agriculture news in Marathi farmer beaten by adtiya Maharashtra | Agrowon

पिंपळगावला आडत्याकडून शेतकऱ्याला मारहाण 

टीम अॅग्रोवन
रविवार, 25 ऑक्टोबर 2020

 निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी जितेंद्र जाधव यांनी पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटो विक्री केला. व्यवहाराचे पैसे घेण्यासाठी गेले असता अडत्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली.

नाशिक: निफाड तालुक्यातील कारसूळ येथील शेतकरी जितेंद्र जाधव यांनी पिंपळगाव बसवंत बाजार समितीत टोमॅटो विक्री केला. व्यवहाराचे पैसे घेण्यासाठी गेले असता अडत्याने पैसे देण्यास टाळाटाळ केली. पैसे द्या, नाहीतर लिहून द्या, अशी मागणी केली असता आडत्याने शिवीगाळ करत मारण्याची धमकी दिली. एवढ्यावर न थांबता आडत्याकडून मारहाण झाल्याची फिर्याद श्री. जाधव यांनी पिंपळगाव बसवंत पोलिस ठाण्यात दिली आहे. 

याबाबत दिलेल्या फिर्यादीनुसार, २२ ऑक्टोबरला संत सावता आडत यांच्याकडे टोमॅटो दिले. २३ ऑक्टोबरला विक्री केलेल्या टोमॅटोचे पैसे घेण्यासाठी बाजारात गेले. यावेळी आडत दुकानात हजर असलेल्या दत्तात्रय गोविंद विधाते यांची मुले किशोर व ज्ञानेश्वर विधाते (रा. शिवाजीनगर, पिंपळगाव ब., ता.निफाड) यांनी आज पैसे मिळणार नाही, असे सांगितले.

मात्र आज पैसे पाहिजे, नाही तर पावतीवर लिहून द्या, अशी श्री. जाधव यांनी मागणी केली. यावर त्यांना बाजूला थांबवून ठेऊन दुसऱ्या लोकांना पैसे देत होते. यावर मला पण पैशांची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. त्यावर शिवीगाळ करुन जिवे मारण्याची धमकी दिली. जाधव हे धमकी देऊ नका असे सांगत असताना किशोर याने वस्तूने मारल्याने श्री. जाधव यांना डोक्यात दुखापत झाली. पुन्हा लाथा-बुक्यांनी मारहाण करून शिवीगाळ, दमदाटी करून आडत दुकानाच्या बाहेर ढकलून दिल्याचे श्री. जाधव यांनी म्हटले आहे. 

संबंधितांवर पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आलाय आहे. पोलिस हवालदार श्री. गांगुर्डे पुढील तपास करत आहेत. 

प्रतिक्रिया
ही बाब गांभीर्याने घेत याबाबत अधिक माहिती घेतली जात आहे. असे गैरप्रकार घडणार नाही याबाबत बाजार समिती दक्ष आहे. त्यामुळे शेतकरी हित प्राधान्याने विचारात घेतले जाईल. 
- बाळासाहेब बाजार, सचिव, कृषी उत्पन्न बाजार समिती, पिंपळगाव बसवंत. 


इतर अॅग्रो विशेष
‘सूक्ष्म सिंचन’प्रकरणी चौकशी...औरंगाबाद/जालना : जालना जिल्ह्यात सूक्ष्म सिंचन...
बीजोत्पादन क्षेत्र नोंदणीला मुदतवाढपुणे : राज्यात रब्बी हंगामासाठी घेतल्या जाणाऱ्या...
कमी कालावधीत पक्व होणारे मधुर कलिंगड...नाशिक : बंगळूर येथील भारतीय फलोत्पादन संशोधन...
किमान तापमानात घट होणार पुणे : बंगालच्या उपसागरात तयार झालेले निवार...
डाळिंब दरात मोठी सुधारणासांगली ः राज्यातील डाळिंब पीक यंदा सततचा पाऊस आणि...
पामतेल आयात शुल्कात कपात; केंद्र...नवी दिल्ली ः केंद्र सरकारने कच्च्या...
टंचाईग्रस्त दहीगाव झाले लोकसहभागातून...सातारा जिल्ह्यातील दहीगाव गावातील ग्रामस्थांनी...
'निवार’ चक्रीवादळाचा प्रभाव; राज्यात...पुणे ः बंगालच्या उपसागरात पूर्व किनाऱ्याकडे...
केळीची मागणी कायम, दर टिकून जळगाव : दाक्षिणात्य व गुजरातमधील केळीची उत्तर...
तमिळनाडू, पुद्दुचेरीत धुमाकूळचेन्नई  ः निवार चक्रीवादळामुळे वेगवान...
गहू, हरभरा पेरणीला वेगपुणे : यंदा चांगल्या पाणीसाठ्यामुळे गहू व...
पहिल्याच टप्प्यात थकवली ३५० कोटींची ‘...पुणे : राज्याचा ऊस गाळप हंगाम सुरू झाल्यानंतर...
आर्थिक चणचण,‘लम्पी’चे पशुधन बाजारावर...सांगली ः लॉकडाउनमुळे पशुधानाचे आठवडे बाजार तब्बल...
ऊसतोडणी मजुरांची संख्या यंदा दोन...नगर : राज्यातील साखर कारखान्यांवर ऊसतोडणी...
पणन महासंघाची खरेदी उद्यापासूननागपूर : महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक...
मराठवाड्यातील बहुतांश धरणे तुडुंबऔरंगाबाद : यंदा जोरदार पावसामुळे मराठवाड्यातील...
संकटकाळात श्री ब्रॅण्डद्वारे दर्जेदार...नाशिक जिल्ह्यातील वनसगाव येथील शैलेश व संदीप या...
सणांच्या हंगामात भाव खाणारी गाडे यांची...कांजळे (ता. भोर, जि. पुणे) येथील विलास गाडे यांनी...
महाटीत उपसरपंचपदासाठी साडेदहा लाखांची...नांदेड ः ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी उपसरपंचपदाचा...
राज्यात शनिवारपासून ‘जनप्रबोधन यात्रा’नगर/पुणे ः शेतकरी आत्महत्येला कारणीभूत असलेल्या...