शेतीकामांना आजपासून मुभा; ग्रीन-ऑरेंज झोनमधील उद्योग सुरू होणार

राज्यात कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात उद्या (आज)पासून व्यवहार सुरू करत आहोत. मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील. शेतीकामांसह ग्रीन-ऑरेंज झोन मधील उद्योग सुरू करण्यास मुभा देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
शेतीकामांना आजपासून मुभा; ग्रीन-ऑरेंज झोनमधील उद्योग सुरू होणार
शेतीकामांना आजपासून मुभा; ग्रीन-ऑरेंज झोनमधील उद्योग सुरू होणार

मुंबई : राज्यात कोरोना प्रादुर्भाव नसलेल्या क्षेत्रांत काही प्रमाणात उद्या (आज)पासून व्यवहार सुरू करत आहोत. मात्र जिल्ह्यांच्या सीमा बंदच राहतील. शेतीकामांसह ग्रीन-ऑरेंज झोन मधील उद्योग सुरू करण्यास मुभा देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

दरम्यान, वृत्तपत्रांबाबतची आपली भूमिका स्पष्ट करताना मुख्यमंत्री म्हणाले की, वृत्तपत्र स्टॉलवर उपलब्ध करून देता येतील परंतु घरोघरी जाऊन वितरित करण्यास परवानगी देता येणार नाही. मुंबई-पुणे वगळून राज्यात याबाबत इतरत्र काय करता येईल यासंदर्भातील निर्णय नंतर घेतला जाईल.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी रविवारी (ता.१९) समाजमाध्यमांद्वारे राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सामाजिक दायित्व निधीची रक्कम देण्यासाठी स्वतंत्र सीएसआर खाते उघडले असल्याचीही माहिती दिली. कोरोनाचे रुग्ण आणि प्रादुर्भाव लक्षात घेऊन शासनाने सोमवार (आज) पासून काही अटींवर ऑरेंज आणि ग्रीन झोन मधील जिल्ह्यात उद्योग सुरू करण्यास मान्यता दिली असल्याचे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले. आत्तापर्यंत शेतीविषयक कामे, शेतमालाची वाहतूक, जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक सुरूचं होती. परंतु अर्थचक्र सुरू करताना  ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील जे उद्योजक-कारखानदार त्यांच्या कामगारांची काळजी घेतील, त्यांची तिथचे राहण्याची व्यवस्था करतील त्यांना उद्यापासून काम सुरू करण्यासाठी मुभा देण्यात येईल.  त्यासाठी त्यांना आवश्यक असलेला कच्चामाल आणि अन्नधान्य पुरवण्यात येईल. आपल्याला मालवाहतूक सुरू करायची आहे, व्हायरसची वाहतूक करायची नाही. कोणताही धोका स्वीकारायचा नाही असे देखील मुख्यमंत्री म्हणाले. यासंदर्भात केंद्र आणि राज्य सरकारने जे आदेश निर्गमित केले आहेत त्याचे तंतोतंत पालन केले जाईल हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

संसर्गासंदर्भातील वैद्यकीय सेवेबाबत बोलताना मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, की बऱ्याच वेळा रुग्ण शेवटच्या टप्प्यात रुग्णालयात येत आहेत. त्यांचे चाचणी अहवाल येण्याआधी दुर्दैवाने काही जणांचे मृत्यू झाले आहेत, अशांसाठी आपण इच्छा असून काही करू शकत नाही अशी खंत व्यक्त करून मुख्यमंत्री ठाकरे यांनी सर्दी , ताप आणि खोकला यासारखी लक्षणे दिसताच घरी उपचार करू नका, रुग्णालयात जाऊन उपचार करून घ्या. वेळेत योग्य उपचार करून घेतले तर रुग्ण मोठ्या संख्येने बरे होऊन घरी जात असल्याचेही स्पष्ट केले.

जिल्ह्यांच्या सीमा बंदच जिल्ह्यांच्या सीमा आपण उघडलेल्या नाहीत हे अधोरेखित करून मुख्यमंत्री म्हणाले की एका जिल्ह्यातील माणसे दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यास अजूनही परवानगी नाही. राज्यातील नागरिकांसाठी हा लॉकडाऊन संपलेला नाही. ३ मे पर्यंत त्यांनी आहे तसेच घरी राहायचे आणि सामाजिक अंतराची शिस्त पाळायची आहे.

खासगी सेवा नॉन कोविड रुग्णांसाठीच राज्यातील खाजगी डॉक्टर्सशी आपण तसेच टास्कफोर्सचे डॉक्टरही बोलले असून त्यांची कोरोनाविरुद्ध लढायची तसेच दवाखाने उघडण्याची तयारी असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. ते पुढे म्हणाले की,  ही रुग्णालये फक्त नॉन कोविड रुग्णांसाठी ज्यांना हृदयरोग, किडणीचे आजार आहेत, मधुमेहासारखे गंभीर आजार आहेत त्यांच्या उपचारासाठी आहेत. सर्दी, ताप आणि खोकल्याच्या रुग्णांनी या दवाखान्यात जाऊ नये, सरकारी दवाखान्यात येऊन तपासणी करावी.

अडकलेल्यांना दिला दिलासा लॉकडाऊनमुळे अडकलेल्या इतर राज्यातील तसेच राज्यातील कामगारांनी, मजुरांनी आहे तिथेच राहावे, राज्य सरकार त्यांची पूर्ण काळजी घेईल असा विश्वास देताना मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारशी यासंदर्भात बोलणी सुरू असल्याचे सांगितले. यावर लवकरच मार्ग निघेल त्यानंतर तुम्हाला तुमच्या घरी सुखरूप पाठवू असा शब्द ही त्यांनी यावेळी दिला. सवलतीच्या दराने धान्य केशरी रेशनकार्डधारकांना सवलतीच्या दराने राज्य शासन अन्नधान्य वितरित करत आहे. केंद्र ही आधारभूत किमतीने धान्य देण्यास तयार आहे. केंद्र सरकार मोफत केवळ तांदूळ दे आहे आणि त्याचा लाभ फक्त अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांना मिळत आहे हे ही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. तांदुळासोबत गहू आणि डाळीची आपण केंद्र सरकारकडे मागणी केली असल्याचे व ते मिळताच त्याचेही वाटप सुरू करणार असल्याचे ते म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com