Agriculture news in Marathi, Farmer avoids rail accident | Agrowon

शेतकऱ्यामुळे टळला रेल्वे अपघात ! 

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 12 नोव्हेंबर 2019

नगर : मनमाड-दौंड रेल्वेरुळाला विळद-देहरे गावच्या शिवारात तडा गेल्याचे एका शेतकऱ्याच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. नगरकडे येणारी हुतात्मा एक्‍स्प्रेस भुसावळ-पुणे रेल्वेगाडी रूळ तुटल्याने मध्येच थांबवली. तत्काळ रेल्वे प्रशासनाला ही माहिती कळविल्याने तात्पुरती दुरुस्ती करून रेल्वे मार्गस्थ करण्यात आली. 

नगर : मनमाड-दौंड रेल्वेरुळाला विळद-देहरे गावच्या शिवारात तडा गेल्याचे एका शेतकऱ्याच्या लक्षात आल्याने मोठा अनर्थ टळला. नगरकडे येणारी हुतात्मा एक्‍स्प्रेस भुसावळ-पुणे रेल्वेगाडी रूळ तुटल्याने मध्येच थांबवली. तत्काळ रेल्वे प्रशासनाला ही माहिती कळविल्याने तात्पुरती दुरुस्ती करून रेल्वे मार्गस्थ करण्यात आली. 

नगर-मनमाड रेल्वेमार्गावरील देहरे-विळद गावाच्या शिवारात थोरात वस्ती आहे. तेथील शेतकरी रामदास बापूराव थोरात रविवारी सकाळी रेल्वे रूळ ओलांडून शेतात चालले होते. त्या वेळी रेल्वे रुळाला तडा गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ रेल्वे रूळावर गस्त (पेट्रोलिंग) घालणाऱ्या रेल्वे कर्मचाऱ्याला सांगितले. मात्र, त्याचवेळी मनमाडकडून नगरच्या दिशेने भुसावळ-पुणे ही रेल्वे येत होती. त्यामुळे शेतकरी रामदास थोरात यांनी अंगातील लाल बनियन काढून रेल्वे पटरीवर उभे राहिले. ते लाल बनियन पाहून रेल्वेचालकाने धोक्‍याची सूचना ओळखली. त्यामुळे पुढील अनर्थ टळला. 

रेल्वेचालक खाली उतरल्यावर शेतकऱ्याने रेल्वे रूळ तुटल्याचे सांगितले. रेल्वे कर्मचाऱ्याने त्या घटनेबाबत वरिष्ठांना कळविले. त्यानंतर रेल्वे सुरक्षा बलाचे उपनिरीक्षक निश्‍चित जोशी, सुनील चांदणे, रेल्वेचे पोलिस निरीक्षक देवीसिंग बाविस्कर, पोलिस नाईक संजय लांडगे, उमेश कांगो, आनंद मुठे आणि मध्य रेल्वेचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रेल्वे रुळाची तात्पुरती दुरुस्ती करून रेल्वेगाडी पुढे रवाना केली. या धाडसाबद्दल शेतकरी रामदास थोरात यांचे कौतुक केले.

शेतात जात असताना रेल्वेरूळ तुटलेला दिसला. त्या वेळी रेल्वे कर्मचारी दोन फूट अंतरावर होता. समोरून रेल्वे येत असल्याचे पाहून मी धास्तावलो. परंतु तत्काळ अंगातील बनियन काढले. ते नेमके लाल रंगाचे होते. ते पाहून रेल्वेचालकाने गाडी थांबविली आणि पुढील अनर्थ टळला, याचे समाधान आहे. 
- रामदास थोरात, शेतकरी 

विळद येथील शेतकरी नेहमीच सतर्क असतात. आज शेतकऱ्याने दिलेल्या माहितीमुळे रेल्वेचा धोका टळला. 
- राजेंद्र कुलकर्णी, विळद स्टेशन मॅनेजर


इतर ताज्या घडामोडी
मोदी सरकारकडून शेतकऱ्यांच्या ह्रदयावर...नवी दिल्ली : कृषी सुधारणा कायद्यांविरोधात...
कृषी कायद्यांविरोधात सर्व आघाड्यांवर...चंडीगड ः केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांना...
काळा पैसा बंद झाल्याने त्यांचा विरोध; ...नवी दिल्ली : ‘‘कृषी सुधारणा कायद्यांमुळे...
कृषी कायदे झुगारून लावा; काँग्रेसशासित...नवी दिल्ली   ः काँग्रेसशासित राज्यांनी...
नगर जिल्ह्यात पीक नुकसानीचे पंचनामे...नगर  ः महिनाभर सतत पाऊस पडल्याने जिल्ह्यातील...
पुणे विभागात एक लाख ३८ हजार हेक्टरवर...पुणे  ः यंदा वेळेवर पाऊस झाल्याने चारा...
पावसाचा नगरमधील १७ हजार कांदा...नगर  ः गेल्या महिनाभरात झालेल्या सततच्या...
नुकसानीबाबत परभणीतील सहा हजारांवर ...परभणी : अतिवृष्टी तसेच नाले, ओढे, नद्यांच्या...
 पावसाची विश्रांती; सिंधुदुर्गात भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात पावसाने विश्रांती...
पानपिंपरी, विड्याच्या पानाला...बुलडाणा  ः पानपिंपरी व विड्याचे पानमळे हे...
जत तालुक्यातील सात गावांमधील ...सांगली  ः जत तालुक्यातील सात गावांमधील...
अकोला जिल्ह्यात ८७ हजार हेक्टरवर हरभरा...अकोला  ः यंदा समाधानकारक पावसामुळे सर्वच...
ऊस वाहतूक दरात ५० टक्के वाढ द्या : ...कोल्हापूर : ऊस वाहतुकीच्या दरात ५० टक्के वाढ...
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द करा :...मुंबई : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी...
कृषी विधेयकाआधीही शेतकरी स्वतः माल विकू...सोलापूर  ः केंद्र सरकारने आणलेल्या कृषी...
केंद्राची कृषी विधेयके शेतकरी-कामगार...पुणे : केंद्र सरकारने मंजूर केलेली कृषी, पणन आणि...
दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ...पुणे : दक्षिण आशियातील देशांत मॉन्सूनोत्तर...
आदर्श शेतकरी नाही, तर केवळ नोकरदार...चंद्रपूर : आधुनिक तंत्रज्ञानाचा पुरस्कर्ते...
सहकारी संस्थांच्या निवडणुका पुन्हा...मुंबई : कोरोना संकटामुळे राज्यातील मुदत संपलेल्या...
जळगावात भरीताची वांगी १५०० ते २५००...जळगाव  ः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...