औरंगाबादला आज ‘फार्माथॉन’

औरंगाबादला आज ‘फार्माथॉन’
औरंगाबादला आज ‘फार्माथॉन’

औरंगाबाद: येथे जागतिक कापूस दिनानिमित्त सोमवारी (ता. ७) ‘फार्माथॉन’या जगातील पहिल्या ‘शेतकरी मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. या मॅराथॉनमध्ये विविध भागांतील ४०० पेक्षा जास्त पुरुष कापूस उत्पादक शेतकरी व ७० ते १०० महिला कापूस उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत. ‘कॉटन गुरू’चे मीष डागा यांनी शनिवारी (ता. ५) पत्रकार परिषदेत दिली. श्री. डागा म्हणाले, की देशातील कापूस क्षेत्राच्या तुलनेत महाराष्ट्रात ३३ टक्‍के, तर राज्यातील कापूस क्षेत्राच्या तुलनेत मराठवाठवाड्यात ४२ टक्‍के कापसाचे क्षेत्र आहे. चीनच्या तुलनेत आपले क्षेत्र असले तरी उत्पादकता मात्र सर्वांत कमी आहे. गत दहा वर्षांचा आढावा घेता रूई गाठी व कापूस उत्पादनात आजघडीला आपण नीचांकी पातळीवर आहोत. आपली आयात वाढली असून, निर्यात घटली आहे. जवळपास सहा कोटी लोक कापूस उद्योगाशी जोडलेले आहेत.  सात हजार वर्षांचा इतिहास असलेल्या कापूस शेतीत बाराव्या शतकापर्यंत आपली जगात मक्‍तेदारी होती. मग अलीकडे आपली ही अवस्था का झाली. या अवस्थेतून कापूस शेतीला बाहेर काढण्यासाठी कापूस उत्पादकांपर्यंत तंत्रज्ञान, हवामान अंदाज, उत्तम बियाणे वाणांची माहिती सोबतच कापसाच्या स्मार्ट शेतीची पद्धत पोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. या पत्रकार परिषदेला मनजित कॉटनचे रसदीप चावला, रिद्धी-सिद्धी गृपचे गोपाल अग्रवाल उपस्थित होते. याकरिता शेतकरी मॅरेथॉन ११६ वर्षे जुन्या ‘कॉटनगुरू’चे संपूर्ण देशभरात जवळपास ५० हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे थेट नेटवर्क आहे. जागतिक कापूस दिन साजरा करण्यासाठी डब्ल्यूटीओच्या पुढाकाराने कॉटनगुरूने जगातील पहिल्या शेतकरी मॅराथॉनचे आयोजन केले आहे. दैनंदिन जीवनात कापसाचे महत्त्व, उपयुक्‍तता यावर प्रकाश टाकण्याचे काम या फार्माथॉनच्या निमित्ताने केले जाईल. या वेळी सहभागी शेतकऱ्यांना कापूस बियाणे, कापूस उत्पादने आणि उपउत्पादनाचे वितरण केले जाईल. उत्पादन, परिवर्तन आणि व्यापारातील सर्व भागधारकांना एक्‍स्पोजर आणि मान्यता देईल, अशी माहिती श्री. डागा यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com