दुष्काळात शेतीला साथ पोल्ट्री, शेळीपालनाची

औरंगाबाद जिल्ह्यातील भांडेगाव येथील चव्हाण कुटुंब सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसते आहे. आपल्या २८ एकरांतील शेतीला त्यांनी देशी पक्ष्यांची पोल्ट्री व शेळीपालन यांची जोड देत शेती अर्थकारणात मोठा आशावाद तयार केला आहे. चार भावांनी एकमेकांपासून वेगळे न होता एकजुटीने राहात दुष्काळाला परतावून लावण्याची हिंमत दर्शवली आहे.
Mr. chavan with his family members
Mr. chavan with his family members

औरंगाबाद जिल्ह्यातील भांडेगाव येथील चव्हाण कुटुंब सातत्याने दुष्काळाच्या झळा सोसते आहे. आपल्या २८ एकरांतील शेतीला त्यांनी देशी पक्ष्यांची पोल्ट्री व शेळीपालन यांची जोड देत शेती अर्थकारणात मोठा आशावाद तयार केला आहे. चार भावांनी एकमेकांपासून वेगळे न होता एकजुटीने राहात दुष्काळाला परतावून लावण्याची हिंमत दर्शवली आहे. औरंगाबाद जिल्ह्यातील भांडेगाव येथील एकनाथ धोंडिबा चव्हाण यांची २१ एकर वडिलोपार्जित शेती होती. दादाराव, पोपट, मिठ्ठू व नबाराव ही त्यांची चार मुले वडिलांचा शेतीचा वारसा पुढे चालवत आहेत. शेतीत कष्ट उपसून मिळालेल्या उत्पन्नावर जवळपास सात एकर शेती त्यांनी विकत घेतली. आज २८ एकर शेतीची जबाबदारी चारही भाऊ मिळून सांभाळत आहेत. दुष्काळामुळे शेती अडचणीत

  • खरिपात सुमारे ३ ते ४ एकर कपाशी, ५ ते ७ एकर आले, तीन एकरांत ऊस, बाकी तूर, मका, भुईमूग, भाजीपाला, तसेच अन्य रब्बी पिकांबरोबरच तीन एकरांत बाजरी, एक एकर बीजवाईचा कांदा, २० गुंठे लसूण अशी पिके असतात.
  • साधारण १९८६ मध्ये चव्हाण यांनी केशर आंब्याच्या २०० झाडांची लागवड केली होती. पैकी २०१२ व २०१८ पर्यंत जवळपास शंभरावर झाडं दुष्काळात होरपळून गेली. सातत्याने येत राहणाऱ्या दुष्काळात शेतीतील उत्पन्नावर मर्यादा येत गेल्या. तरीही आज सेंद्रिय पद्धतीने घेतलेल्या आंब्यासाठी चव्हाण यांनी ग्राहक जोडून ठेवले आहेत. ७० रुपये प्रति किलो दराने त्यांचा आंबा विकला जातो.
  • दुष्काळावर पर्याय पोल्ट्रीचा

  • चव्हाण यांनी दुष्काळावर पर्याय म्हणून पूरक व्यवसायांचा आधार घेतला आहे. प्रयोगशील शेतकरी म्हणून ओळख असलेल्या मिठ्ठू यांनी आपल्या एकत्रित कुटुंबातील मुलांपैकी दत्तू व विनोद यांना कोणता व्यवसाय करण्याची इच्छा आहे अशी विचारणा केली. त्यांनी पोल्ट्री व शेळीपालन करण्याची तयारी दाखविली. मग २०१५-१६ मध्ये दोघांनी औरंगाबाद येथील पडेगाव येथील शेळी-मेंढीपालन प्रक्षेत्रावर आयोजित संबंधित प्रशिक्षण घेतले. त्यानंतर व्यवसायास सुरुवात केली.
  • देशी पक्ष्यांचे पालन

  • सध्या सुमारे ८०० पक्ष्यांचे संपोगन होते आहे. त्यात कडकनाथचे ४०० तर कावेरी जातीचे ४०० पक्षी आहेत. अर्धबंदिस्त प्रकारची ही पोल्ट्री आहे. दोन वर्षे अन्य ठिकाणाहून पिले आणून त्यांचे संगोपन करण्यात येत होते.
  • सन २०१७ मध्ये आपल्याला लागणाऱ्या पिलांची गरज आपणच का भागवू नये असा विचार करून ८० हजार रुपयांचे ‘हॅचिंग मशिन’ खरेदी केले. त्याची अंडी उबविण्याची क्षमता २१ दिवसांना ५०० ते ६०० पर्यंत आहे. त्यामुळे पिले विक्री करण्याचाही नवा स्रोत तयार झाला. सध्या वर्षाला दीड लाख रुपयांपर्यंत एकूण उत्पन्न मिळते.
  • पोल्ट्रीची वैशिष्ट्ये

