agriculture news in Marathi farmer agitation in seven states Maharashtra | Agrowon

शेतकरी आंदोलनाचे सात राज्यांत पडसाद

टीम अॅग्रोवन
शनिवार, 26 सप्टेंबर 2020

पंजाब, हरियानासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ३१ पेक्षाही अधिक शेतकरी संघटनांनी भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले.

चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी विधेयकांना विरोध करत शुक्रवारी (ता.२५) पंजाब, हरियानासह उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, बिहार, महाराष्ट्र आणि कर्नाटकातील ३१ पेक्षाही अधिक शेतकरी संघटनांनी भारतीय किसान संघर्ष समन्वय समिती व भारतीय किसान युनियनच्या नेतृत्वाखाली आंदोलन केले. शेतकऱ्यांनी विविध ठिकाणांवर रास्ता, रेल रोको आंदोलन केले. पंजाबमध्ये शेतकऱ्यांनी थेट रेल्वे रूळावर ठिय्या दिला. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. 

भारतीय किसान युनियन क्रांतिकारी, किर्ती किसान युनियन, भारतीय किसान युनियन (एकता उगराहन), किसान मजदूर संघर्ष समिती आणि बीकेयू (लाखोवाल) या संघटनांनी आंदोलनास पाठिंबा दिला होता. पंजाबमध्ये काँग्रेस, आप आणि शिरोमणी अकाली दल अशा बड्या विरोधी पक्षांनी पाठिंबा दिला असून अकाली दलाच्या कार्यकर्त्यांनी पंजाबमध्ये अनेक ठिकाणांवर रास्ता रोको आंदोलन केले. अमृसतरमध्ये किसान मजदूर संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली महिला शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. 

महाराष्ट्रात स्वाभिमानी शेतकरी संघटना, आम आदमी पक्ष, किसान सभा, कम्युनिस्ट पक्षासह विविध संघटनांनी सहभागी होत आंदोलने केली. राज्यातील जवळपास सर्वच भागांमध्ये शुक्रवारी आंदोलन झाले. 

पंजाब, हरियानात तीव्र आंदोलन
कृषी विधेयकांविरोधात पंबाज आणि हरियानात आंदोलनाची धग जास्त होती. शुक्रवारी सकाळपासूनच शेतकऱ्यांसह काँग्रेस, आप आणि शिरोमणी अकाली दलाने रस्त्यावर उतरत तीव्र आंदोलन केले. या वेळी शेतकऱ्यांनी ठिकठिकाणी रास्ता रोको, रेले रोको, ठिय्या आंदोलने केले. काही ठिकाणी शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला.


इतर अॅग्रो विशेष
पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी...
अवजारे अनुदानाचे निकष वाढवलेपुणे : राज्यात कृषी अवजारे अनुदानासाठी...
तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता पुणे ः कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी हलका...
बदल्या, मारहाण, लाचखोरीने गाजतेय राहुरी...पुणे: महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या आवारात...
मॉन्सूनच्या माघारीस पोषक वातावरण पुणे : मॉन्सून दोन दिवसांत उत्तर महाराष्ट्र व...
काही ठिकाणी जोरदार सरीपुणे ः राज्यातील काही भागांत पावसाचा जोर कमी झाला...
व्यापाऱ्यांवरील कांदा साठा...पुणे/नाशिक: पुरवठा कमी असल्याने देशभरात कांद्याची...
पावसानं पांढऱ्या सोन्याची झाली माती !औरंगाबाद: यंदा पाऊस चांगला सांगितल्याने शेतीच्या...
चौथ्या बैठकीतही ऊसतोडणी दरवाढीवर तोडगा...नगर ः ऊसतोडणी मजुरांच्या तोडणी दरात वाढ करावी...
बिस्कीट निर्मितीतून महिलांनी घेतली...सांगली जिल्ह्यातील नवेखेड (ता.वाळवा) येथील...
शेतीला मिळाली प्रक्रिया उद्योगाची जोडखोपी (ता.भोर,जि.पुणे) येथील अंजना नारायण जगताप...
राज्यात पाऊस कमी होणारसोमवारपासून ढगाळ हवामानासह पावसाची उघडीप राहणार...
कृषी सुपर मार्केट ः संकल्पना आणि संधीजागतिकीकरणाच्या पार्श्‍वभूमीवर शेती हा एक आर्थिक...
बदल हवेत दिलासादायकहवामान आधारीत फळपीक विमा योजनेत केळी पिकासाठी...
नैसर्गिक आपत्तीत पीकच नाई, तर बापही...यवतमाळः नैसर्गिक आपत्तीत आमी पीकच नाई, त आमचा...
राज्यात गाईच्या दूध खरेदी दरात कपात नगर ः लॉकडाऊन उघडल्यानंतर दुधाची मागणी वाढल्यावर...
कोरडवाहू, बागायतीसाठी हेक्टरी १० हजार...मुंबई: अतिवृष्टीमुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे...
थकबाकीदार ७१ कारखान्यांचे गाळप परवाने ‘...पुणे: राज्यात चालू हंगामात ऊस गाळपासाठी अर्ज...
शेडनेट, फळबागेतून मिळालेल्या ओळखीसह...धुळे जिल्ह्यातील फागणे (ता. धुळे) येथील उमेश व...
कष्ट, नियोजनपूर्वक उभारली आंबा, नारळ,...शासकीय योजनांचा पुरेपूर वापर करताना वरवडे (ता. जि...