agriculture news in Marathi, farm land from river basin under water in Kolhapur, Maharashtra | Agrowon

कोल्हापुरात नदीकाठची शेती पुन्हा पाण्याखाली

टीम अॅग्रोवन
शनिवार, 7 सप्टेंबर 2019

पुणे ः कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाने जोर धरला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. कोल्हापुरातील पंचगंगा, कोयना या नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून, शेतांमध्ये पाणी शिरले आहे. मराठवाडा आणि विदर्भातही ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंत गडचिरोलीतील देसाईगंज येथे सर्वाधिक २१५.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.  
 

पुणे ः कमी दाबाच्या क्षेत्रामुळे पावसाने जोर धरला आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे, मध्य महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, नाशिक या जिल्ह्यांत अनेक ठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. कोल्हापुरातील पंचगंगा, कोयना या नद्यांचे पाणी पात्राबाहेर पडले असून, शेतांमध्ये पाणी शिरले आहे. मराठवाडा आणि विदर्भातही ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. शुक्रवारी (ता. ६) सकाळी आठ वाजेपर्यंत गडचिरोलीतील देसाईगंज येथे सर्वाधिक २१५.५ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली.  
 

गेल्या आठ दिवसांपासून कोकण, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्यापैकी पाऊस पडत आहे. गुरुवारीही दिवसभर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात अनेक भागात मध्यम ते जोरदार पाऊस पडला. कोकणात रायगडमधील मुरूड येथे सर्वाधिक १८५ मिलिमीटर पाऊस पडला. तर, अलिबाग, भिरा, मानगाव, माथेरान,  म्हसळा, पेण, पोलादपूर, रोहा, श्रीवर्धन, तला सिंधुदुर्गमधील वैभववाडी येथे मुसळधार पाऊस पडला. तसेच घाटमाथ्यावरही पावसाचा जोर कायम आहे. त्यामुळे नद्या, नाले, ओढे दुथडी भरून वाहत असून धरणानांतून विसर्ग सोडण्यात येत आहे.  

मध्य महाराष्ट्रातील पश्चिम पट्ट्यातही पावसाची चांगलीच संततधार सुरू आहे. शुक्रवारीही या भागात पावसाच्या चांगल्याच सरी बरसत होत्या. कोल्हापुरातील गगनबावडा येथे २१० मिलिमीटर पाऊस पडला. तर आजरा, चांदगड, गारगोटी, राधानगरी, शाहूवाडी, नंदुरबार, इगतपुरी, पौड, महाबळेश्वर येथेही जोरदार पाऊस पडला. त्यामुळे धरणातील पाणीपातळीत  वाढ होत असल्याने पुणे जिल्ह्यातील मुळशी, वरसगाव, पानशेत, पानशेत, भामाआसखेड, आंध्रा, माणिकडोह, गुंजवणी, निरा देवधर, भाटघर, वीर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे.  

मराठवाड्यातही पावसाच्या हलक्या सरी पडत आहे. काही ठिकाणी हवामान ढगाळ असून तुरळक ठिकाणी ऊन पडत आहे. औरंगाबादमधील गंगापूर, कन्नड, बीडमधील गेवराई, जालनामधील घनसांगवी, नांदेडमधील मुदखेड, उमरी, परभणीतील जिंतूर, पाथरी येथेही हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे खरीप पिकांना दिलासा मिळत आहे.

विदर्भाच्या पूर्व पट्ट्यातील जिल्ह्यात पावसाच्या अनेक मध्यम ते जोरदार सरी बरसल्या आहेत. गडचिरोलीतील अरमोरी येथे १७० मिलिमीटर पाऊस पडला आहे. गडचिरोलीतील अहिरी, भामरागड, धानोरा, इटापल्ली, गडचिरोली, कुरखेडा, मुलचेरा, गोंदियातील अर्जुनी मोरगाव, अमरावतीतील चांदूरबाजार, मोर्शी, भंडारातील भंडारा, लाखंदूर, लाखणी, चंद्रपुरातील ब्रह्मपुरी, चिमूर, मूल, सिंदेवाही, नागपूरातील कुही, मौदा, नारखेडा वर्ध्यातील खारंगा येथेही जोरदार पाऊस पडला.  

गुरुवारी (ता.५) सकाळी आठ वाजेपर्यंत पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्त्रोत हवामान विभाग)  
कोकण ः  मुंबई ७१, सांताक्रुझ ४५.१, वसई ६१, वाडा ३२, अलिबाग ११७.७, भिरा १२५, कर्जत ३८, खालापूर ५१, महाड ६५, मानगाव १४२, माथेरान १०६,  म्हसळा १३०, मुरूड १८५, पनवेल ६०.४, पेण १११, पोलादपूर १२३, रोहा १२४, श्रीवर्धन १२६, सुधागड पाली १०२, तला १४३, उरण ८६, हर्णे ७६.८, खेड ८०, लांजा ४५, राजापूर ८५, रत्नागिरी ४५.८, संगमेश्वर देवरूख ९५, देवगड ३२, कणकवली ६७, कुडाळ ५८, मालवण ३५, सावंतवाडी ६७, वैभववाडी ९८, अंबरनाथ ६२,  भिवंडी ३५, कल्याण ७८, मुरबाड ३४, शहापूर ३०, ठाणे ६१, उल्हासनगर ७४,
मध्य महाराष्ट्र ः  आजरा ४६, चांदगड ७०, गगनबावडा २१०, गारगोटी ६१, पन्हाळा ४०, राधानगरी ८५, शाहूवाडी ४४, नंदुरबार ३५, इगतपुरी ३९, पौड ५८, महाबळेश्वर ९५,  
मराठवाडा ः  गंगापूर ३०, कन्नड १४, गेवराई १३, घनसांगवी २५, मुदखेड १२, उमरी १७, जिंतूर ६, पाथरी ४,
विदर्भ ः  चांदूरबाजार २८,८, मोर्शी १९, भंडारा ३४, लाखंदूर ५०.२, लाखणी ९५.८, ब्रह्मपुरी ८१.८, चिमूर २१.३, मूल २०.४, नागभीर १८.५, पोभुर्णा १४.१, सावली १४.२, सिंदेवाही ३१.६, अहिरी ३७.३, अरमोरी १७०, भामरागड ८६, चार्मोशी १६.२, देसाईगंज २१५.५, धानोरा ९७.१, इटापल्ली ६४.३, गडचिरोली ६६.३, कुरखेडा ८६.९, मुलचेरा ६३.२, सिंरोचा २३, अर्जुनी मोरगाव ५६.४, कुही १५.२, मौदा १२, नारखेडा ३०.२, रामटेक १०, खारंगा ७६.८, यवतमाळ ः १४.२,

कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाचा अंदाज
राज्यात असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव काही प्रमाणात कमी झाला आहे. यामुळे राज्यातील पावसाचा काही जोर कमी होण्याची शक्यता आहे. आज (ता. ७) कोकणात जोरदार, तर मध्य महाराष्ट्रात हलका ते मध्यम स्वरूपाच्या सरी बसतील. मराठवाडा व विदर्भातही कमी अधिक पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाच्या सूत्रांनी वर्तविला आहे.  

शंभर मिलिमीटरहून अधिक पाऊस पडलेली ठिकाणे ः  
देसाईगंज २१५.५, गगनबावडा २१०, आरमोरी १७०, अलिबाग ११७.७, भिरा १२५, माणगाव १४२, माथेरान १०६, म्हसळा १३०, मुरूड १८५ , पेण १११, पोलादपूर १२३, रोहा १२४, श्रीवर्धन १२६

धरणनिहाय सोडण्यात आलेला विसर्ग (क्युसेकमध्ये)

राधानगरी  ७,११२     भोगावती
कोयना    ४९,८०४   कोयना
खडकवासला  १३,९८१     मुठा
उजनी   ३०,०००     भीमा
मुळशी  १५,४००     मुळा  
वीर  २३,२३५ नीरा
वरसगाव   ४४४० मुठा
वडिवळे    ६८८ इंद्रायणी
भाटघर ४२१०   निरा
माणिकडोह  १०५०   कुकडी

 


इतर अॅग्रो विशेष
कोल्हापुरात तीस हजार ऊस तोडणी कामगार...कोल्हापूर: जिल्ह्यातील सुमारे तीस हजार ऊस तोडणी...
औरंगाबादमध्ये २९ टन मालाची थेट विक्रीकोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर औरंगाबाद शहरात 'शेतकरी...
कोरोनामुळे कृषी पर्यटन व्यवसाय अडचणीत सातारा : कोरोनाच्या संसर्गामुळे दिवसेंदिवस बळी...
संकटावेळी तरी पंतप्रधानांनी गंभीर...मुंबई : देशात कोरोना विषाणूने थैमान घातले असून...
‘कोरोना विरोधात जाणिवेसाठी रविवारी...पुणे : ‘‘कोरोना विरोधात उभारलेल्या लढ्याची...
कोरोनाच्या निदानासाठीच्या ‘मायलॅब'ला...पुणे ः देशातील कोरोनाच्या प्रत्येक रुग्णाच्या...
कांदा विक्रीसाठी ‘पणन’चे प्रयत्नपुणे: कोरोना लॉकडाऊनमध्ये शेतमालाची पुरवठा साखळी...
दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्यांवर कारवाई...वर्धा ः  दूध संकलनास टाळाटाळ करणाऱ्या दूध...
पालघर, डहाणू, तलासरी तालुक्यात भूकंपाचे...मुंबई: पालघर जिल्ह्यात गेल्या दोन वर्षांपासून...
मोसंबी मागणीअभावी बागेतचऔरंगाबाद: परिपक्व झालेल्या मोसंबीच्या मृग...
लॉकडाऊनमुळे ‘निविष्टा’ कंपन्यांची उधारी...पुणे: लॉकडाऊनमुळे राज्यातील खते, बियाणे व कीडनाशक...
तीन दिवसांत एक हजार वीस टन द्राक्ष ...पुणे ः कोरोना विषाणूमुळे राज्यातील द्राक्ष...
विदर्भ, मराठवाड्यात पुर्वमोसमी पावसाचा...पुणे : राज्यात उन्हाचा चटका चांगलाच वाढल्याने...
हरभरा खरेदीच्या नोंदणीसाठी मुदतवाढमुंबई: किमान आधारभूत किंमत योजनेअंतर्गत हमी...
हापूसच्या निर्यातीसाठी युद्धपातळीवर...मुंबई: कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी...
लॉकडाऊन संपल्यानंतर राज्यांनी गर्दी...मुंबई : लॉकडाऊन संपविल्यानंतर १५ एप्रिलला लगेच...
रासायनिक खतांचा काळाबाजार होईल; गाफील...पुणे: “देशात रासायनिक खतांचा मुबलक साठा आहे....
कोरोनाव्हायरसचा प्रसार देशभरात वेगाने;...नवी दिल्ली : कोरोनाव्हायरसचा प्रसार देशभरात...
कर्जापोटी दंडव्याज नको; केंद्राकडून...पुणे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना...
बेदाणा निर्मितीसाठी आवश्यक रसायनांची...नाशिक : कोरोना पार्श्वभूमीवर द्राक्षाच्या मागणी व...