agriculture news in Marathi farm work affected by rain Maharashtra | Agrowon

पावसामुळे शेतीकामात अडथळे 

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 23 ऑक्टोबर 2020

परतीच्या पावसाचा दणका अजूनही सुरूच आहे. बुधवारी (ता.२२) सायंकाळी राज्यातील काही भागांत पावसाच्या जोरदार सरी पडल्या आहेत. 

पुणे ः परतीच्या पावसाचा दणका अजूनही सुरूच आहे. बुधवारी (ता.२२) सायंकाळी राज्यातील काही भागांत पावसाच्या जोरदार सरी पडल्या आहेत. कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाच्या हलक्या ते मध्यम सुरू पडल्याने शेतीकामांमध्ये अजूनही अडथळे सुरूच आहेत. 

येत्या दोन दिवसांत राज्याच्या काही भागांत मॉन्सून माघार घेणार असल्याने पावसाच्या जोरदार सरी बरसत आहेत. काही ठिकाणी वादळी वारे व विजांच्या कडकडाटसह पाऊस पडत आहे. कोकणात दिवसभर ऊन पडत असून सायंकाळी पावसाची हजेरी लागत आहे. ठाण्यातील उल्हासनगर येथे सर्वाधिक ५२ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. तर इतर भागातही हलका पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातही नगर, पुणे, नाशिक, कोल्हापूर या भागात पावसाच्या सरी पडल्या आहेत. त्यामुळे भात पिकांच्या नुकसानीत वाढ होत आहे. 

सातारा, सांगली, सोलापूर, खानदेशातील धुळे, नंदुरबार, जळगाव भागात काही प्रमाणात पावसाने उघडीप दिली असली तरी काही ठिकाणी शिडकावा होत आहे. अकोले येथे पावसाच्या जोरदार सरी पडल्या असून चंदगड, तळोदा, पौड भागात पावसाच्या बऱ्यापैकी हजेरी लावली होती. 

मराठवाडा व विदर्भातही तुरळक ठिकाणी पावसाने हजेरी लावली. औरंगाबाद परिसरात ५६.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. जालना जिल्ह्यातही हलक्या सरी पडल्या. मराठवाड्यात पावसाने बऱ्यापैकी उघडीप दिल्याने शेतकऱ्यांची शेतीकामांसाठी लगबग सुरू झाली आहे. 

शेतकरी पीक काढणीच्या कामाला लागला. मात्र, काही ठिकाणी अजूनही शेतात पाणीच पाणी असल्याने शेतीकामे खोळंबली आहेत. 

गुरूवारी (ता.२२) सकाळी आठ वाजेपर्यंत झालेला पाऊसः मिलिमीटर (स्त्रोतः हवामान विभाग) 
कोकण : जव्हार २७, पनवेल २५.८, कणकवली १९, सावंतवाडी २४, वैभववाडी १६, वेंगुर्ला ३६.६, अंबरनाथ ३४, भिवंडी ३०, उल्हासनगर ५२. 
मध्य महाराष्ट्र : अकोले ३१, शिरपूर २१, चंदगड २२, तळोदा २७, त्र्यंबकेश्वर १८, येवला १६, पौड २५.३, वडगाव मावळ १८.४. 
मराठवाडा : औरंगाबाद ५६.८, पैठण १६, सिल्लोड २७, बदनापूर १६. 
विदर्भ ः अकोला १०.६, बुलडाणा १०.२. 
 


इतर अॅग्रो विशेष
‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी...औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन...
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढपुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या...
कमी कालावधीत पक्व होणारे मधुर कलिंगड...नाशिक : बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन...
किमान तापमानात घट होणार पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार...
डाळिंब दरात मोठी सुधारणासांगली ः राज्यातील डाळिंब पीक यंदा सततचा पाऊस आणि...
पामतेल आयात शुल्कात कपात; केंद्र...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने कच्च्या...
टंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...
'निवार’ चक्रीवादळाचा प्रभाव; राज्यात...पुणे ः बंगालच्या उपसागरात पूर्व किनाऱ्याकडे...
केळीची मागणी कायम, दर टिकून जळगाव : दाक्षिणात्य व गुजरातमधील केळीची उत्तर...
तमिळनाडू, पुद्दुचेरीत धुमाकूळचेन्नई  ः निवार चक्रीवादळामुळे वेगवान...
गहू, हरभरा पेरणीला वेगपुणे : यंदा चांगल्या पाणीसाठ्यामुळे गहू व...
पहिल्याच टप्प्यात थकवली ३५० कोटींची ‘...पुणे : राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर...
आर्थिक चणचण,‘लम्पी’चे पशुधन बाजारावर...सांगली ः लॉकडाउनमुळे पशुधानाचे आठवडे बाजार तब्बल...
ऊसतोडणी मजुरांची संख्या यंदा दोन...नगर : राज्यातील साखर कारखान्यांवर ऊसतोडणी...
पणन महासंघाची खरेदी उद्यापासूननागपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
मराठवाड्यातील बहुतांश धरणे तुडुंबऔरंगाबाद : यंदा जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील...
संकटकाळात श्री ब्रॅण्डद्वारे दर्जेदार...नाशिक जिल्ह्यातील वनसगाव येथील शैलेश व संदीप या...
सणांच्या हंगामात भाव खाणारी गाडे यांची...कांजळे (ता. भोर, जि. पुणे) येथील विलास गाडे यांनी...
महाटीत उपसरपंचपदासाठी साडेदहा लाखांची...नांदेड ः ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी उपसरपंचपदाचा...
राज्यात शनिवारपासून ‘जनप्रबोधन यात्रा’नगर/पुणे ः शेतकरी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या...