agriculture news in Marathi farm work stopped due to oil Maharashtra | Agrowon

डिझेल मिळत नसल्याने शेतीकामांना ‘ब्रेक’

सुर्यकांत नेटके
शनिवार, 11 एप्रिल 2020

शेतीची कामे करणाऱ्या वाहनांसाठी इंधन देण्याचे आदेश असतानाही पंप चालक इंधन देण्यास टाळाटाळ करीत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत भर पडताना दिसत आहे. प्रशासनाने त्याबाबत गांभीर्याने घेऊन पंप चालकांना शेतकऱ्यांच्या वाहनांना इंधन देण्याबाबत आदेश द्यावेत.
- संभाजी दहातोंडे, प्रदेशाध्यक्ष, शेतकरी मराठा महासंघ.

नगर ः कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाउन करण्यात आले आहे. या कालावधीत पेट्रोल पंपांना शेतीची कामांसाठी शेतकऱ्यांच्या वाहनांना इंधन देण्याचे आदेश आहेत. मात्र राज्यातील अनेक भागांसह नगर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या वाहनांना इंधन दिले जात नसल्याचे उघड झाले आहे. त्यामुळे शेतीकामांना ‘’ब्रेक’’ लागला आहे. सध्याची शेतीची कामे होत नसून त्याचा दोन महिन्यावर आलेल्या खरिपावर परिणाम होण्याची भिती व्यक्त केली जात आहे. 

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर देश, राज्यात लॉकडाउन केले आहे. मात्र खरीप हंगाम तोंडावर आला असल्याने हा हंगाम अडचणीत येऊ नये यासाठी शेतकऱ्यांच्या वाहनांना गरजेच्या वेळी इंधन देण्याचे सरकारचे आदेश आहेत. मात्र या आदेशाला केराची टोपली दाखवली असल्याचे पाहायला मिळत आहे. आता शेतीतील बहुतांश कामे ट्रॅक्टर व अन्य यंत्रांच्या माध्यमातूनच केली जातात.

सध्या खरिपाच्या पार्श्वभूमीवर नांगरणी, पाळी, मोघडणी तसेच फळबागांत छाटणी, फवारणीसह उसाची खांदणी थांबलेली आहे. अनेक पिकांची सोंगणी सुरु असून काढणी केलेला शेतमालही घरापर्यंत आणायला अडचणी निर्माण होत आहेत. ‘बंद’मध्ये शेतीची कामे बंद राहू नयेत, यासाठी शेतकऱ्यांच्या वाहनांना इंधन देण्याबाबत शासनाने आदेश दिले आहेत. कोरोनाचा अधिक संसर्ग असलेल्या जिल्ह्यांमध्ये सकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत तर कमी प्रमाणात संसर्ग असलेल्या भागांत सकाळी अकरा वाजेपर्यंत पेट्रोल पंप सुरु ठेवले जात आहेत.

अन्य काळात इंधन मिळणे अपेक्षित आहे, मात्र ते तर दिले जात नाहीच, पण पंप सुरु असलेल्या काळातही अडवणूक होत आहे. सरकारी आदेश असताना इंधन का मिळत नाही, अशी विचारणा केलीच तर इंधन देतो ट्रॅक्टर पंपावर आणा असे काही पंपांवर सांगितले जात आहे.

प्रतिक्रिया
माझ्याकडे ट्रॅक्टर असून मी दरवर्षी नांगरणी, मोघडणी तसेच अन्य कामे करतो. मात्र सध्या इंधन मिळण्याला अडचणी येत आहेत. त्यामुळे शेतीची मोठी कामे ठप्प झाली आहेत. आमचा भाग दुष्काळग्रस्त आहे. त्यामुळे सध्याच्या काळात शेतीची सर्व कामे करून खरिपासाठी तयारी केली जाते.
- सत्यवान बर्डे, शेतकरी, तिसगाव, जि. नगर.


इतर अॅग्रो विशेष
मराठवाड्यात जोरदार पावसाचा पिकांना फटकाऔरंगाबाद, परभणी : औरंगाबाद, जालना, बीड, लातूर,...
हजारो टन कांदा निर्यातीच्या प्रतीक्षेतमुंबई/नाशिक : देशभरात कांदा निर्यातबंदी...
बीटी वांग्याच्या दुसऱ्या टप्प्यातील...पुणे : देशभरात चर्चेत असलेल्या बीटी वांग्याच्या...
साखर निर्यातीचे करार ५७ लाख टनांवरकोल्हापूर : देशातल्या साखर निर्यातीचे करार आता ५७...
तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यतापुणे ः बंगालचा उपसागर व उत्तर तामिळनाडूच्या...
दूध सल्लागार समिती कागदावरचपुणे : राज्यस्तरीय दूध सल्लागार समितीची एकही बैठक...
राज्यात मोसंबी १००० ते ४००० रुपये...औरंगाबादमध्ये १००० ते २५०० रुपये प्रतिक्विंटल...
कांदा, लसूण शेतीत बहिरवाडीने मिळवली...बहिरवाडी (ता. जि. नगर) हे छोटे गाव कांदा व लसूण...
स्पर्धेत टिकण्यासाठी ‘ई-नाम’केंद्र सरकारने कृषी, पणन व्यवस्थेत सुधारणा घडवून...
बाजार सुधारणांत नको राजकीय धुळवडकोरोनाच्या पार्श्वभूमीवर होत असलेल्या संसद...
सुपारी फळगळीचे संकटसिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ...
कोकण, मराठवाड्यात पावसाची शक्यतापुणे ः गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही...
कांदा निर्यातबंदीविरोधात मराठवाड्यातही...औरंगाबाद/परभणी: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी...
निर्यातबंदीमुळे कांदा दरात मोठी घसरणनाशिक: केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी केल्याचा...
कांदा निर्यातबंदी विरोधात नाशिक...नाशिक: प्रतिकूल हवामान, वाढलेला उत्पादन खर्च व...
‘स्मार्ट’च्या २८ पथदर्शक प्रकल्पांना...पुणे: कृषी खात्याच्या ‘स्मार्ट’ प्रकल्पातून...
सांगली जिल्ह्यात द्राक्ष फळ छाटणी...सांगली ः जिल्ह्यात सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात...
मराठवाड्यात पावसाचा जोर कायमपुणे ः गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यातील...
राज्यात तीन वर्षांत ‘ई-नाम’द्वारे ...पुणे: केंद्र सरकारने सुरु केलेल्या राष्ट्रीय...
दर्जेदार रोपनिर्मिती पेपरपॉट, पीट मॉसचा...रोपनिर्मिती चांगल्या प्रकारे होण्यासाठी...