सांगली ः जिल्हा बॅंकेने जूनअखेर ६६.८२ टक्के...
खानदेशात मुसळधार पावसाने जमिनी खरडल्याजळगाव ः खानदेशात मागील २० ते २२ दिवसांमध्ये अनेक...
तुळसवडेतील शेतात ‘रयत क्रांती संघटने’चे...राजापूर, जि. रत्नागिरी : कोरोनामुळे  ...
खतांची साठेमारी करणाऱ्यांवर कारवाई...नागपूर : जिल्ह्यात युरियाचा मुबलक साठा उपलब्ध आहे...