agriculture news in Marathi, Farmathon in Aurangabad today, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

औरंगाबादला आज ‘फार्माथॉन’

टीम अॅग्रोवन
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

औरंगाबाद: येथे जागतिक कापूस दिनानिमित्त सोमवारी (ता. ७) ‘फार्माथॉन’या जगातील पहिल्या ‘शेतकरी मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. या मॅराथॉनमध्ये विविध भागांतील ४०० पेक्षा जास्त पुरुष कापूस उत्पादक शेतकरी व ७० ते १०० महिला कापूस उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत.

औरंगाबाद: येथे जागतिक कापूस दिनानिमित्त सोमवारी (ता. ७) ‘फार्माथॉन’या जगातील पहिल्या ‘शेतकरी मॅरेथॉन’चे आयोजन करण्यात आले आहे. या मॅराथॉनमध्ये विविध भागांतील ४०० पेक्षा जास्त पुरुष कापूस उत्पादक शेतकरी व ७० ते १०० महिला कापूस उत्पादक शेतकरी सहभागी होणार आहेत.

‘कॉटन गुरू’चे मीष डागा यांनी शनिवारी (ता. ५) पत्रकार परिषदेत दिली. श्री. डागा म्हणाले, की देशातील कापूस क्षेत्राच्या तुलनेत महाराष्ट्रात ३३ टक्‍के, तर राज्यातील कापूस क्षेत्राच्या तुलनेत मराठवाठवाड्यात ४२ टक्‍के कापसाचे क्षेत्र आहे. चीनच्या तुलनेत आपले क्षेत्र असले तरी उत्पादकता मात्र सर्वांत कमी आहे. गत दहा वर्षांचा आढावा घेता रूई गाठी व कापूस उत्पादनात आजघडीला आपण नीचांकी पातळीवर आहोत. आपली आयात वाढली असून, निर्यात घटली आहे. जवळपास सहा कोटी लोक कापूस उद्योगाशी जोडलेले आहेत. 

सात हजार वर्षांचा इतिहास असलेल्या कापूस शेतीत बाराव्या शतकापर्यंत आपली जगात मक्‍तेदारी होती. मग अलीकडे आपली ही अवस्था का झाली. या अवस्थेतून कापूस शेतीला बाहेर काढण्यासाठी कापूस उत्पादकांपर्यंत तंत्रज्ञान, हवामान अंदाज, उत्तम बियाणे वाणांची माहिती सोबतच कापसाच्या स्मार्ट शेतीची पद्धत पोचविण्याचा प्रयत्न या माध्यमातून केला जाणार आहे. या पत्रकार परिषदेला मनजित कॉटनचे रसदीप चावला, रिद्धी-सिद्धी गृपचे गोपाल अग्रवाल उपस्थित होते.

याकरिता शेतकरी मॅरेथॉन
११६ वर्षे जुन्या ‘कॉटनगुरू’चे संपूर्ण देशभरात जवळपास ५० हजारपेक्षा जास्त शेतकऱ्यांचे थेट नेटवर्क आहे. जागतिक कापूस दिन साजरा करण्यासाठी डब्ल्यूटीओच्या पुढाकाराने कॉटनगुरूने जगातील पहिल्या शेतकरी मॅराथॉनचे आयोजन केले आहे. दैनंदिन जीवनात कापसाचे महत्त्व, उपयुक्‍तता यावर प्रकाश टाकण्याचे काम या फार्माथॉनच्या निमित्ताने केले जाईल. या वेळी सहभागी शेतकऱ्यांना कापूस बियाणे, कापूस उत्पादने आणि उपउत्पादनाचे वितरण केले जाईल. उत्पादन, परिवर्तन आणि व्यापारातील सर्व भागधारकांना एक्‍स्पोजर आणि मान्यता देईल, अशी माहिती श्री. डागा यांनी दिली.


इतर अॅग्रो विशेष
अर्थकारण उंचावण्यासाठी मोसंबीसह पेरू,...अस्मानी, सुलतानी संकटे आली तरी त्यातून मार्ग काढत...
सिंचनाची गंगा अवतरली बांधावरयवतमाळ जिल्ह्यात अवकाळी पावसानंतर नोव्हेंबरमध्ये...
शेतकऱ्यांच्या व्यापक हिताचे कार्य कधी?शेती उत्पादनाची वाढ व्हावयाची असेल, वाढत्या...
निर्यातवृद्धीचा रोडमॅपभारतात प्रदेशनिहाय माती, हवामान बदलते. अनेक...
सांगलीत कृषी विभागात तब्बल २७० पदे रिक्तसांगली ः शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती...
रत्नागिरी : शेतीजमिनीतील नत्र, स्फुरद,...रत्नागिरी ः शेतीसाठी वापरल्या जाणाऱ्या रासायनिक...
सिद्धेश्‍वर यात्रेतील अक्षता सोहळ्याने...सोलापूर ः सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्‍वर...
गोकूळ दूध संघाकडून खरेदी दरात वाढकोल्हापूर : कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍...
थंडीत चढ-उतार पुणे ः राज्यातील अनेक भागात थंडी किंचित कमी झाली...
कृषी अभ्यासक्रमात रोबोटिक्सपुणे ः आर्टिफिशियल इंटेलिजिंट अर्थात कृत्रिम...
थेट सरपंच निवड रद्द करणार: हसन मुश्रीफ मुंबई : फडणवीस सरकारने सुरू केलेली थेट सरपंच निवड...
‘उजनी'च्या पाण्याने जमिनीच्या...सोलापूर  : जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी...
यांत्रिक पद्धतीने युवकाने केली खारे...मासा (ता. जि. अकोला) येथील प्रफुल्ल फाले या...
दुबई वारी फलदायी ठरावी संत्रा हे जगभरातून मागणी असलेले फळपीक आहे....
उद्योगाप्रमाणे हव्यात शेतीला सवलतीशेती हा एक उद्योग आहे, याची जाणीव करून देण्याची...
नागपुरी संत्र्याची होणार दुबईला निर्यातअमरावती : शासन, प्रशासन आणि संस्थात्मकस्तरावर...
पीकविम्याच्या फसवणूक प्रकरणी...आर्णी, जि. यवतमाळ ः सायबर कॅफे संचालकाने...
देशभरातील शेतकरी संघटना एकवटणार ः राजू...मुंबई : देशभरातील २६५ शेतकरी संघटनांच्या अखिल...
‘गुगलेश्वरा’मुळे कृषी विद्यार्थी...पुणे: “आम्ही कृषी शिक्षण घेताना शिक्षक आणि...
ग्रामपंचायत स्तरावर हवे ‘मॉईश्‍चर’ मीटरनागपूर : अधिक ओलाव्याच्या कापसाला प्रती एक टक्‍क्...