सातारा जिल्ह्यात १३३५ शेततळी पूर्ण 

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

सातारा   ः जिल्ह्याच्या पूर्व भागात दुष्काळाच्या झळा तीव्र होऊ लागल्या आहेत. दुष्काळावर मात करण्यासाठी शासनाने सुरू केलेल्या मागेल त्याला शेततळे योजनेस जिल्ह्यात मागील तीन ते चार महिन्यांपासून प्रतिसाद काहीसा कमी झाला आहे. या योजनेतून आजपर्यंत १३३५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत; तसेच ९१ शेततळ्यांची कामे प्रगतिपथावर आहेत, असे कृषी विभागाच्या सूत्रांनी सांगितले.

राज्य शासनाने फेब्रुवारी २०१६ मध्ये मागेल त्याला शेततळे ही योजना जाहीर केली आहे. या योजनेतून जिल्ह्यात उद्दिष्टापेक्षा जास्त म्हणजे ५३०४ अर्ज प्राप्त झाले आहेत. यामध्ये ३९१५ अर्ज पात्र; तर १२२९ अर्ज अपात्र ठरले असून, १२३ अर्जांच्या छाननीचे काम सुरू आहे. पात्र अर्जापैकी ३२०२ अर्जांना मंजुरी देण्यात आली. २७८४ शेततळ्यांची आखणी करून दिली आहे. सध्या ९१ शेततळ्यांचे काम सुरू असून, १३३५ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली आहेत. 

या योजनेस सुरवातीच्या काळात जिल्ह्यात कमी प्रतिसाद मिळाला होता. त्यानंतर काही अटी शिथिल केल्यानंतर ही योजना सर्वसमावेशक झाल्याने प्रतिसाद वाढत गेला होता. यातून अनेक शेततळी पूर्ण झाली होती. मात्र गेल्या तीन ते चार महिन्यांत या योजनेस कमी प्रतिसाद मिळू लागला आहे.

याचे प्रमुख कारण दुष्काळ असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. अनेक भागांत पाऊस न झाल्याने शेततळी कोरडी पडली आहे. दुष्काळी तालुक्यांत अपेक्षित पाऊस न झाल्यामुळे नवीन शेततळे करण्याकडे कल कमी झाला आहे. पाणीसाठा संरक्षित करण्यासाठी शेततळी महत्त्वपूर्ण असल्याने या योजनेत जास्ती जास्त शेतकरी सहभागी करण्यासाठी कृषी विभागाकडून प्रयत्न करणे आवश्यक आहे.  

तालुकानिहाय शेततळ्यांची पूर्ण झालेली कामे ः सातारा - ७२, कोरेगाव - १९२, खटाव - २२८, माण - ३००, फलटण - २६९, वाई - ७४, खंडाळा - ८१, महाबळेश्वर - ३, जावली - १७, पाटण - १४, कऱ्हाड - ८५. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com