  • जागेवरच होते पक्ष्यांची विक्री
  • कडकनाथच्या पक्ष्याला मिळतो ७०० रुपये तर कावेरीच्या पक्ष्याला मिळतो ५०० रुपये दर
  • पिलाचा दर- कावेरी- २५ रुपये. कडकनाथ- १०० रुपये.
  • दिवसाला होणारी अंडी विक्री-
  • कडकनाथ- १० ते १५, दर- प्रति नग ३० ते ४० रुपये
  • कावेरी- २० ते २५. दर- १० रुपये
  • खाद्यावर दरदिवशी २०० रुपये खर्च
  • कुक्कुट खाद्यासह मका, बाजरीचा भरडा, लसूण घास, शेतातील भाजीपाल्याचाही वापर
  • मोठे पक्षी व पिले मिळून दिवसाला ५० ते १०० पक्ष्यांची विक्री.
  • शेळीपालन

  • पोल्ट्रीला २०१७ मध्ये शेळीपालनाचीही जोड दिली आहे. उस्मानाबादी जातीच्या पाच शेळ्यांपासून व्यवसायाची सुरुवात केल्यानंतर टप्प्याटप्प्याने संख्या ९० पर्यंत पोचविली. त्यातून वर्षाला ५० हजार रुपयांपर्यंत उत्पन्नही सुरू झाले. परंतु दुष्काळात शेळ्यांची चारा-पाण्यासाठी आबाळ होऊ लागल्याने तब्बल ७० पर्यंत शेळ्यांची विक्री केली. अर्थात खरेदी केलेल्या दराच्या तुलनेत दामदुप्पट पैसे त्यातून वसूल झाले. सद्यःस्थितीत शेळ्या व करडे मिळून संख्या २० पर्यंत आहे. यंदा चार बोकड तयार होत आहेत. आता संख्या मर्यादित ठेवून त्यातूनच उत्पन्न मिळवण्याचा मानस आहे.
  • चव्हाण कुटुंबाच्या शेतीची वैशिष्ट्ये

  • सन २००१ नंतर शेतीत टप्प्याटप्प्याने केले बदल
  • उसाची सरी पद्धत बदलून साडेचार फुटांवर सरी वरंबा पद्धतीने लागवड
  • ४ बाय ४ फूट असे लागवडीचे अंतर बदलून ते ४ बाय दोन फूट केले.
  • कपाशीत मूग व उडदाचे आंतरपीक.
  • बीजवाईचा कांदा, लसूण गादीवाफा पद्धतीने
  • लसणाची वाफ्यांऐवजी बेडवर लागवड
  • सिंचनासाठी दोन शेततळी व चार विहिरी. शेततळ्यात यंदा सोडले मत्स्यबीज.
  • संपूर्ण २८ एकर क्षेत्र ठिबकखाली
  • पेरू, सीताफळ लागवडीचे नियोजन, शेताच्या बांधावर शेवग्यासह विविध झाडांची लागवड.
  • सन २००९ पासून बायोगॅसचा वापर
  • ट्रॅक्‍टरसह सर्व शेतीपयोगी साहित्य.
  • सहा गायी व सहा बैल शेतीच्या दिमतीला.
  • बेडवरील मक्याने दिले उत्पन्न

  • दरवर्षी मक्याचे एकरी २ ते २५ क्विंटल उत्पादन मिळते. यंदा पावसाची स्थिती समाधानकारक असल्याने रब्बीत बेड व ठिबकवर घेतलेला मका चांगल्या प्रकारे आला. एकूण २६ टन विक्री मूरघास म्हणून औरंगाबाद येथील शेतकरी दीपक चव्हाण यांना त्यांच्या कंपनीसाठी केली. यंत्राद्वारेच सारा मका घेऊन जाण्यात आला. दोन हजार रुपये प्रति टन या दराने चांगले उत्पन्न मिळाले. आता बाजरीदेखील बेड व ठिबकआधारे घेतली असून, वाढ चांगली आहे.
  • संपर्क- मिठ्ठू चव्हाण- ९६८९७६६९०२ दत्तू चव्हाण- ९९७५७२७४०२

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com